सोनेरी नात्यांची वीण भाग 30
©️®️शिल्पा सुतार
दीर्घ कथा लेखन स्पर्धा डिसेंबर जानेवारी 2025-26
नवीन ठिकाणी सोनलला करमत नव्हतं. तिला या नात्याचा भविष्यकाळ काय आहे समजत नव्हतं. मी या लग्नासाठी का तयार झाली? उगीच हा निर्णय घेतला. ती नुसती बसून होती. आता पुढे...
तिने आईकडे घरी फोन लावला.
"सोनलचा फोन आहे. तिला घरी काय झालं ते बोलू नकोस. रडू नकोस मीनल. " मोहनराव म्हणाले.
मीनलताईंनी फोन घेतला. " झोपली नाही का बेटा? जेवण केल का?"
" हो आई जेवण झालं. आई, इकडे वेगळं वाटत आहे. करमत नाही. " सोनलच मन भरून आलं होतं.
" तुला कोणी काही म्हणाल नाही ना बेटा? " मीनलताईंनी विचारलं.
" कसलं?"
" ते नेकलेस चोरीला गेला ते? "
" नाही आई, नेकलेसचा विषय कोणी काढला नाही. मी माझे दागिने नीट ठेवले आहेत. नंतर आजींकडे देईन." सोनल सांगत होती.
" हो तेच बर होईल. उगीच सांभाळायला नको. एवढ्या महाग वस्तू. नीट ठेवलेल्या बर्या. "
"तुम्ही उद्या इकडे येताय ना?" सोनलने विचारलं. सत्यनारायण पूजेसाठी आजींनी त्यांना आमंत्रण दिलं होत. तिने ऐकलं होतं.
" हो येवू बेटा. "
तिला बर वाटलं.
तिने पाच मिनिट बोलून फोन ठेवला. घरचे बाकीचे झोपले होते. ती ही झोपली.
******
ऋषी बाल्कनीत उभा होता. मीटिंग केव्हाची संपली होती. त्याला खाली जायला कसतरी वाटत होतं म्हणुन तो काहीतरी वाचत बसला होता.
हे अस ठीक नाही. किती दिवस मी असा परिस्थिती पासून पळ काढणार आहे. निदान आर्यासाठी तरी मी जेवायला जायला हवं होतं. ती माझी वाट बघत असेल. यापुढे अस करायच नाही. मी मायाला वचन दिलं होतं. त्याला वाईट वाटलं.
लग्न झालं तर वेगळच वाटत आहे. सगळ्यांच्या माझ्या कडून अपेक्षा वाढल्या आहेत. पण मला हे जमणार नाही. मी अजूनही नॉर्मल नाही. माझ्यासाठी आलेली माझी बायको सोनल ती ही असाच विचार करत असेल का? काय माहिती.
आयुष्य वेळोवेळी परीक्षा घेत असतं. त्याला संयमाने तोंड द्यायला हवं. मला तरी माझी रूम आहे मी वरती येवून बसलो. सोनलला तर तो ही ऑप्शन नाही. बळजबरी ती माझ्या नातेवाईकांसोबत वेळ घालवत असेल. तीच जिवन खरच खडतर आहे. मी ते नीट करू शकतो. नाही, नको, अजून नाही.
सोनल झोपली असेल? हो वाटत. ती माझ्या बद्दल विचार करत असेल का? माहिती नाही. तिने लग्न का केलं असेल? अस अनोळखी स्थळ निवडलं. घरच्यांनी बळजबरी केली असेल का? की तिने मी श्रीमंत आहे म्हणून होकार दिला. तिचा काय उद्देश आहे समजत नाही.
ती अशी नाहिये. साधी, शांत मुलगी वाटते आहे. मागे ही मी तिला बर्याच वेळा बघितलं आहे. तीच कधीच माझ्याकडे लक्ष नव्हतं. ती मंदिरात सेवा करत असायची. काहीतरी असेल. हळूहळू समजेल.
त्याने बघितलं अकरा वाजून गेले. तो हळूच खाली आला. आर्याला भेटू. तो तिच्या रूम जवळ आला. नेहमी प्रमाणे दरवाजा लोटलेला होता. त्याला माहिती नव्हतं सोनल आर्याच्या रूममधे झोपली आहे. तो आत आला. एकदम थांबला. रोज आर्या जवळ पूनम असायची.
आत जावू की नको? त्याला कसतरी वाटलं. किती केल तरी सोनल अजूनही त्याला जवळची वाटत नव्हती. अस कस कोणत्या मुलीच्या रूम मधे जाणार. पण तिच्या जवळ माझी लेक झोपली आहे. दोन मिनिट तिला बघतो. तो पुढे गेला.
तो बघत होता. दोघी सोबत खूप छान दिसत होत्या. सोनल झोपेत ही आर्याला सांभाळत होती. दोघींच ब्लँकेट बाजूला झालं होतं. सोनल जरी मोठी असली तरी ती आर्या सारखी निरागस दिसत होती.
त्याने आर्याला ब्लँकेट पांघरुन दिलं. सोनलकडे तो बघत होता. तिच्या चेहर्यावर गोडवा होता. ती आरामात झोपली होती. थकली असेल. तिने पंजाबी ड्रेस घातला होता. त्यातून तीच गोर अंग, तिची कमनीय फिगर स्पष्ट दिसत होती. ओढणी बाजूला पडली होती.
त्याने दोन मिनिट बाजूला बघितलं. हिला नाइट ड्रेस घालता येत नाही का? असे ड्रेस घालून का झोपते? जावू दे तिच्याकडे नसतील. तिला वाटल नसेल रात्री कोणी रूम मधे येईल.
त्याने तिच्या अंगावर ब्लँकेट टाकलं. तो तिच्याकडे बघत होता. चेहर्यावरून वय कमी वाटत होतं. ही दिवसभर घाबरलेली वाटत होती. इथे येवून गडबडली असेल. हिच्या साठी सगळं नवीन आहे. स्वतः च घर सोडून अस दुसरीकडे यायचं. खरच कठिण आहे.
त्यात मी पण आज कोणाशी बोललो नाही. तेच बर आहे. बघू तरी ही काय करते? तिचा उद्देश काय आहे? यातून झालं तर खूप चांगलं होईल .नाहीतर आहेच ऐकटेपण.
तो बाहेर आला. त्याच्या रूम मधे गेला. आज खरच आर्याकडे बघावं लागलं नाही. मी माझं काम आरामात करू शकलो. आईने पण पूर्ण पेज पिली. आजी सोनल वर खुश आहे. चला थोड तरी नीट होत आहे. मला ही आज छान वाटत आहे.
पूनम राघवचं नीट नाही. ते एकमेकांना समजून घेत नाही. मामा, मामी वेगळच वागतात. त्यात ती रिटा कुठे गेली समजलं नाही. आपल्याला काय? तिच्या बद्दल विचार न केलेला बरा. तो आराम करत होता.
******
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा