Login

सोनेरी नात्यांची वीण भाग 46

ही सोनेरी नात्यांची वीण आहे हळूहळू उलगडणार
सोनेरी नात्यांची वीण भाग 46

©️®️शिल्पा सुतार

दीर्घ कथा लेखन स्पर्धा डिसेंबर जानेवारी 2025-26

ऋषी किती चिडला असला तर सोनल समोर तो गप्प बसला. सोनलने ही थोडं समजुतीने घ्यायच ठरवलं. मला आता माझं बघाव लागेल. तिला आई बाबांना अजून टेंशन द्यायच नव्हतं. त्यांच नातं पुढे जाईल का? पुढे बघू...

सकाळी सोनल लवकर उठली. ऋषी झोपलेला होता. ती हळूच खाली आली. गेस्ट रूम मधे तीच सामान होतं. ती लगेच आंघोळीला गेली. आज तिला बर वाटत होतं. हे घर माझ आहे अस थोड तरी वाटतं होतं. ऋषी बोलत नव्हते तर परक वाटत होत.

ती तयार झाली. ती किचन मधे आली. लताताई स्वयंपाक करत होत्या. "मॅडम झालं आहे पाच मिनिट द्या." त्या म्हणाल्या. त्यांना माहिती होत ती लवकर शाळेत जाते.

"द्या मी पोहे करते."

"नको मॅडम असू द्या."

तिने पोहे केले. आर्यासाठी थोडे पोहे कमी तिखट केले.

"हे थोडे आईंना देवू का?" तिने विचारलं.

" मला माहिती नाही. आजींना विचारा." लताताई म्हणाल्या.

" दे ना, अग तीच नाही म्हणायची. " आजी आत येत म्हणाल्या. अगदी दोन तीन घास पोहे आजींनी आशाताईंना दिले. त्यांना खूप आवडले.

"सोनलच्या हाताला चव आहे." त्या कौतुकाने म्हणाल्या. आज त्यांनी शिरा ही पटकन खाल्ला.

सोनल तयार होती. तिने डबा भरला.

" गुड मॉर्निंग वहिनी. " पूनम तिला शोधत आली.

"गुड मॉर्निंग पूनम."

" मग... काय म्हणतेस? " पूनम तिच्याकडे बघत होती.

" कुठे काय?" सोनल तिच्या कामात होती.

" कोणाला अस वाटत की आम्हाला काही माहिती नाही. हो ना. " पूनम म्हणाली.

आता सोनल हसत होती. ती पाण्याची बाटली भरत होती. पूनम भेटू नये म्हणून ती घाईने आवरत होती. शेवटी व्हायचं ते झालं.

" सरक ना पूनम काय ग अस. आर्या उठली का?"

"विषय बदलू नकोस वहिनी. थोड तरी सांग. कोणीतरी काल दादाच्या रूम मधे होतं. " पूनम हसत म्हणाली.

तिचा दादा इतका प्रेमळ आहे का? कसतरी जीव मुठीत घेवून काल तिकडे गेली होती. पण बर झालं ते मला काहीच म्हणाले नाहीत. म्हणून मला आज इतका काॅन्फीडन्स आला. जरा बर वाटत आहे.

हे माझ्याशी थोड बोलले ही. यांना माझ्या जवळ राहायच आहे का? ती थोडी लाजली होती. तीच आधी लग्न तर झालं होतं. पण प्रेमाचा असा अनुभव तिला नव्हता. लहान घर ते किचन मधे झोपायचे. कसतरी उरकायच म्हणून सुभाष तिला हात लावायचा. अर्धा वेळ ते भांडत असायचे. हा असा खोलीतला एकांत ऋषी आणि मी. ती पहिल्यांदा अनुभवत होती. ती खुश होती.

सोनल पटकन किचन मधून बाहेर आली. बापरे ही पूनम डेंजर आहे. मला किती चिडवते आहे. ती आर्याच्या रूम मधे गेली. पूनम मागे आली.

" मी तिला तयार करून शाळेत पाठवेल वहिनी. तुला दादाकडे बघायच तर जा. "

"मी शाळेत जाते आहे पूनम. इथून रिक्षा बस मिळेल का?" तिने विचारलं.

" आपली कार आहे ना. नाहीतर दादाला सांग. तो शाळेत सोडून देईल. आता काय बाई वहिनी म्हणेल ती पूर्व दिशा."

" पूनम... पुरे. मी माझी माझी जाते. " ती हॉल मधे आली.

" अग कार ने जा. " आजी म्हणाल्या.

" तुम्हाला लागेल ना?"

