Login

सोनेरी नात्यांची वीण भाग 53

ही सोनेरी नात्यांची वीण आहे हळूहळू उलगडणार
सोनेरी नात्यांची वीण भाग 53

©️®️शिल्पा सुतार

दीर्घ कथा लेखन स्पर्धा डिसेंबर जानेवारी 2025-26

पूनम राघव मधे बर्‍या पैकी संवाद झाला. सोनल काळजीत होती. वडलांची तब्येत दिवसेंदिवस खराब होते होती. नवीन नात ऋषी कडे मदत कशी मागणार. आजी पैशाचा विषय काढत नव्हत्या. कारण त्यांनी ऋषीला पैसे द्यायला सांगितले होते. आणि तो विसरला होता. आता पुढे...

संध्याकाळी सोनल घरी आली. ती थकली होती. तिला काही करायची इच्छा नव्हती. थोड्या वेळाने राजेश दादाला फोन करू. ती विचार करत होती.

मामा, मामी पुढे बसलेले होते. आशाताई त्यांच्याशी बोलत होत्या. एक फॅशनेबल मुलगी त्यांच्यासोबत होती. तिने जीन्स घातलेली होती. खाते पिते घर की वाटत होती. ती सोनल कडे खूप बघत होती.

"मम्मी..." आर्या पळत आली.

" हे बघ मला चॉकलेट मिळाले." तिने दाखवले.

" कोणी दिले?" सोनलने तिला जवळ घेतलं.

"रिटा मम्मीने," मग तिला समजलं दोन दोन मम्मी?
"आजी मी हिला काय म्हणू?" तिने विचारलं.

" रिटाला मम्मी म्हणायच नाही बेटा. तिला आत्तू म्हणत जा." आजी म्हणाल्या.

"आज तुझी टीचर नाही आली का?" सोनलने विचारलं.

" आता येईलच."

"इकडे ये सोनल. मामा, मामींना तू ओळखते ना."

" हो."

" ही रिटा आहे."

" ही सोनल... ऋषीची बायको. ती टीचर आहे." आशाताई ओळख करून देत होत्या

सोनल तिच्याशी हसली. रिटाने मुद्दाम दुर्लक्ष केलं. तूच्छ लेखल्या सारखे भाव तिच्या चेहर्‍यावर होते.

आजी आत गेल्या. त्यांना काहीतरी काम होतं. सोनल ही रूम मधे जात होती.

" ही अगदी साधी वाटते ना आई. साडी काय नेसली आहे. कस वाटतं? एकदम गावठी. यांच्या कडच्या लोकांवर तुझा संशय होता ना? यांनीच आपला नेकलेस घेतला." रिटा विचारत होती.

" हो बाई, कधी नव्हे तर काही मिळालं की हे लोक असे करतात. साधारण मिडलक्लास ते. त्यांच्या कडून नीट वागायची काय अपेक्षा करणार? पण या लोकांना काही बोलायच नाही रिटा. इकडे आवडत नाही. ऋषीने एका मिनिटात मॅनेजरला सांगून दुसरा नेकलेस मागवून घेतला. या लोकांची झडती घेवू दिली नाही. " सुलभा मामी सांगत होती.

" चांगला सुरू आहे. कोण कुठले लोकं. हिला ऋषीने कस काय पसंत केलं? " रिटा विचारत होती.

"काय माहिती. बळजबरीचा राम राम आहे. आजीच्या ओळखीचे आहेत. ते मंदिरात भेटायचे. "

आशाताई सोनलकडे बघत होत्या. "सुलभा, रिटा अस बोलू नका." त्या ओरडल्या.

सोनलला कसतरी वाटत होतं. किती दिवस ते नेकलेस प्रकरण चालणार आहे समजत नाही. या दोघी मला फारच गरीब, कमी समजत आहेत. ती आत आली. ती तिचं काम करत होती. आर्या तिच्या सोबत होती. तिची टीचर आली. आर्याची ट्यूशन सुरू झाली.

पूनम घरी आली. मामा मामी भेटले. "या रिटाला काही समजावून सांग पूनम."

ती रिटाशी बोलत होती.

"वहिनी कुठे आहे?" पूनम विचारत होती.

" आत आहे." आशाताई म्हणाल्या. त्यांना माहिती होत ह्या दोघी तिला खूप बोलल्या. म्हणुन ती नाराज आहे.

" तू चक्क सोनलला वहिनी म्हणतेस." रिटा विचारत होती.

"हो मग ती ऋषी दादाची बायको आहे. दादा मोठा आहे. तिला मान द्यायला हवा. अग ती खूप चांगली आहे." पूनम म्हणाली.

"मला नाही आवडली. " रिटा म्हणाली.

" तुला आवडून उपयोग नाही. दादाला ती आवडते ते पुरे आहे. मी बघते." पुनम आत मध्ये आली.

