सोनेरी नात्यांची वीण भाग 42
©️®️शिल्पा सुतार
दीर्घ कथा लेखन स्पर्धा डिसेंबर जानेवारी 2025-26
सोनल सासरी आली. आर्या खुश होती. आजी ही निश्चिंत होत्या. रोजचे काम सुरू होते. पूनम ऑफिसला गेली होती. तिला समजल होतं मोकळ बसुन काही होणार नाही. आपलं काम बघितलं पाहिजे. आता पुढे...
"आज खरच छान काम झाल मॅडम." जाधव समोर बसले होते. पूनम फाईल बघत होती.
"हो ना जाधव साहेब तुम्ही खूप छान ट्रेनिंग घेतात. इथे करण्यांसारखे खूप आहे." पूनम म्हणाली.
" हो मी तुम्हाला छान ट्रेन करेल. ऋषी साहेबांना सपोर्ट हवा आहे. निदान तुमची कंपनी तरी तुम्ही बघाल. "
" हो बरोबर आहे. आता अजिबात मागे वळून बघायच नाही. वेळ वाया घालवायचा नाही. " पूनम म्हणाली. आज तिला खरच बर वाटत होतं. मी माझ काहीतरी करते आहे.
थोड्यावेळाने पुनम ऑफिसहून आली. ती नुसती बसलेली होती. गप्प एकदम उत्साह नसल्या सारखी. माहेरी किती ही सुबत्ता असली तरी मला इथे करमत नाही.
कितीही नाही ठरवलं तरी ती राघवचा विचार करत होती. जावू दे तो त्याच्या कामासाठी दिल्लीला गेला असेल. येईल. पण तो असा का वागतो. तो खरच रागावला आहे का? हो वाटत. मी आता त्याला स्वतः हून फोन करणार नाही. त्याला खरच अस वाटत असेल का की मी कमीपणा घेवून घरी जावं. तसचं करू का? घरी परत जावू का? त्याने काय होईल प्रॉब्लेम संपले नाहीत. मला अस वाटत की राघवचा माझ्यातला इंट्रेस्ट संपला आहे. अस असेल तर त्याने स्पष्ट सांगावं. मी त्याला डिस्टर्ब करणार नाही. आता मी माझ्या काही अटी टाकून त्याच्याशी बोलेल.
मी तिकडे रहायला गेली आणि अस जर मी दिवसभर ऑफिस मधे बिझी असेल तर त्याच्या घरच्यांशी कमी संपर्क येईल. पण कायम अस थोड असेल? मी त्याच्या घरच्यां पासून पळ काढू शकत नाही. पुढे मूल होतील. त्यावेळी तर थोडा ब्रेक घ्यावा लागेल. त्यांच्या कडे रहावंच लागेल. सामंजस्याने हा प्रश्न सोडवायला हवा.
"लताताई चहा." तिने आवाज दिला. त्यांनी तिला चहा दिला.
" हाय पूनम." तिचा आवाज ऐकून सोनल पुढे आली.
"अरे वाह वहिनी तू आलीस."
" हो आजी, आर्या आमच्याकडे आल्या होत्या. मला वाटलं का तू सासरी गेलीस की काय? भाऊजी तुला येवून घेवून गेले असतील. आता झाले ना तीन चार दिवस? ते कसे रहात असतिल. त्यांना तुझी खूपच आठवण येत असेल." सोनल तिला चिडवत होती.
पूनमचा चेहरा सिरियस दिसत होता.
सोनल तिच्याकडे बघत होती. हिला काय झालं काही समजत नाही. मी सासरी आल्यापासून तिच्या नवऱ्याला एकदाही बघितलं नाही. फोन ही नाही.
" वहिनी एक सांगू, माझं आणि राघवचं भांडण झालेलं आहे. मी आता इथेच रहाते आहे. प्रॉब्लेम नीट झाल्या शिवाय मी सासरी जाणार नाही. "
" सॉरी, मला माहिती नव्हतं." सोनल म्हणाली.
" हो ग माफी का मागतेस. तुला कस माहिती असणार."
" नक्की काय झालं आहे विचारू शकते का?"
"हो सांगेन आरामात." पूनम आत गेली.
