सोनेरी नात्यांची वीण भाग 50
©️®️शिल्पा सुतार
दीर्घ कथा लेखन स्पर्धा डिसेंबर जानेवारी 2025-26
ऋषी, सोनलच्या नात्याला सुरुवात होतं आहे. दोघ ही समजूतदार आहेत. त्यांच पटेल का? आर्या बरोबर ते सुखी होतील ना? की येईल आणखी काही ट्विस्ट? आता पुढे.
ऋषी माया बद्दल सांगत होता. ते ऐकून सोनल ही हळवी झाली होती.
ही खरच खूप चांगली आहे. दुसर्या बद्दल वाईट विचार करत नाही. तिला आधीच्या नवर्याने हिला का त्रास दिला असेल? विचारू का? नको तिला आवडणार नाही. पण मोकळ बोलायला हवं. परत त्या चुका व्हायला नको. काल ही मी पण कसा वागलो. आर्या तिच्या घरी गेली होती त्याबद्दल किती बोललो.
" सॉरी. " तो म्हणाला.
" का? "
" ते मी काल आजी जवळ खूप बोललो."
" आर्या बद्दल ना? काही हरकत नाही. मुलीची काळजी सगळ्यांना वाटते. त्यात आम्ही ओळखीचे नाहीत. आजकाल कोणावर विश्वास ठेवण्या सारखा काळ नाही. तुम्ही बरोबर केलं. मुलींना जपलं पाहिजे. कोणी का असेना विश्वास ठेवायचा नाही. " सोनल म्हणाली
" आधी तुझ्या आयुष्यात काय झालं होतं? म्हणजे वाटलं तर सांग. "
" आमच्यात खूप गैरसमज होते , घरी जनरेशन गॅप होता , त्यांना भरपूर हुंडा हवा होता. आई बाबांना तो देणं शक्य नव्हतं. सगळेच प्रॉब्लेम होते. त्यांना माझा जॉब आवडतं नव्हता. घरचं नीट आवरलं जात नव्हतं म्हणत होते. " सोनलने थोडक्यात सांगितलं.
" एक विचारू? काही काहींना हे घरकामाच काय आहे? माणूस महत्वाचा की काम? " ऋषी म्हणाला.
" त्यांना घरकाम महत्वाचं वाटतं. त्यासाठी ते दुसर्याला अति त्रास देतात. टोचून बोलतात जगणं मुश्किल करतात. "
" पूनमच्या घरी असं आहे. सारख घरकाम होत नाही म्हणून तिच्या घरच्यांचा ओरडा असतो . मदतनीस त्यांना आवडत नाही. स्वतः करत नाही. सगळं सुनेने करायचं. तिला काही काम नाहीत का? " ऋषी म्हणाला.
" तुमच्या सारखे समजून घेणारे फार कमी असतात. बहुतेक सगळीकडे असच त्रासदायकच वातावरण असत. अश्या लोकांचे विचार अगदी खराब असतात. दुसर्याला कमी समजणे. त्रास देणे एवढच येत. कोण बरोबर कोण चूक याचा निर्णय त्यांना घेता येत नाही."
" तुझा नवरा? तो का अस करत होता? तुमच्यात प्रेम नव्हतं का? "
" नाही, प्रॅक्टिकल आयुष्य होतं. घरचे म्हणतील ती पूर्व दिशा. " सोनल सांगत होती.
" हे फार एकतर्फी झालं. "
" हो तसच असतं. सूनबाई आपल्या सेवेसाठी आणली आहे असा समज जो पर्यंत आपण मनातून काढत नाही तो पर्यंत हा सासुरवास कमी होणार नाही."
"तुझ्या आयुष्यात काय झालं ते जावू दे. यापुढे टेंशन न घेता रहा. आपण मैत्री करू या का?" त्याने विचारलं. त्याला समजत होतं हिचे माझे विचार जुळतात.
" हो." ती म्हणाली. यांनी एवढं कसं समजुतीने घेतलं. तिला बर वाटत होतं. ते चांगले आहेत. अचानक लग्न झालं. त्यामुळे सुरवातीला त्यांचा ही गोंधळ उडाला असेल. सोनल विचार करत होती.
" तिथे सोफ्यावर झोपता येत नसेल तर तिकडे कॉटवर झोप." ऋषी म्हणाला.
ती त्याच्याकडे बघत होती.
"नाही म्हणजे माझ्या बाजूने काळजी करू नकोस. मी बरोबरीच्या नात्यावर विश्वास ठेवतो. दोघी बाजूने बळजबरी मला आवडत नाही. " ऋषी म्हणाला.
" तुम्ही चांगले आहात मला माहिती आहे. मी सध्या तरी इथे ठीक आहे. " ती म्हणाली.
ऋषी काही म्हणाल नाही. त्याला फोन आला होता. तो लॅपटॉप घेवून बसला. सोनल झोपली होती. त्याने थोड्या वेळाने तिला नेहमी प्रमाणे ब्लँकेट दिलं.
ही पांघरुण ही नीट घेत नाही. ती एकीकडे ब्लँकेट दुसरीकडे.
दुसऱ्या दिवशी सोनलच्या आधी ऋषी उठला होता. तो अजूनही ऑफिस काम करत होता.
