सोनेरी नात्यांची वीण भाग 41
©️®️शिल्पा सुतार
दीर्घ कथा लेखन स्पर्धा डिसेंबर जानेवारी 2025-26
ऋषी, सोनल, पूनम सगळेच कामाला लागले. राघव दिल्लीला गेला होता. त्याने त्याबद्दल पूनमला काही कल्पना दिली नव्हती. ती नाराज होती. कोणी कोणाशी नीट बोलत नाही. यांच कधी नीट होणार आहे? आता पुढे...
सोनलने शाळेत खूप काम केलं. सगळ्या मैत्रिणी भेटल्या.
" वाह तू किती सुंदर दिसते आहेस सोनल. मंगळसूत्र तुला शोभत."
" आज साडीत ही छान दिसते आहे ना."
" बर झालं तुझ सासर गावात आहे. म्हणजे जॉब ही करता येईल."
"तुझ्या मिस्टरांचा फोटो दाखव."
मैत्रिणी नुसत्या तिला घेरून उभ्या होत्या. त्यांच्या बोलण्याने सोनल लाजली होती. अशी ती अजूनच सुंदर दिसत होती. याच मैत्रिणी आहेत ज्या कौतुक करतात. टेंशन कायम मागे आहेच.
" माझ्याकडे यांचा फोटो नाहिये ." सोनल हळूच म्हणाली.
"अस कस शक्य आहे? लग्नात फोटो काढले असतिल ना."
"हो फोटो ग्राफर पाठवतील तेव्हा देते. सगळं फार घाईत झालं."
"ओह त्यांना घाई होती. म्हणजे त्यांनी सोनलला बघितलं. डायरेक्ट दुसर्या दिवशी लग्न."
" जिजुंचा फोटो सोनलच्या हृदयात असेल. "
बाकीच्या हसत होत्या.
" अग मग ती आहेच तितकी गोड, हवीहवीशी. फिरायला जावून या. तिकडे काय झालं ते आम्हाला सांग. "
सगळ्या पार्टी मागत होत्या. लग्न झाल्या बद्दल विचारत होत्या. सगळीकडे सोनल बद्दल चर्चा होती.
बापरे या मुली काहीही बोलतात. नुसतं हसवतात. सोनलला खूप छान वाटत होतं. माझं आयुष्य अस असतं तर किती छान झालं असतं. हलकंफुलकं. काहीच टेंशन नाही. आजुबाजूला नुसत प्रेमच प्रेम. पैशाची काळजी नाही. आई, बाबा, दादा, वहिनी सगळे सुखी. अस होवू शकत नाही. जावू दे. ती तिच्या विचारातून बाहेर आली.
तिने तीच लग्न कोणाशी झाला आहे ते विशेष सांगितलं नाही. मधेच ऋषी बद्दल विचार करून तिला जरा टेन्शन येत होतं.
इंटरनेट वर बिझनेस टायकुन ऋषी इनामदार यांचे फोटो असतील. नको पण. कोणाला फोटो का दाखवा. डॅशिंग, स्मार्ट, हॅन्डसम, पाषाण हृदयी. नुसते दिसायला भारी. वागायला तेवढे कठिण ऋषी. दुरून डोंगर साजरे. ब्रॅन्डेड कपडे, घड्याळ, शूज, गाड्या, त्यांची टीम, काय नाही.
हमममममम गोड बोलण नाही, सॉफ्ट वागणं नाही. दया माया नाही. फक्त एक दोघींवर प्रेम. त्यांची आई, आजी, लेक, बहीण आणि बहुतेक पूर्व पत्नी ही असेल. मला अजून माहिती नाही. बाकीचे आम्ही खिचगणतीत नाही.
आज घरी जाव लागेल. कठिण आहे. मला त्यांच्या समोर काही सुचत नाही. तिथून शाळेत यायला सुचेल ना. ते घर लांब आहे. पैसे ही थोडे जास्त लागतील. मी काय काय करू? बाबांचे औषध, स्वतःचा खर्च, आता हा रिक्षासाठी खर्च. ऋषीच्या आजी, बाबांसाठी कधी पैसे देणार आहेत? काल ही त्यांना किती दम लागला होता. ती काळजीत होती. मागणार तरी कस?
दुपारनंतरचा वेळ तिचा पेपर सेट करण्यात गेला. एक-दोन क्लास मध्ये तिने तास घेतला. रोजप्रमाणे वेळ गेल्याने तिला बरं वाटत होतं. चला आता आजी येतील. ती पटकन घरी आली.
संध्याकाळी आजी आल्या. त्यांच्या सोबत आर्या होती. सोनल नुकतीच शाळेतून आली होती. मम्मी... तिला आवाज आला. ती पटकन बाहेर आली. आर्या पळत येवून तिला भेटली.
