Login

सोनेरी नात्यांची वीण भाग 32

ही सोनेरी नात्यांची वीण आहे हळूहळू उलगडणार
सोनेरी नात्यांची वीण भाग 32

©️®️शिल्पा सुतार

दीर्घ कथा लेखन स्पर्धा डिसेंबर जानेवारी 2025-26

सोनलने लग्नाला होकार का दिला ते ऋषीला समजल. तो तिला समजून घेईल का? मोहनरावांची ट्रीटमेंट होईल का? आता पुढे.

सोनल तयार होती. ती आज खूपच सुंदर दिसत होती. काय कराव समजतं नव्हतं म्हणून ती आत बसून होती. आई बाबा केव्हा येतील? तिने मेसेज केला.

आजी आत आल्या." खूप छान दिसते आहेस सोनल. अशी अलिप्त राहू नको. सगळं तुझं आहे. हक्काने वाग. आता हे काय मी तुला सांगु. चल आता बाहेर. मदत कर. "

ती बाहेर येवून बसली. लताताई ट्रे परत घेवून चालल्या होत्या.

"काय झाल ताई?" तिने विचारलं.

" मॅडम नाही म्हणता आहेत. कोणाच ऐकतं नाही. काही खात नाही. "

"चला." त्या दोघी आशाताईंच्या रूम मधे आल्या. तिने नमस्कार केला.

"सुखी रहा बेटा." आशाताईंनी मनापासून आशीर्वाद दिला. तिच्याकडे बघून त्या खुश होत्या. " खूप सुंदर दिसतेस बेटा. "

"आई नाश्ता करा ना."

"मला काही खावसं वाटत नाही." त्या म्हणाल्या.

"दुसर काही करून आणू का? तुम्हाला काय आवडत ते सांगा? " सोनलने विचारलं.

" काही नको बेटा. "

"मग हे खा." ती त्यांच्या जवळ बसली होती.

"दे लता मी खाते." आशाताई म्हणाल्या. सोनलला बर वाटलं. ती त्यांच्याशी बोलत होती.

******

पूनम, आर्याची तयारी करून देत होती.

"मी मम्मी सारखी दिसते ना आत्तु?"

" हो तू खूप गोड दिसतेस बेटा. " पूनम म्हणाली.

" मम्मी रेडी आहे. ती बाहेर कामात आहे ना? ती कुठे गेली नाही ना? " आर्याने घाईने विचारलं.

" ती कश्याला कुठे जाईल. आपण ही तयारी करून बाहेर जावू." पूनम तिच्याशी बोलत होती. तिला कसतरी वाटलं. एवढ्याश्या मुलीने मम्मी नसल्याचा धसका घेतला आहे. तिने तिला जवळ घेतलं. तिची पापी घेतली. तू खूप सुखी होशील आर्या. तुला तुझ्या मनासारखी फॅमिली मिळेल. त्यासोबत तिने दोनदा राघवला फोन लावून बघितला.

******

"तुम्हाला आजी बोलवत आहेत." सोनलला लताताई बोलवायला आल्या.

" जा बेटा." आशाताई म्हणाल्या.

सोनल बाहेर गेली. आजी, पूनम कामात होत्या. गुरुजी आले होते. पूनम त्यांना सामान देत होती.

" आर्याकडे बघ सोनल. " आजी म्हणाल्या.

आर्या पळत आली." मम्मी तू कुठे गेली होतीस? "

" बेटा मी रूम मधे होती."

" डॅडीच्या रूम मधे का?" काल तिला पूनम म्हणाली तेच आठवल होतं की मम्मी आता डॅडी सोबत राहील.

" नाही आजीच्या रूम मधे होती. तू किती छान दिसते आहेस आर्या. चल थोड खावून घे. " सोनल, आर्या डायनिंग टेबल जवळ बसल्या होत्या. आर्या नाश्ता करत होती.

सोनल इकडे तिकडे बघत होती. ऋषी इनामदार कुठे दिसत नाही. बापरे अति करत आहेत अस नाही का वाटत. त्यांनी खाली यायचं नाही अस ठरवलं आहे की काय? मला इतके घाबरले की काय? तिला हसू आलं. आजी म्हणतात हक्काने वाग. कस पण? मला हे घर माझं वाटत नाही. ऋषी ही या लग्नापासून खुश नाहीत अस दिसत आहे.

ऋषी तयार होता. खाली जावू का? तो विचार करत होता. आर्या तयार झाली असेल. बघून येवू. नको, तिच्या रूम मधे सोनल असते. आजी ही ऐकत नाही. परत पूजा आहे. फिरायला जा म्हणत आहेत. काहीही आपलं.

मनीष... त्याने फोन लावला. तो त्याला काम सांगत होता.

"तु आज ऑफिसला येतो आहेस का ऋषी?"

" नाही, इकडे सत्यनारायणाची पूजा आहे."

"ओके. मी तुझ्या मीटिंग पुढे ठकलतो."

" ठीक आहे."

" किती दिवसांनी रीशेड्युल करू?"

" उद्या ठेव."

" नक्की ना? तू फिरायला वगैरे जात नाहीस ना?" मनीषने विचारलं.

"मनीष...?" ऋषी चिडला होता.

तो हसत होता.

ऋषीने फोन ठेवला. तो आरश्यात बघत होता. तयारी तर ठीक आहे ना?

******

ऋषी खाली येतांना दिसला. सोनल बघत होती. फायनली काल संध्याकाळ नंतर आज ऋषी इनामदार दिसले. कुर्ता मधे तो जबरदस्त दिसत होता. केस सेट केलेले. पायात चप्पल होती. हातात घड्याळ. एका हातात फोन होता. काहीतरी काम सुरू होतं. तो आल्या मुळे वातावरण थोड सिरियस झालं होतं.

यांच्याकडे अस बघायला नको. त्यांना समजल तर? सोनलला हसू आलं आणि धडधड ही झाली. हे आर्याशी बोलायला आले तर? मी उगीच इथे बसली.

तो खाली आला. इकडे तिकडे बघत होता. त्याने सोनलकडे बघितलं. साडी नेसली आहे. बापरे एवढी तयारी? तो त्याच त्याच थोडं हसला. ही फारच सुंदर दिसते आहे. वागायला कशी आहे समजेलच. तिने काय काय घातलं आहे हे एवढ्या लांबून ही त्याला दिसत होतं. सोनलला कोणी इग्नोर करू शकत नव्हतं. ती साधी, छान मुलगी होती.

सोनल क्रीम कलरची साडी नेसली होती. त्याला लाल काठ होते. केसांची वेणी घातलेली. गजरा लावला होता. विशेष तयारी केली नव्हती. टिकली, थोडी लिपस्टिक लावली होती.

ऋषी, पूनमशी बोलत होता.

बापरे एखाद्याने किती अकडूपणा करायचा. इतके बिझी? सोनल त्या दोघांकडे बघत होती.

******

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"