सोनल काळजीने तिच्याकडे बघत होती. नवर्याशी वाद झाले तर कस होतं हे तिला चांगल माहिती होतं. कोणाचा आधार नसतो सगळे बिचारी म्हणून बघतात. माहेरी ही सगळीकडेच समजतं. त्या लोकांच्या नजरा. नको वाटत. खूप त्रास होतो. चुकी नसतांना दोषी ठरवलं जातो. एक माणूस म्हणून सुने कडे का बघितलं जात नाही?
आपण म्हणतो हा समाज पुढारलेला आहे. पण अस काही नसतं. आपल्या मागे ते सगळे आपल्याला नाव ठेवत असतात. ही नवर्याने टाकलेली बाई आहे. हिच्यात दोष असेल. काही का असेना नवर्याचं घर सोडायचं नव्हतं.
अरे यात चॉईस असतो का. कोणी स्वतः हून घर सोडून येत का. काहीही बोलायचं?
सुभाषने तिचा खूप छळ केला होता. दोष नसतांना तिला बर्याच वेळा रात्री अपरात्री घराबाहेर काढल होतं. ती सासरी नुसती घाबरून असायची. अश्या त्रासदायक लोकांना सोडलेलं बर.
लग्नाच्या पंधरा दिवसापासून हा त्रास सुरू झाला. सासुबाईंनी तिला कधी समजून घेतलं नाही. सुभाषच्या घरचे एका बाजूला ही एकटी एका बाजूला होती. तो कंपनी मधे कामाला होता. सकाळी जायचा तर रात्री यायचा. आल्यावर ही बराच वेळ आईजवळ पुढे बसुन असायचा. आत येतांना तो चिडलेला असायचा.
सासुबाईंच्या बर्याच कंप्लेंट होत्या. ती शाळेत जाते ते आवडत नव्हतं. स्वयंपाक नीट होत नाही. साफसफाई करत नाही. कपडे निघत नाहीत. हे नाही ते नाही. काय बोलणार अस होतं.
"तू सगळं काम करून मग शाळेत का जात नाहीस सोनल?" सुभाष रागाने म्हणाला.
"अहो मी सगळं आवरून जाते. तुम्ही बघताय ना. सकाळी सातला माझा स्वयंपाक झालेला असतो. कपडे ही धुवून होतात. काहीच बाकी ठेवत नाही." सोनल कसतरी म्हणाली.
"तस तर वाटत नाही. नंतर आई सगळं करून घेते. तीच ही वय झालं. घरी सून आहे तरी तिला आराम नाही." सुभाष चिडला होता.
" ते मला ही समजत. मला ही सासुबाईंची काळजी आहे. घर आहे तर थोड तर कराव लागेल ना. जस स्वतः च्या हाताने जेवायला घेणं. तेवढच तर बाकी असतं. सुन नोकरी करते तर अस होणारच." सोनल म्हणाली ते बरोबर होत. इतके दिवस तर घरातले सगळे सगळं काम करत होते ना. माझं लग्न झाल्या पासून त्यांना सगळया गोष्टीचा प्रॉब्लेम होता. उगीच त्रास द्यायचा. सुनबाई म्हणजे मोलकरीण नाही ना. तिला तुमच्या सेवेसाठी आणली नाही.
" तुझ्या नोकरीची मला गरज नाही. घरी रहायचं. आई म्हणेल ते करायच. " सुभाष ओरडला. त्याचा इगो दुखावला गेला होता. ही मला तिच्या नोकरीच बोलून दाखवते. तू कोण आहेस. माझी बायको. माझ्या समोर दबून रहायचं. हळू आवाजात बोलायचं. मी, माझ्या घरचे यांच आधी बघायचं. मी तुला पोसू शकतो. मी म्हणेल ते हिने ऐकायला हवं.
यावरून मेन भांडण सुरू झालं. रोज तेच होतं. कामाला जावू नकोस हेच सुभाषने लावून धरलं होत. तो सोनल वर खूप जोर करत होता. घरच्यांचा पाठिंबा होता.
सोनल ऐकत नव्हती. ती एकटी लढत होती. शाळेचा जॉब चांगला होता. निदान हातात थोडा फार पैसा येत होता. त्यात आई, बाबांची ट्रीटमेंट होत होती. नाहीतरी राजेश दादा त्यांच काही करत नव्हता. तिला ही ती हव ते घेत होती. तिचा वेळ जात होता. नाहीतर पूर्ण वेळ घरी कस रहाणार? एवढं त्रासदायक वातावरण होतं. गैरसमज वाढत होते.
******
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