ओह माय गॉड, आजींनी हिला का सोबत आणलं? यांना समजलं तर माझं काही खर नाही. "आजी अहो आर्या?"
"घे बाई तुझी लेक. काल पासुन इतक त्रासून सोडल ना. नुसत मम्मी मम्मी करते. आता भेट."
" आजी, आर्याला इकडे आणलेलं घरी आवडेल का?" सोनल टेंशन मधे होती. कालच तर त्यांनी माझ्या कडून आर्याला अक्षरशा ओढून घेतलं. ती किती रडत होती तरी ऐकलं नाही. तिला इकडे येवू दिले नव्हते.
" त्यात काय मी आहे ना." आजी म्हणाल्या.
" सोनल अग आजींना आत तर येवू दे." मीनलताई त्यांना घ्यायला आल्या.
ड्रायवर मिठाई, फळ घेवून आला. रसिकाने ते आत घेतले. तिने पटकन चहा ठेवला. आर्या, सोहम खेळत होते. रसिकाने त्यांना खावू दिला. सोनल तयार झाली.
आजी, मीनलताई बोलत बसल्या होत्या.
" सोनलने शाळा जॉईन केली. मी तिला म्हटलं होत. अग घरी विचार. तर कुठे काय? तिने फोन केला नाही." मीनलताई म्हणाल्या.
"असू द्या हो. काही होत नाही. तीच काम आहे ती करणारच." आजी म्हणाल्या.
रसिकाने चहा दिला.
"आम्ही निघतो. सोनल आवर बेटा." आजींनी आवाज दिला.
सोनल बाबांशी बोलत होती. तिने त्यांचे औषध टेबल वर ठेवले. ते आजींनी बघितलं. लेक निघाली म्हणून मोहनराव थोडे गप्प झाले होते. मीनलताई सोनलला भेटल्या.
" नीट रहा सगळ्यांना सांभाळून घे. जरा विचारून इकडे तिकडे करत जा."
"हो आई."
" पोरांकडे बघा आजी. अजून विशेष ओळख नाही." मीनलताई म्हणाल्या.
"हो ना. मी आहे तुम्ही काळजी करू नका." आजी त्यांच्याशी बोलत होत्या.
सोनल आत आली. " रसिका वहिनी मी येते. हे बघ चिडू नकोस. आईच चुकलं ग. तिच्या मनात काही नसतं. आता मी नाही ना म्हणून ती तुझ्याशी बोलायला आली असेल. समजून घे. तुला काही वाटलं तर मला फोन कर. "
" हो सोनल ताई काळजी करू नका. बाबांची ट्रीटमेंट? " रसिका विचारत होती.
"मी आहे ना. आपण मिळून त्यांच्याकडे बघू. तस मी घरी बोलते. पण थोड थांब. नवीन लग्न झालं आहे. आजी चांगल्या आहेत त्या स्वतः हून पैसे देतील. राजेश दादाकडे ही माझ लक्ष आहे. "
ते घरी आले. आर्या खूप खुश होती. तिची टीचर आली होती. ती होम वर्क करत होती.
सोनलने विद्या मॅडमला चहा दिला. दोघी बोलत होत्या." तुम्ही सिलॅबस प्रमाणे जातात की असच शिकवतात."
" सिलॅबस प्रमाणे शिकवते आणि इतर ही मॅनर्स, भाषा वगैरे."
" खूप छान. " सोनल बाहेर येवून बसली. ट्यूशन टीचर गेली.
आर्या तिथे हॉल मधे खेळत होती. "मम्मी तू कुठे गेली होती?"
"मी शाळेत गेली होती."
"का?"
" मी टीचर आहे."
"जशी आमच्या स्कूलमध्ये माझी टीचर आहे अनघा टीचर, ही विद्या टीचर तशी तू आहेस का?"
" हो मी मोठ्या मुलांना शिकवते."
आर्या खूप कौतुकाने सोनलकडे बघत होती. "मम्मी तू खूप हुशार आहेस. पण मला तुझा राग आला आहे. तू त्या आजीकडे का गेली? "
" सॉरी बेटा. आता तुला घेवून जाईल. तुझी आत्तू कुठे गेली? " सोनल बघत होती घरात शांतता आहे.
"आत्तु ऑफिसला गेली." आर्याने सांगितलं.
ओह, पूनम जॉब करते वाटतं. स्वतः च्या ऑफिस मधे काम असेल. कारने जायचं, कारने यायचं. तिथे ही किती लोक पुढे मागे असतात. भारी आहे. आमच्या सारखं नाही... दर पाच मिनिटाला परिस्थिती दणके देते.
******
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
