Login

सोनेरी नात्यांची वीण भाग 34

ही सोनेरी नात्यांची वीण आहे हळूहळू उलगडणार
सोनेरी नात्यांची वीण भाग 34

©️®️शिल्पा सुतार

दीर्घ कथा लेखन स्पर्धा डिसेंबर जानेवारी 2025-26

पूजेसाठी सगळे जमले होते. आशाताई बाहेर येवून बसल्या. सोनलच्या घरचे, मामा मामी बरेच पाहुणे आले होते. आता पुढे.

आजी मामींकडे बघत होत्या." तुझं समान सांभाळ सुलभा. इथे आमच्या घरी उगीच तुझ काही चोरीला जायचं. तुझा नेहमी ओरडा असतो. तुझ्या सारखं महाग सामान आमच्याकडे नाही बाई. "

" हो आजी मी सगळं सांभाळून होते. नशीब साथ देत नाही. " सुलभा मामी सोनल कडे बघत म्हणाल्या. ही किती सुंदर दिसते आहे. थोड्या दिवसात ती ऋषी वर तिची जादू चालवेल. इथे माझी रिटा असती. मी किती खुश असते.

आजींना ती काय म्हणते ते समजलं. हो ना हिने तर रिटाचा नंबर इकडे लावला होता. बर झालं ती पळून गेली. मी बरोबर तिच्या नाकावर टिच्चून सोनलला करून आणलं म्हणून तिला जिवावर येत. ऋषी, सोनलची जोडी किती छान दिसते आहे. नेकलेसचं म्हणून तिने काढलं होत. कोणी कश्याला तिचा नेकलेस घेईल. आम्हाला कसली कमी आहे.

"आता तुम्ही काही लोकांना पाठीशी घालायचं ठरवलं आहे. त्याला मी काय करणार. शेवटी माझा नेकलेस गेला. " सुलभा मामी नाटकी आवाजात म्हणाल्या.

"दुसरा ही मिळाला ना. ऋषी कोणाची उधारी ठेवत नाही. काळजी करू नकोस तो नेकलेस कोणी घेता मी व्यवस्थित बघणार आहे. तुला माहिती नसेल तर सांगते हॉल मधे सगळीकडेच सीसीटीव्ही होते." आजी म्हणाल्या.

सुलभा मामीचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. त्या गप्प बसल्या होत्या.

आजी पूनम जवळ आल्या. " ही सुलभा घरात कुठे जाईल तर लक्ष दे पूनम. ती आता हल्ली काय करेल सांगता येत नाही. ती सोनलवर चिडलेली आहे. "

" हो आजी. " पूनम म्हणाली.

" काय झालं? तुझ लक्ष नाही? "

"राघव येणार नाही. त्याच्याशी बोलत होते." पूनम सांगत होती.

"मोठ्यांच्या पाया पडा. चला नवरदेव नवरी पुढे या. " गुरुजी बोलवत होते.

सोनल... आजींनी हाक मारली. ती पुढे आली. साडी सावरून ती ऋषी जवळ उभी राहिली. आर्या मधे लुडबुड करत होती. ती सोनलच्या साडीशी खेळत होती. ऋषी पुढे गेला त्याच्या मागे सोनल गेली. दोघांनी मोठ्यांच्या पाया पडल्या. दोघ पूजेला बसले. गुरुजी खूप छान पूजा सांगत होते. सोनल मनापासून ऐकत होती.

" हे बघा मॅडम तुम्ही साहेबांच्या हाताला हात लावा. दरवेळी सांगावं लागत." गुरुजी म्हणाले.

आता यांना हात कसा लावणार? सोनल विचार करत होती. तिचा परत हात पोहचत नव्हता. ती प्रयत्न करत होती. ती त्याच्या जवळ सरकली. तो अजून थोडासा बाजूला झाला. तिला कसतरी वाटलं.

यांना वाटेल मी यांच्या मागे लागले की काय? तिला हसु येत होत. ती कसतरी बसली. पूजा झाली. आरती झाली.

मोहनराव, मीनलताई मुलीच वैभव बघून खुश होते. यांच चांगलं होईल त्यांना विश्वास होता.

