Login

सोनेरी नात्यांची वीण भाग 52

ही सोनेरी नात्यांची वीण आहे हळूहळू उलगडणार
सोनेरी नात्यांची वीण भाग 52

©️®️शिल्पा सुतार

दीर्घ कथा लेखन स्पर्धा डिसेंबर जानेवारी 2025-26

मामा, मामी, रिटा भेटायला आले. आजींना ते आवडल नाही. आता इथे काय काम आहे. उगीच सगळ्यांना डिस्टर्ब करतात. आता पुढे...

ते आशाताईच्या खोलीत आले. रिटा रडत होती.

" काय मूर्ख पणा आहे रिटा. कुठे गेली होतीस?" आशाताई तिला ओरडत होत्या.

" तिला चित्रपटात काम करायचं होतं. म्हणून तिने असा निर्णय घेतला." सुलभा मामी सांगत होत्या.

"अग ते आपलं काम आहे का? आधी तसा अनुभव हवा. कोणी ओळखीचं हव बेटा. अस कोणाच्या बोलण्यात येवू नये. मग काम मिळालं का?"

" नाही, त्या आधी पोलिसांनी त्या पूर्ण टीमला धरलं. " रिटा सांगत होती.

" फार मोठ्या संकटात जाता जाता राहिली. हिला म्हणजे थोड ही समजत नाही का आशाताई. काय कराव अस आहे. चांगल स्थळ हातच गेल. " सुलभा बडबड करत होती.

" पुरे ग आता तिला ओरडू नको. रिटा हुशार आहे. यापुढे ती नीट वागेल. " आशाताईंनी तिला जवळ घेतलं.

"देव देत कर्म नेत अस आहे. आजींना ऋषीच्या लग्नाची घाई केली. आता पहिल्या पासून सुरुवात करा. हिच्या साठी स्थळ कुठून आणणार. " सुलभा मामी तिला मारत होती.

"सुलभा अग काय अस? तिच्या नशिबात जे असेल ते तिला बरोबर मिळेल. काहीही बोलशील? एवढ्या मोठ्या मुलीला काय मारतेस. " आशाताई ओरडत होत्या.

सुरेश मामा नुसते बसले होते. "यापुढे काय करायचं हा फार मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे ताई. "

" हे बघ सुरेश, रिटाचं ही चांगलं होईल. तिला पुढे शिकायच असेल तर अ‍ॅडमिशन घेवून दे. " आशाताई म्हणाल्या.

"ऋषीला सांगून रिटाला त्याच्या ऑफिस मधे लावून दे. तू सांग ताई. " सुरेश मामा म्हणाला. ही सुलभा मामीची आयडिया होती. त्या निमित्ताने रिटा ऋषीच्या डोळ्यासमोर राहील.

"इथे गोंधळ नको आहे. मी काय सांगितलं लक्ष्यात आहे ना सुलभा. आशा टेन्शन घेऊ नकोस. आरामात बस. रिटा तु तुझा जॉब शोध. आम्हाला आता हा ताण नको. लताताई चहा घेऊन येतील ते घ्या आणि घरी जा. " आजी आत येत म्हणाल्या.

आजी आल्यामुळे मामा, मामी गप्प बसले.

दुपारी स्वयंपाक झाला. लताताई बोलवायला आल्या.

"जा रिटा ताट वाढ. " मामी म्हणाली.

" नको तिला का काम देताय. ती पाहुणी आहे. बस ग. लताताई ताट वाढतील. " आजी म्हणाल्या.

जेवण झालं तरी ते गेले नाही.

यांचं काय काम आहे समजत नाही. इतक तोडून बोललं तरी हे लोक निर्लज्ज आहेत.

" आशाची भेट झाली ना सुलभा. सुरेश." आजींनी विचारलं.

" हो आजी."

" आता आशा आराम करेल. "

" हो करू द्या. आम्ही बसतो. ऋषी येतील ना. त्यांना न भेटता कसं जाणार?" मामी म्हणाल्या.

"त्याच काय? ऋषीला तुम्ही नेहमीच भेटतात. त्याला घरी यायला उशीर होईल. तुम्हाला निघायचं तर निघा." आजी म्हणाल्या.

तरी ते गेले नाही.

******

दुपारी सोनल आबासाहेबांना भेटायला गेली. संध्या सोबत होती. आधी ते पेपर बद्दल बोलत होते. शाळेत काय काय काम झाले ते बोलून झालं. मीटिंग संपली. सोनल अजून थांबली होती.