"काय झालं वहिनी?"

" काही नाही ग. डोकं दुखत आहे. "

" बाहेर चल. "

" नको तु त्यांच्यात बस. माझ्या कोणी ओळखीचं नाही. " सोनल म्हणाली.

"तुला कोणी काही म्हणाल का?" पूनम तिच्याकडे बघत होती. रिटा किती फटकळ आहे ती नक्की हिला बोलली असेल.

" नाही ग. "

" मग चेहरा का उतरला आहे? "

" अस काही नाही. "

पूनमला मामीचे गुण माहिती होते. त्यात सोनलने रिटाची जागा घेतली. म्हणजे रिटाच वेळेवर पळून गेली. म्हणून हे लग्न झालं. नक्की हेच कारण असेल. या दोघी तिला बोलल्या असतिल.

पूनम तिच्या रूम मध्ये गेली. सोनलने दरवाजा लोटून घेतला. ती आर्या सोबत आत मध्ये होती.

******

ऋषी बॅग भरत होता. सोनल मुळे त्याला घरी यायची ओढ होती. ऑफिस मधे आज बरेच कामं मनाप्रमाणे झाले होते.

"ऋषी उद्या पार्टी आहे लक्ष्यात आहे ना." मनीष आत येत म्हणाला.

" हो."

" पार्टीला वहिनी येतील ना."

" हो."

" माझी मिसेस ही येईल."

" थीम काय आहे?" ऋषी विचारत होता.

"आपल्याला ब्लॅक सूट. लेडिज साठी रेड कलर."

" ठीक आहे."

ऋषी विचार करत होता सोनलला साडी घ्यावी लागेल.

संग्राम कार जवळ उभा होता. त्याच्या जवळ ऋषीने बॅग दिली. त्याने ती नीट ठेवली. ऋषी कार मधे बसला. " आजचा काय रीपोर्ट संग्राम? "

" पूनम मॅडम घरी आल्या. सोनल मॅडम ही घरी आल्या. आज घरी येतांना त्यांची एक मैत्रीण सोबत होती. त्या दोघी एका बँकेत गेल्या होत्या."

"बॅंकेत का?"

"माहिती नाही साहेब. मॅडम कडे काही कागदपत्रे होते." संग्राम सांगत होता.

"ओह शाळेच काही काम असेल." ऋषी म्हणाला.

त्याला माहिती नव्हतं सोनल लोन साठी प्रयत्न करते आहे.

ऋषी घरी आला. मामा, मामी, रिटाला बघून त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. तो मामा जवळ बसला.

" जा रिटा पाणी आण." सुलभा मामी म्हणाल्या.

" नको मी पाणी पिऊन आलो आहे. " ऋषी तुटक पणे म्हणाला.

आजी त्याच्याकडे बघत होत्या.

" सोनल, पूनम, आर्या कुठे आहे?" त्याने विचारलं.

"त्या आत मध्ये असतील."

सगळ्यांनाच मामा-मामी आल्या मुळे बोर होत होतं.

ऋषी रूम मधे गेला. फ्रेश होऊन आला. रिटा पुढे बसलेली होती ती त्याच्याकडे बघत होती. तो आर्याच्या रूम मधे गेला. सोनल आर्या जवळ बसलेली होती. ती खेळत होती.

" काय झालं? तू आतमधे का बसली आहे सोनल? बाहेर पाहुणे आले आहेत ना." त्याने विचारलं.

"काही नाही. माझं डोक दुखत आहे. सॉरी, मी बाहेर येते. तुम्ही केव्हा आले?" ती पटकन उठली.

" काही झालं का?" त्याला वाटलं हि नाराज आहे. नक्की मामी बोलल्या असतिल.

" काही नाही. "

" मला पाणी हवं आहे. "

ती कीचन मधे आली. पाणी घेवून आत गेली. मामी बघत होती. आता तर ऋषी पाण्यासाठी नाही म्हणाला होता. हिला बर लगेच सांगितलं.

" डॅडी, रिटा आत्तु आली. आजी म्हणाली तिला रिटा मम्मी म्हणायचं नाही. आत्तु म्हणायचं. " आर्या सांगत होती.

" तू जेवण केल का आर्या?" ऋषीने विचारलं.

" नाही. मम्मी इथेच बसून आहे."

तो सोनल कडे बघत होता." आराम करायचा असेल तर आपल्या रूम मध्ये जायचं. "

" चला जेवायला. " सोनल म्हणाली.

" हे लोक जेवायला आहेत का? " ऋषीने विचारलं.

"मला काहीच माहिती नाही. " सोनल म्हणाली.

ती बाहेर आली. आशाताईंच्या रूममध्ये गेली. ऋषी, आर्या ही सोबत होते. ते दोघं सोनल जिथे जाईल तिथे मागे मागे करत होते.

******

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"