Login

सोनेरी नात्यांची वीण भाग 29

ही सोनेरी नात्यांची वीण आहे हळूहळू उलगडणार
सोनेरी नात्यांची वीण भाग 29

©️®️शिल्पा सुतार

दीर्घ कथा लेखन स्पर्धा डिसेंबर जानेवारी 2025-26

सोनल, आर्या बरोबर रमली होती. अजूनही ती ऋषीशी एकदाही बोलली नव्हती. जेवतांना भेट झाली असती तर ऋषी खाली आला नाही आता पुढे...

"सोनल जा हे ताट ऋषीला दे." आजी म्हणाल्या. लताताई तिच्याकडे बघत होत्या पूनम हसत होती.

"नको आजी, म्हणजे ते मला यांची रूम माहिती नाही... मला ताट हातात घेवून चालता येत नाही. मी आर्याकडे बघते." सोनल कसतरी म्हणाली.

" तुला ताट धरायचं नाही. लता सोबत येईल. जा पटकन. " आजी तिच्याकडे बघत म्हणाल्या.

" नाही... नको... मला भूक लागली आहे. मी जेवण करते. " सोनल म्हणाली. तिची गडबड होते आहे सगळ्यांना समजलं.

" जा ना वहिनी. अशी घाबरतेस काय. " पूनम म्हणाली.

सोनलने तिच्याकडे लक्ष दिलं नाही. मी काहीही झालं तरी ताट द्यायला जाणार नाही.

"या मुली अस काय करतात ते समजत नाही. नवर्‍याकडे कोणी बघायचं? आता तरी आमची सुटका करा ग. " आजी बडबड करत होत्या.

" उद्या काय करशील वहिनी? तुला दादाच्या रूम मधे जावचं लागेल." पूनम तिला हसत होती.

सोनल थोडी घाबरली होती. मी आर्याला सोबत ठेवेल. अस ही हे माझ्याशी बोलत नाहीत. तेच आजीला म्हणतील हिला वेगळी रूम दे.

लताताई ताट घेवून गेल्या.

" सोनल तुला काय वाढू?"

" मी घेते आजी."

"मोकळ रहात जा ग आणि तुझ काम समजावून घे. ऋषीकडे आता तू बघायला हव. " आजी तिला प्रेमाने ओरडत होत्या. ती आर्याला जेवायला वाढत होती.

"आजी तूच दादाला लाडावून ठेवलं आहे. त्याला खाली जेवायला यायला काय होतं. एवढा काय तो बिझी, बिझी करतो? रोज या वेळी इथे आपल्या सोबत तर असतो. ओह बहुतेक तो वहिनीला घाबरला असेल. " पूनम हसत म्हणाली.

आजींना समजत होतं दोघ एकमेकांना टाळता आहेत. काहीतरी करावं लागेल.

आर्या छान जेवत होती. पूनम मधेच फोन मधे बघत होती.

आज बर झालं मी ताट घेऊन वरती गेली नाही. ऋषी काय म्हणतील बोलावलं नाही तरी काय रूम मधे येते. ही इतकी उत्सुक आहे का? इतक करून त्यांनी माझ्याकडे बघितलं नाही तर माझा अपमान होईल. उगीच ओरडले तर मला सहन होणार नाही.

मी पुढाकार घेणार नाही. हे नातं तयार व्हायचं असेल तर त्यांच्या कडून व्हायला हवं. काहीही झालं तरी मी स्वतः हून त्यांच्या पुढे पुढे करणार नाही.

******

लताताई आत आल्या. त्यांनी प्लेट पुढे ठेवली. ऋषी बघत होता. "आर्या?" त्याने विचारलं.

"ती जेवते आहे. मॅडम तिच्याकडे बघत आहेत."

"पूनम?"

" नाही सोनल मॅडम."

" ठीक आहे." तो बिझी होता. त्याने जेवण केलं.

पूनम, आजी, आर्या सोबत सोनलला बर वाटतं होतं. आर्या गोड गप्पा करत होती. तिने आत्ता पर्यंत सगळं सोनलला सांगितल होतं. तिला मोठं झाल्यावर टीचर व्हायचं होत. तिला डॅडी सारखी कार हवी होती. पिंक कलर तिचा आवडता आहे. दीक्षा तिची मैत्रीण आहे.

"काही का असेना पण कोणी तरी आज फार गडबडल." पूनम मुद्दाम सोनलला चिडवत होती. सोनल ही हसत होती.

" मी पण बघितलं, कोणाला तरी घरच्यांची आठवण येते आहे. इकडे करमत नाही." सोनल म्हणाली.

पूनम थोडी शांत झाली. खरच मला राघवची फार आठवण येते आहे. मला आमच्या घरी जायचं. पण राघव सोबत रहायचं म्हणजे बाकीच्यांनाही सहन करावं लागेल. बघू तो काय म्हणतो? उद्या तो इकडे येईल. तेव्हा बोलता येईल.

थोड्या वेळाने सोनल, आर्या, पूनम... आशा ताईंच्या रूम मधे आल्या. पूनम त्यांच्याशी बोलत होती. सोनल नुसती उभी होती. आर्या खेळत होती.

"बस बेटा सोनल."

" तुमच जेवण झालं का काकू." सोनलने विचारलं.

" काकू काय म्हणतेस? मला आई म्हणत जा. म्हणजे तुला चालत असेल तर." आशाताई म्हणाल्या.

" हो का नाही चालणार. "

" त्यांनी थोडी पेज खाल्ली. " नर्स म्हणाली.

" तुम्ही आमच्या सारखं का जेवत नाही?"

"ते त्यांना पथ्य आहेत." नर्स म्हणाली.

"काय झालं आहे?"

"तस काही नाही. अन्न पचत नाही ." आशाताई सांगत होत्या.

"तुमची हालचाल नाही म्हणून."

" हो ना आम्ही आईला तेच सांगतो. आई, उद्या पासून आमच्या साठी थोड एक्टीव रहा. तू काही करू नकोस फक्त आर्या सोबत खेळ." पूनम म्हणाली.

आशाताई फक्त हसल्या. " जा बेटा आराम कर. "

"हो आई. " सोनल, आर्याच्या रूम मधे आली. आर्या थकली होती. ती लवकर झोपली होती. सोनल नुसती बसली होती.

किती वेगळच वाटतं आहे. अजिबात करमत नाही. हे जेवायला खाली आले नाही. बिझी आहेत वाटतं. की मी आहे म्हणून अस वागत आहेत. नाहीतर ते रोज आर्याशी खेळतात तीच सांगत होती. त्यांना बहुतेक मी आवडत नसेल. स्पष्ट दिसत आहे. यांची पहिली पत्नी आजारपणात गेली ते तिच्यावर प्रेम करत असतिल. हो बहुतेक. नाहीतर ते त्या त्यांच्या पळून गेलेल्या नवरी साठी अपसेट असतिल समजत नाही.

माझं असच आयुष्य असेल बहुतेक. जावू दे आईकडे ही एकटी होती. इथे ही ऐडजेस्ट करू. मी शाळा केव्हा जॉईन करू? अस बसुन बसून बोर होत. पेपर सेट करायचे होते. वह्या तपासायच्या आहेत. खूप काम आहेत. शाळेत जायला लागल्यावर बर वाटेल. तिने स्वतः ची समजूत काढली.

******

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"