"काही बोलायचं आहे का सोनल? "

" हो आबासाहेब ते लोन हव होतं."

" का लागत आहे?"

" वडलांची ट्रीटमेंट करायची आहे." ती त्यांच्या तब्येतीबद्दल माहिती देत होती

" मी बघतो दोन चार दिवसात सांगतो."

" लोन मिळालं तर ते मी वेळेवर परत करेल." सोनल म्हणाली.

"हो ते माहिती आहे तू अतिशय प्रामाणिक टीचर आहेस. " आबासाहेब म्हणाले.

" ते शाळेतर्फे काही होईल का? "

" नाही, अजुन आपण इथे लोन वगैरे देणं सुरू केल नाही." आबासाहेब म्हणाले.

एकतर कमी पगार. त्यात काही सोयी नाहीत. इमर्जन्सीला यांचा उपयोग होत नाही. विचार करत सोनल बाहेर आली. हे काम झालं असत तर बर वाटल असत. संध्या सोबत ती जेवत होती.

" संध्या ती तुझी मैत्रीण बॅंकेत कामाला आहे ना?"

" हो. "

" शाळा सुटल्यावर आपण तिला भेटायच का?"

" हो जावू ना. तुला लोन हव ना?"

" हो. "

" काका कसे आहेत? "

" ऑपरेशन करावं लागेल. " सोनल सांगत होती.

" गवारची भाजी किती छान झाली सोनल. सोबत मसाले भात ही आहे, सॅलड ही." यापुर्वी इतके पदार्थ तिच्या डब्यात नसायचे.

" ही भाजी कशी केली?"

"लताताईंनी केली."

"ओह त्या कोण आहेत?"

" त्या आमच्या कडे असतात. खूप छान स्वयंपाक करतात." सोनल सांगत होती.

"तुमच्या कडे कुक आहे? "

" हो. "

संध्या काही म्हणाली नाही. तरी ही लोन साठी का विचारत आहे? हिचा नवरा हिला मदत का करत नाही.

दुपारी सोनलने आईकडे फोन केला. मोहनरावांची तब्येत ठीक होती. ते सोनल सोबत थोडे बोलले.

"बाबा वेळेवर औषध घ्या."

"हो बेटा तू काळजी करू नकोस. तू जेवण केल का?"

"हो बाबा डबा आणला होता."

सोनल बिझी झाली. शाळा सुटल्यावर संध्या सोबत ती बॅंकेत गेली होती. तिथे पेपर दिले. काम होईल की नाही खात्री नव्हती.

******

पूनमने राघवला फोन केला.

" अरे वाह आज चक्क बायकोचा फोन. जेवण केलं का? "

" हो. "

" काय करते आहेस?"

"मी पण ऑफिसमध्ये आहे. माझं ट्रेनिंग सुरू आहे. " पूनमने सांगितलं.

" अरे हो मी विसरलो होतो. "

" तुझ जेवण झाल का राघव? "

" नाही ना, आम्हाला कोण जेवायला देईल." तो नाटकी आवाजात म्हणाला.

" आम्ही तर तुला बोलवतो आहे. इकडे काम ही भरपूर आहे. इन्कम ही खूप आहे. घरच जेवण ही मिळेल. परत बायको ही सोबत. " पूनम हसत म्हणाली.

" बापरे बापरे इतके फायदे आहेत. "

" हो. "

" अजून काही? "

"तू ये मग सांगते. तुझ तिकडचं काम झालं का?" तिने विचारलं.

" हो उद्या दिल्ली मधला कामाचा शेवटचा दिवस." राघव म्हणाला.

" उद्या मी तुला घ्यायला एअरपोर्टवर येते. "

" नको कशाला? "

" मला तुला बघावसं वाटतं आहे. आपल्याला बोलायला ही वेळ नाही. खूप गॅप पडतो आहे." पुनम असं म्हणाल्याने राघवला बरं वाटलं.

" ठीक आहे ये आपण डिनर करू. आपण आपला पण विचार करायला हवा ."

"बरोबर आहे मलाही तेच वाटत आहे." पूनमला खरंच बरं वाटत होतं. मला आता समजूतीनेच घ्यायचं आहे. मी दुर्लक्ष केलं तर राघव सुद्धा तसंच करतो. असा तर आमचा संसार मोडेल. दुसऱ्या कोणाला मी माझ्या आयुष्यात इमॅजिन करू शकत नाही. थोडा त्रास सहन करावा लागेल. मी राघवची समजूत काढेल.

******

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"


0

🎭 Series Post

View all