किचन मधे गडबड सुरू होती. थोड्या वेळाने जेवण झालं. यावेळी रसिकान कश्यात भाग घेतला नाही.

थोड्या वेळाने राजेश, रसिका घरी गेले. मीनलताई, मोहनराव घरी थांबले होते. ते सोनलला परत घेवून जाणार होते.

मामा मामी निघत होते. "ताई, ऋषीला सांग ना."

"ऋषी इकडे ये. मामा सोबत पोलीस स्टेशन मधे जा बेटा." आशाताई म्हणाल्या.

" का आता?" त्याने विचारलं.

" रिटा साठी. ती लवकर सापडायला हवी."

" कालच तर फोन केला. पोलीस त्यांच काम करत आहेत. काही समजल तर फोन येईल. सारख आठवण द्यायची गरज नाही. " ऋषी म्हणाला.

" अरे मामा काळजीत आहेत. "

" तस वाटत तर नाही. रिटाला शोधायच सोडून ते सारखे आपल्या कडच्या प्रोग्रामला का येत आहेत. " ऋषी म्हणाला.

"तुझ बरोबर आहे ऋषी अरे मी तुझ्याशी बोलायला आलो होतो. " सुरेश मामा म्हणाले.

ऋषी फोनवर बोलत होता. त्याने त्याच्या मॅनेजरला हे काम दिलं. " या पुढे तुम्ही मामा बरोबर रिटाला शोधायचं काम करा. "

" हो साहेब. "

" ठीक आहे का मामा? "

" हो थँक्यू." मामा, मामी निघाले

"अहो ऋषी आपलं ऐकत नाही. नुसत त्या सोनल आणि तिच्या घरच्यांच्या आजुबाजूला असतो." सुलभा मामी म्हणाल्या.

" हो ना. साधं पोलीस स्टेशन वर सुध्दा आला नाही. अजून आपल्याला बोलत होता. काय करणार त्याच्याकडे पॉवर आहे. पैसा आहे त्याच ऐकून घ्यावं लागत."

" त्यासाठी तर तो मोठा असून रिटाचं लग्न तिकडे जुळवत होते. ती मूर्ख मुलगी समजून घेत नाही. "

******

"सोनल हे सामान घे. देवीला ओटी भर. पूनम तिच्या सोबत रहा. " आजी म्हणाल्या.

" हो आजी. "

लता ताईंनी सोनल कडे पिशवी दिली. ते देवाला निघाले. यावेळी कार मधे ऋषी पुढे बसला होता. पूनम, आर्या, सोनल मागे होते.

पूनम, आर्या बोलत होत्या.

सोनल मागून ऋषी कडे बघत होती. यांच्याकडे बघून नुसती धडकी भरते. मला नाही वाटत ते कधी माझ्याशी बोलतील. नुसत सिरियस वातावरण करून ठेवलं आहे. माझं कस होईल समजत नाही? एक तर हे माझं दुसर लग्न आहे. मी इथे ही राहिली नाही तर आई, बाबा परत टेंशन घेतील.

माझं नशीब अस का आहे समजत नाही. पहिला नवरा नीट वागला नाही. त्याने प्रचंड छळ केला. दुसर ही हे अस. मी यांच सगळचं स्विकारल. त्यांच्या मुलीला ही आपल मानलं. पण ते मला काही स्विकारत नाहीत. पूजा करतांना ही कस केल साधा हात लागलेला ही त्यांना सहन झाला नाही. मी काय करू म्हणजे हे नॉर्मल होतील. काय होतय त्याची वाट बघावी लागेल. इथे नाही जमलं तर मी आई बाबा एकत्र राहू.

ऋषीने केस सेट करायला पुढचा आरसा खाली केला. त्याला आरश्यात सोनल दिसत होती. ती त्याच्या कडे बघत होती. तिने पटकन बाजूला बघितलं. त्याला कसतरी वाटलं. त्याने आरसा वरती केला.

ऋषी असल्याने सोनल शांत होती. आर्या बडबड करत होती. पूनम राघवचा विचार करत होती. कार मंदिराकडे निघाली होती.

******

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"


0

🎭 Series Post

View all