सोनेरी नात्यांची वीण भाग 28
©️®️शिल्पा सुतार
दीर्घ कथा लेखन स्पर्धा डिसेंबर जानेवारी 2025-26
मीनलताई काळजीत होत्या. सोनल लग्नाला नकार देत होती. तीच कस होईल हेच त्यांना वाटत होतं. मोहनरावांना खात्री होती सोनल सुखी होईल. आता पुढे...
रसिका चहा घेवून आली. मीनलताई तिच्याकडे बघत होत्या." ते नेकलेसच काय आहे रसिका?"
"मी?" रसिकाने विचारलं.
"हो."
" तुम्ही माझ्यावर आरोप करताय का? अहो... ऐकताय ना. आई बघा कश्या बोलता आहेत. सगळे इथे मला चोर समजतात. नाही नाही ते आरोप लावतात. " रसिका तोफांड करत होती.
" नाही ग, मी सहज विचारते आहे. म्हणजे तुझ्याशी बोलते आहे. अस काय करतेस? ते सोनलच सासर आहे. तिकडे हे झालं. उगीच आपल्या मुळे तिला जाच नको अस मला वाटलं. " मीनलताई म्हणाल्या.
" मला अस वाटत आहे की तुम्ही मला विचारता आहात की तू नेकलेस घेतला का? " रसिका म्हणाली.
" नाही ग. "
" आई, मला नेकलेस हवा आहे. पण तो यांनी घेतलेला असावा. तिकडे लग्नात मी नेकलेस चोरला नाही. असे उद्योग करायला मी रिकामी नाही. काय लोक आहेत. काहीही झालं तरी माझ्यावर नाव घेतात. घरच्यांनी अस बोललं तर बाहेरचे माझ्यावर सहज आरोप करतील. चोर समजतील. अहो, तुम्ही यावर काही बोलणार नाही का? " ती राजेशला रागाने म्हणाली आणि आत गेली.
" रसिका अग ऐक तरी. तू गैरसमज केला आहेस. माझं अस म्हणणं नव्हतं. " मीनलताई म्हणाल्या. उगीच बोलली अस त्यांना झालं.
"आई तू रसिकाला असं बोलायच नव्हतं. तुला ती अशी वाटली का? " राजेश थोडंसं बोलून आत गेला.
" मीनल कश्याला तिला विचारलं? बघितल ना ती किती गोंधळ घालते. " मोहनराव म्हणाले.
" अहो मी तिच्यावर आरोप करत नव्हते. सहज बोलत होते. जावू द्या आता तो विषय नको. तिकडे सोनलला कोणी काही बोलायला नको. लग्नात त्या मामी म्हणत होत्या की हे मुली कडच्या लोकांच काम आहे. " मीनलताई काळजीत होत्या.
" त्यांना काहीही म्हणू दे. आपण ते केल नाही. टेंशन घेवू नकोस." मोहनराव म्हणाले.
रसिका आत धुसफुसत होती. तिची बडबड सुरू होती. शेवटी मीनलताई आत गेल्या." माझं चुकलं रसिका. उगीच तो विषय काढला."
" ठीक आहे आई. मी काही केलं नाही इतक तुम्ही लक्ष्यात ठेवा. यापुढे अस काहीही बोलत जावू नका. " रसिकाने दोन शब्द जास्त ऐकवले.
आमचं ऋषी इनामदार यांच्याकडे वेगळं काम आहे. ते यांना नोकरी देवू शकतात. उगीच तो छोटासा नेकलेस चोरून त्या घरचे दरवाजे मी बंद करून घेणार नाही. मला ही थोड फार समजत. रसिका विचार करत होती.
******
" मम्मी चल ना मी तुला माझी रूम दाखवते. " आर्या ऐकत नव्हती.
लगेच सगळीकडे कस फिरणार? बाकीचे काय म्हणतील? कधीच अस घर बघितल नाही का? सोनल विचार करत होती.
"मम्मी तू येत का नाही? " आर्या अजून तेच विचारत होती.
" आपण थोड्या वेळाने जावू." सोनल म्हणाली.
" मला बोर होतय. मी डॅडीला बोलवू का? तो आपल्याशी खेळेल." आर्या म्हणाली.
" त्यांना बोलवू नको. चल काय दाखवते ते बघू. " सोनल पटकन म्हणाली. आर्या अजिबात ऐकत नाही. उगीच ते ऋषी इनामदार इकडे येतील.
ती आर्या सोबत तिच्या रूम मधे गेली. तिची रूम छान होती गुलाबी गुलाबी. खूप खर्च करून इंटीरीयर केला असेल वाटत होत. बेड ही कंफर्टेबल दिसत होता. एका बाजूला स्टडी टेबल होता. एका कोपर्यात खूप खेळ होता. डॉल हाऊस होतं. आर्या तिला सगळं दाखवत होती.
हे सगळं आहे म्हणून ही लकी आहे का की आई नाही म्हणून....
तिला सगळे किती छान सांभाळतात. आता मी पण आहे. ऋषी ही प्रेमाने रहात असतिल. त्याच्या सगळया खुणा इथे दिसत आहेत. मग आज त्यांनी आर्याला अगदी माझ्यावर सोपवून दिलं का? ते माझ्यावर विश्वास ठेवता का? पण आमची तर ओळख ही नाही. याआधी त्यांना कधी बघितल ही नाही. तरी एवढा विश्वास? माहिती नाही.
तिला सगळे किती छान सांभाळतात. आता मी पण आहे. ऋषी ही प्रेमाने रहात असतिल. त्याच्या सगळया खुणा इथे दिसत आहेत. मग आज त्यांनी आर्याला अगदी माझ्यावर सोपवून दिलं का? ते माझ्यावर विश्वास ठेवता का? पण आमची तर ओळख ही नाही. याआधी त्यांना कधी बघितल ही नाही. तरी एवढा विश्वास? माहिती नाही.
सोनलने आर्याला नाइट ड्रेस घालून दिला. ती खेळत होती.
"डिनर साठी चला." पूनम बोलवायला आली.
सोनल जरा गडबडली होती. बाहेर जावू की नको? ऋषी तिथे असतिल का? माझा ड्रेस खूप साधा आहे का? दुसरा घालायला हवा होता. माझे सगळे ड्रेस असेच आहेत कॉटनचे. जावू दे मी अशीच आहे. उगीच दिखावा नको.
"चल मम्मी." आर्या आवाज देत होती. ती हॉल मधे आली. लताताई ताट वाढत होत्या.
"ही पेज आशाला दे." आजी म्हणाल्या. नर्स डिश घेवून गेली.
आजींनी फोन केला. बहुतेक इंटरकॉम असेल. त्या बोलत होत्या. अस काय? जेवायला तरी ये. मला ना तू अस का करतोस तेच समजत नाही. ठीक आहे पाठवते. थोड तरी खा.
"लता अग ऋषी ही वरती जेवणार आहे. फॉरेनचा कॉल सुरू आहे. " आजी म्हणाल्या. लताताईंनी ऋषीचं ताट वाढलं.
******
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