"तुम्ही झोपले होते की नाही?" तिने उठल्या बरोबर विचारलं.
ऋषी फक्त थोड हसला. असचं असतं. एवढा मोठा बिझनेस सगळ्यांना दिसतो. त्यामागे इतकं काम असतं. मेहनत लागते. काही सुचत नाही. दिवस रात्र एकत्र करावे लागतात.
ती आंघोळ करून आली. तिची तयारी झाली. ती तीच सामान घेत होती. खालून चहा आला. ऋषी बाल्कनीत बसला होता. तो चहा साठी बोलवायला आला.
सोनल बाल्कनीत गेली. नुकतीच आंघोळ झालेली ती अतिशय फ्रेश दिसत होती. केस धुतलेले. गुलाबी व्हाइट डिझाईनची व्यवस्थित नेसलेली साडी तिला शोभत होती. काहीच मेकअप नाही. चेहर्यावर ओल्या केसांच्या बटा आलेल्या होत्या. त्या ती सावरत होती. गोर्या गळ्यावर काळ्या मण्यांचं मंगळसूत्र फार सुंदर दिसतं होतं.
ती चहा देत होती. ऋषी तिच्याकडे बघत होता. तो दोन मिनिट भान हरपला.
तिने त्याच्याकडे बघितलं. "अहो... चहा..."
तो त्याच त्याच हसत होता. सोनलच आजुबाजूला असणं मॅगनॅटीक आहे. समोरच्याला काही सुचत नाही. तिचे गुण, तीच दिसणं बघत बसायचं. बहुतेक चांगले लोक सोबत असले की चांगलं वाटतं.
"सकाळी इकडे बाहेर छान वाटत ना." सोनल बागेकडे बघत म्हणाली.
"हो." ऋषी म्हणाला.
दार वाजत होत. आर्या आली होती.
"डॅडी..." गोड आवाज येत होता. ऋषीने दरवाजा उघडला.
"गुड मॉर्निंग माय प्रिन्सेस. आज तू लवकर उठली."
"हो. मम्मी कुठे आहे?"
त्याने तिला कडेवर घेतलं.
" डॅडी मला खाली सोड ना. मला मम्मीला भेटायचं आहे. वॉव मम्मी तू छान दिसते. मला वाटलं तू आजीकडे गेली की काय?" आर्या म्हणाली. तिच्या मनात भीती बसली होती.
" मी सारखी आजीकडे जाणार नाही बेटा. चल इकडे ये." सोनलच्या जवळ बसून ती बिस्किट खात होती. तिच्या केसांना हात लावत होती. साडी किती छान आहे. " मम्मी तू साडी का नेसली?"
" मी शाळेत जाते आहे बेटा."
"मम्मी तू ब्यूटीफूल आहेस. मी मोठी झाली की असच दिसेल. टीचर होईल. " आर्या म्हणाली.
" डॅडी सारखं ऑफिसला नाही का जाणार? आपल्या लग्नाआधी पर्यंत ती ऑफिस... ऑफिस खेळायची. आता लगेच मम्मी सारखी टीचर होणार का? " ऋषी सांगत होता. त्यांचा चहा झाला.
" मला उशीर होतो आहे. मी निघते. " सोनल, आर्या खाली आल्या.
पूनम तिला शोधत होती. "ही वरती केव्हा आली?"
" आत्ताच. "
"चल आंघोळ कर आर्या. उशीर होतो आहे. वहिनी तू एवढी सुंदर बनून कुठे जाते आहेस?"
"शाळेत पूनम. "
" मला वाटलं का दादा सोबत फिरायला जाते आहेस. "
" काहीही. मी कुठे इतकी तयार झाली? रोजची साडी आहे." सोनल हसत होती.
" आमच्या नजरेतून स्वतः ला बघ एकदा."
" तुझ काहीही सुरू असतं. तुमचा तिकडचा काही फोन? काय म्हणताय राघव राव?" सोनल विचारत होती.
" राघव राव आरामात आहेत. फोन आला होता. आम्ही थोड बोललो. त्याला काही बायकोला घरी घेवून जायची घाई नाही ." पूनम सांगत होती.
" तू तस त्यांना बोलली का? "
" नाही ना वहिनी. "
" मग सांग. जरा प्रेमाने बोल. तुझ्या मनासारखं होईल बघ. " सोनल म्हणाली.
" बर आता गोड कस वागतात हे तुझ्या कडून शिकते. "
सोनल, पूनम दोघी हसत होत्या.
" आत्तू, मम्मी छान दिसते ना. "
" हो खूप. "
"आत्तू मी पण शाळेतून आल्यावर पिंक फ्रॉक घालेन."
" हो. चल आता."
" बाय मम्मी. " तिने सोनलला गोड पापी दिली.
सोनलने डबा घेतला. ती पटकन आशाताईंना भेटून आली. त्या कौतुकाने तिच्याकडे बघत होत्या.
"आजी मी निघते."
" नीट जा ग पोरी. डबा खा. " आजी म्हणाल्या.
" हो आजी. "
******
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
कथेचे 50 भाग पूर्ण झाले. ❤️❤️
