Login

सोनेरी नात्यांची वीण भाग 37

ही सोनेरी नात्यांची वीण आहे हळूहळू उलगडणार
सोनेरी नात्यांची वीण भाग 37

©️®️शिल्पा सुतार

दीर्घ कथा लेखन स्पर्धा डिसेंबर जानेवारी 2025-26

सोनल माहेरी आली. आर्यासाठी तिला काळजी वाटत होती. पण ती काही करू शकत नव्हती. त्यात रसिका चिडली होती. तिने कशी तरी तिची समजूत काढली होती. आता पुढे...

सोनलने कपडे बदलले. तिने संध्याला फोन केला. शाळेत काय सुरू आहे ते तरी बघू.

" कुठे आहेस सोनल? दोन दिवस झाले शाळेत का येत नाही? " संध्या विचारतं होती.

" अग माझं लग्न झालं. सुट्टीचा अर्ज दिला होता. सगळं अचानक झालं. तुम्हा मैत्रिणींना सांगायचं राहून गेलं." सोनल सांगत होती. तिला ही त्या दिवशी संध्याकाळ पर्यंत माहिती नव्हतं की लग्न आहे. अजून मैत्रिणींना कुठे बोलवणार.

" तुझ खूप अभिनंदन. पाहूणे कुठले आहेत?" संध्याला माहिती होत हे सोनलच दुसर लग्न आहे म्हणुन तिने जास्त विचारलं नाही.

" गावातच सासर आहे. "

" तुझे मिस्टर काय करतात? "

" त्यांचा बिझनेस आहे. "

" उद्या शाळेत येशील ना? की जॉब सोडला? "

"हो. शाळेत येणार आहे ." सोनल म्हणाली. मला माझं बघावं लागेल. इतक ईझी आयुष्य आहे का?

" फिरायला जाणार नाही का? " संध्याने हसत विचारलं.

"नाही, तुला माहिती ना संध्या हे दुसर लग्न आहे. एवढं काही नाही." सोनल म्हणाली.

" असू दे, तुम्हाला ही एन्जॉय करायचा हक्क आहे. जिजुंशी मोकळ बोलं. दोन दिवस कुठे तरी जावून या. याच आठवणी असतात. नंतर आपण आपल्या कामात बिझी होतो. " संध्या म्हणाली.

" बघू नंतर. सध्या तरी मी काम सुरू करते आहे. " सोनल म्हणाली. या संध्याला काय सांगणार की आमच्या यांना माझ्यात... या लग्नात इंट्रेस्ट नाही. उगीच बळजबरी नको. अस ही ते कुठे कोणाच ऐकतात. त्यांच्या मनाप्रमाणे होवू दे.

" उद्या भेटू. पार्टी दे पण. " संध्या सोनल साठी खुश होती.

" हो नक्की."

सोनलने तीच सगळं शाळेचं सामान शोधलं. ती थोडा वेळ वह्या तपासत होती.

मी माझ काम सुरू करते. तिकडे घरी नाहीतरी काही काम नाही. बिझी बर आहे. उद्या आजी घ्यायला येतील वाटत. आर्या काय करत असेल? ती रडत होती.

मला तिकडे जावसं वाटत नाही. बाकीचे चांगले आहेत पण ज्यांच्याशी लग्न झालं तेच असे वागतात. सगळ्यांना एवढ वैभव दिसत. पण ते माझं नाही. मला माझी सोय करावी लागेल. तिथल्या कोणत्याच गोष्टीवर माझी सत्ता नाही. यांना माझ्या बद्दल काही वाटत नाही. बाबांची ट्रीटमेंट तरी होईल ना? मला काळजी वाटते आहे. राजेश दादाशी याबाबतीत बोलू का? नको. तो परत सगळं रसिका वहिनीला सांगून देईल. थोडा धीर धरला पाहिजे. थोडे दिवस बघू. नाही जमलं तर आई बाबांशी बोलू.

******

आर्या सारखी मम्मी, मम्मी करत होती. तिने थोडा अभ्यास केला. ती तिच्या छोट्याश्या बागेत खेळून आली. ऋषीने तिच्यासाठी वेगवेगळी खेळणी मागवून घेतली होती. तरी तिला करमत नव्हतं. ऋषी वैतागला होता.

" पूनम हिला खाली घेवून जा." त्याने मोठ्याने सांगितलं.

पूनम त्याच्या रूम मधे आली. "आर्या चल. काय झालं दादा? तू चिडचिड का करतो आहेस?"

" काही नाही महत्वाचा कॉल आहे ."

"वहिनी हिला नेत होती ना. तू का नाही म्हणालास? आता तिला नीट सांभाळतं ही नाही." पूनमने आर्याला कडेवर घेतलं.

" कोण लोक ते कुठे रहातात माहिती नाही. अस कस माझी लेक तिकडे जाईल? " ऋषी म्हणाला.

"तुझी बायको तर गेली ना? तिच्या बद्दल तुला काळजी वाटली नाही का?"

"तुला या बद्दल काही माहिती नाही पूनम. तू आर्याला घेवून जा बर. मला काम आहेत. " ऋषी म्हणाला.

"काय माहिती नाही? हेच ना वहिनीने तिच्या बाबांच्या ट्रीटमेंट साठी लग्न केलं. आजी त्यांना पैसे देणार आहेत. ठीक आहे ना. तिला तिच्या घरच्यांची काळजी वाटत असेल. एवढा राग येतो तर तू आता तिला परत आणू नकोस. पैसे देवून टाक. ती घरी नाही तर तुला ही करमत नाही वाटत. " पूनम म्हणाली.

" काहीतरी आपलं. हे अस माझ्याशी बोलायचं नाही. मला ह्या सगळया साठी वेळ नाही. " ऋषी लॅपटॉप कडे बघत म्हणाला.

" तु खूप छान वागतो आहेस दादा. एवढी चांगली बायको आहे. असच असत... देव देतो कर्म नेत." पूनम म्हणाली.

" माझ्याकडे बघण्या पेक्षा तू स्वतः च बघ पूनम. राघवची समजूत काढ. तुझा संसार वाचव. " ऋषी तिला ओरडला.

" तू ही दादा. हे तुझ दुसर लग्न आहे. जरा नीट वाग. चल बेटा आर्या आपण तुझे फेवरेट गाणे ऐकू." दोघी खाली आल्या.

" आत्तु मम्मी केव्हा येईल? " आर्या विचारत होती.

" ती तिच्या आईकडे झोपेल. उद्या येईल. तू जेवण कर मग आपण तिला फोन करू."

" हो चालेल. "

******

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"


0

🎭 Series Post

View all