सोनेरी नात्यांची वीण भाग 35
©️®️शिल्पा सुतार
दीर्घ कथा लेखन स्पर्धा डिसेंबर जानेवारी 2025-26
पूजा झाली ते मंदिरात निघाले. ऋषीच्या वागण्याने सोनल दुखावली गेली होती. तो ओळख नसल्याने तठस्थ होता. ऋषी, आई आजीच ऐकेल का? सोनलच्या आयुष्यात आनंद, सुख येईल का? आता पुढे...
ते मंदिरात आले. मंदिराचा रम्य परिसर बाजूने वहाणारी नदी खूप छान होती. आर्याचा हात धरून सोनल चालत होती.
"चला फोटो काढू. चल दादा, वहिनी जवळ उभा रहा. आर्याला कडेवर घे." पूनम म्हणाली.
ऋषी ऐकत नव्हता.
"लग्नात ही किती बोर फोटो काढले. गप्प उभ रहा दादा. वहिनी जवळ सरक. थोड हसा. तुमच लग्न झालं आहे. अस अनोळखी असल्या सारखं वागताय की बास. थोड बोललं तरच एकमेकांसोबत कंफर्टेबल होणार ना. आता हे काय मी तुम्हाला सांगू? " पूनम बडबड करत होती.
"फक्त एक फोटो पूनम."
पूनमने बरेच फोटो घेतले.
" चला पूजा सुरू करा. मला उशीर होतो आहे." ऋषी मोठ्याने म्हणाला.
त्याचा आवाज ऐकून सोनलला धडधड होत होती. आधी पासून तिला तो त्रास होता. कोणी थोड जरी मोठ्याने बोललं तरी ती घाबरत होती. आयुष्यात इतक काही होवून गेलं होत ना. त्यामुळे ती अशी भित्री अबोल झाली होती. तिचे हात थरथरत होते. तिने स्वतः ला शांत केल. थोड पाणी पिलं. ऋषी इनामदार मला बोलत नाहीत ते पूनमला घाई करत आहेत.
ती पूजेचं सामान काढत होती. आर्या तिच्या जवळ होती. ती माहिती विचारत होती.
" चल आर्या इकडे ये." ऋषने तिला कडेवर घेतलं.
" डॅडी पूजा का करतात?" तिने विचारलं.
"आपण सुखी रहावं, शांत रहाव म्हणून. तू ही नमस्कार कर. चल."
" डॅडी मला प्रसाद हवा आहे ."
" थांब थोड. पूजा झाल्यावर प्रसाद मिळेल. घाई करायची नाही." ऋषी, आर्याशी छान बोलत होता.
गुरुजींना बोलवलं होत. पूजेची सगळी तयारी झाली होती. त्यांच्या हातून पूजा झाली. यावेळी आर्या ऋषी जवळ होती म्हणून बर झालं. तो पूर्ण वेळ तिच्याकडे बघत होता.
पूजा झाली. बराचं वेळ बसून बसून सोनलचे पाय दुखत होते. तिला उठता येत नव्हतं. कसतरी सामान घेवून ती उठली. तिचा थोडा तोल गेला. ती पडणार होती. बाजूला ऋषी होता. त्याने लगेच तिला आधार दिला. त्याच्या हाताला धरून ती नीट उभी राहिली.
"सावकाश." तो म्हणाला.
ते घरी परत निघाले. पूर्ण रस्ता भर सोनलला छान वाटत होतं. ती थोडी लाजली ही होती.
एवढं खुश होण्या सारखं काय आहे?... एक मन म्हणालं.
त्यांनी मला मदत केली... सावरलं... त्यांच्या हाताला धरून मी उभी राहिली... त्यांचा तो स्पर्श. खूप वेगळचं वाटलं... दुसर मन सांगत होतं.
इतर कोणी पडत असतं तरी त्यांनी सावरलं असत. त्यात काय एवढ स्पेशल?... पहिलं मन म्हणालं.
दुसर्या मन हे ऐकून परत शांत झालं. हवेत उडत होतं ते जमिनीवर आलं.
तुझ्यासाठी खास असं काही नव्हतं... समजल ना... जरा स्वप्नातून जागी हो... पहिल्या मनाने इशारा केला.
ती ऋषीकडे बघत होती. तो परत प्रॅक्टिकल झाला होता. ती आहे की नाही जसं. जावू दे होईल हळूहळू नीट. सोनलने स्वतः ची समजूत काढली.
ते घरी आले. आजी, मीनलताई, मोहन राव बोलत बसले होते. आर्या सगळ्यांना मंदिरात काय झालं ते सांगत होती. पूनमने सगळ्यांना प्रसाद दिला.
ऋषी, मोहनराव बोलत होते. मीनलताई आजीं सोबत होत्या. ते आशाताईंना भेटून आले.
"चला आम्ही निघतो. सोनलला घेवून जातो." मीनलताई म्हणाल्या.
" आजी?" सोनलने विचारलं.
"जा बेटा. उद्या आम्ही तुला घ्यायला येतो."
ती तीच सामान घ्यायला आत गेली. ती पाच मिनिटांनी बाहेर आली. आशाताईंच्या पाया पडली.
"पूनम मी येते ."
"लवकर ये वहिनी. दादा वाट बघत असेल." ती हळूच म्हणाली.
अस झाल अस असतं तर काय होतं? अजून माझा स्ट्रगल संपलेला नाही. तस ही मला पण काय हव आहे अजून समजल नाही. ऋषीला दोष देण्यात काही अर्थ नाही. त्यांची ही माझ्या सारखी अवस्था असेल. हो, नाही, मनात गोंधळ उडाला आहे. जूने पाश मी मागे सोडले आहेत. तरी नवीन स्विकारायला जड जात आहे. सुभाष... मला त्यांच्या बद्दल काही वाटत नाही. त्रास इतका दिला आहे. त्यांची आठवण नकोच.
आर्या तिच्याकडे बघत होती." मम्मी तू कुठे चालली आहेस?"
" मी माझ्या मम्मी कडे जाते आहे. " सोनलने सांगितलं.
"या आजी तुझी मम्मी आहे? " तिने विचारलं.
" हो. "
" ती उद्या परत येईल बेटा. "पूनम म्हणाली.
" मी पण मम्मी सोबत जावू का? सोहम ही तिकडे असेल ना? आम्ही खेळू." आर्या विचारत होती.
"चल." सोनल म्हणाली. आर्या आनंदाने तिच्या जवळ गेली.
"नाही..." मागून आवाज आला. सगळे ऋषी कडे बघत होते. "आर्या इकडे ये." तो म्हणाला.
"डॅडी, मी मम्मी सोबत तिच्या घरी जाते. " आर्या सांगत होती.
" नाही म्हटलं ना." त्याने तिला कडेवर घेतलं.
" डॅडी मला सोड. मम्मी..." तिने हाक मारली.
" अहो..." सोनलने हळूच हाक मारून बघितली. तिला माहिती होत ते ऐकणार नाहीत. तरी प्रयत्न केला.
तो आर्याला घेवून जिना चढत होता. आर्या तिकडून सोनल कडे बघत होती. सोनल पण आर्याकडे बघत होती. दोघींना वाईट वाटतं होतं. काय करणार. ऋषी समोर कोणाच काही चालत नव्हतं.
******
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