"किती तरी कार आहेत. तु तयार हो .मी काकांना सांगते."

पोहे खावून ती निघाली. शाळेत पोहोचली.

आर्या थोड्या वेळाने उठली." मम्मी? "

" ती शाळेत गेली."

ती ही तयार होती. ती शाळेत गेली.

ऋषी उठला होता. तो सोफ्याकडे बघत होता. सोफा नीट केलेला होता. ब्लँकेटची घडी घालून ठेवली होती. सोनल नक्की खाली असेल. किती वाजले. बराच वेळ झाला. तो पटकन तयार झाला. खाली आला. पूनम बसलेली होती.

तो इकडे तिकडे बघत होता." आर्या शाळेत गेली का?"

"हो आर्या आणि वहिनी दोघी शाळेत गेल्या. वहिनी शाळेत टीचर आहे माहिती आहे ना?" पूनमने विचारलं.

ऋषीने हो अशी मान हलवली. "तू ऑफिसला येतेस का?"

" हो दादा मी हे ट्रेनिंग पूर्ण करणार आहे. पुढे ही काम करणार आहे. खरच बिझी असल की इतर राग वगैरे काही येत नाही. "

" हो ते आहेच. मला ही मदत होईल. "

" जाधव फारच हुशार आहेत दादा. मी लवकरच काम शिकेल. "

आजी आल्या. तिघे नाश्ता करत होते.

"पोहे खूपच छान झाले आहेत. वेगळीच चव आहे. " ऋषी म्हणाला.

"सोनलने केले आहे. तिखट नाही ना?" आजी म्हणाल्या.

" नाही, एकदम छान आहे."

आजी राघव बद्दल विचारत होत्या. पूनम सांगत होती.

ऋषी आशाताईंना भेटायला आला. त्या पेपर वाचत होत्या.

"अरे वाह आई आज पेपर वाचते आहेस. "

" मी आज थोडेसे पोहे ही खाल्ले. त्रास तर नाही ना होणार? " आशाताई म्हणाल्या.

" छान आई, तुला वाटत ते करत जा. थोड खात जा. काही होणार नाही. चल थोड फिरते का?"

"नको. संध्याकाळी बागेत बसेल. तेव्हा आर्या ही असते. सोनल ही शाळेतून येईल. मला ना आजकाल छान वाटत. सोनल फार चांगली मुलगी आहे. ती मला फार जपते." आशाताई सोनल बद्दल खूपच बोलत होत्या. ऋषी ऐकत होता. त्याला बर वाटलं.

पूनमला तिच्या ऑफिस मधे सोडून ऋषी ऑफिसमध्ये आला. मेहता ग्रुप ऑफ कंपनीज मधून लोक मीटिंगसाठी आलेले होते. तो बिझी होता. मनीष सोबत होता. मीटिंग खूप छान झाली.

" या वीकेंडला आमच्याकडे पार्टी आहे तुम्ही या." त्यांनी ऋषी आणि मनीषला आमंत्रण दिलं.

मामाचा फोन आला. "रिटा सापडली आहे. मी तिला घ्यायला जातो आहे. तू येतोस का?"

" नाही जमणार. माझा काय संबंध? " ऋषी तोडून बोलला.

" अरे पण ऋषी. "

" मी मीटिंग मधे आहे. " त्याने फोन ठेवला.

या मामाच काहीही सुरू असतं. ती रिटा सापडली तर काय तिची आरती करणार? खूपच चांगला काम करून आली जशी. आता जे काही आहे ते सोनल बरोबर. मोठ्या मुश्किलीने मी मनाला तयार केलं आहे.

पुनमने काम सुरू केलं. जाधव सांगत होते. ती फाईल ती बघत होती. राघवचा फोन आला. ति डोक्यावर थंड पट्टी ठेवून त्याच्याशी व्यवस्थित बोलली.

" माझं काम लवकर संपेल. मी तीन-चार दिवसात येईल." राघव म्हणाला.

" चालेल, घरी आला की जमलं तर मला भेटायला ये."

"ऑफिस काम काय म्हणतय?"

ट्रेनिंग सुरू आहे. आहे ते समजून घ्यायचा प्रयत्न करते आहे."

" तुला जमेल तू हुशार आहेस." राघव मनापासून म्हणाला.

दोघ छान बोलत होते. थोड्या वेळाने पूनमने फोन ठेवला. अस न वाद घालता बोललं की बर वाटत. अपेक्षा ठेवली की तिथेच बिनसतं. तू असाच करतोस, तसाच करतोस पेक्षा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा बोलायचं. सगळं नीट होईल.

******

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"