Login

सोनेरी नात्यांची वीण भाग 55

ही सोनेरी नात्यांची वीण आहे हळूहळू उलगडणार
सोनेरी नात्यांची वीण भाग 55

©️®️शिल्पा सुतार

दीर्घ कथा लेखन स्पर्धा डिसेंबर जानेवारी 2025-26

ऋषीने सुलभा मामीला चांगल ऐकवलं. एखाद्याने किती त्रास द्यावा. सहन होत नाही. सांगता येत नाही. आता पुढे.

पुनम बाहेर आली. काय गोंधळ आहे? ऋषी दादा का इतका चिडला आहे. ती ऐकत होती.

रिटा, मामा, मामी निघाले.

ऋषी वरती रूम मध्ये निघून गेला.

" काय झालं आजी?" पूनमने विचारलं.

"काही नाही हे लोक सकाळपासून त्रास देत आहेत. आत्ताही रिटा इथे थांबायचं म्हणत होती त्यामुळे ऋषीने आवाज वाढवला. आज त्या दोघी सोनल खूप बोलल्या." आजी सांगत होत्या.

" तू कुठे होतीस? त्या का अस बोलल्या?"

" मी आत मध्ये होती म्हणून तर त्यांची हिंमत झाली. आशा सांगत होती. तिला काहीतरी गरीब वगैरे म्हणत होत्या. " आजी सांगत होत्या.

" तरीच आज वहिनी शांत होती. मी पण विचारलं. मामी, रिटा अस का करतात? "

" काय माहिती? त्यांना जिवावर येत असेल. "

" तीच स्वतः पळून गेली ना. एवढ होत तर नीट वागायचं. वहिनीला मी भेटू का? ती नाराज असेल. " पूनम म्हणाली.

" सकाळी भेट. ती रूम मधे गेली. ऋषी सोबत असेल. "

"हो ना. "

" पण जे होत ते चांगल्या साठी होत. रिटा गेली म्हणून सोनल आली. " आजी म्हणाल्या.

" हो. ऋषि दादा लकी आहे. "

" आर्या झोपली का? "

" हो."

" जा तू पण आराम कर."

*******

ऋषी रूम मध्ये आला. सोनल विचार करत बसली होती. ती फोनकडे बघत होती. नवीन संकट आहे.

"बरं वाटतं का?" त्याने विचारलं.

"हो, मी ठीक आहे."

"गोळी घेतली का? "

ती तिच्याच विचारात होती. सुभाषच आता मध्येच काय आहे? त्याला नक्की समजलं असेल माझं लग्न झालं आहे. म्हणून त्रास द्यायला फोन केला असेल. ऋषीला समजलं तर? बापरे...

" तुझ डोकं दुखत आहे ना म्हणून म्हणतो आहे गोळी घेतली का?" त्याने परत विचारलं.

" आता बरं वाटत आहे. मी झोपते. " तिने ब्लॅंकेट अंगावर घेतलं. ती झोपली.

ऋषी तिच्याकडेच बघत होता. हिला काय झालं? अचानक वेगळीच वागते आहे.

" सोनल सॉरी."

" काय झालं?" तिने ब्लॅंकेट बाजूला करून विचारलं.

" ते तुला मामी बोलल्या." त्याला वाटल म्हणुन ती जास्त बोलत नाही.

" मी एवढं मनाला लावलं नाही. तुम्ही जास्त विचार करू नका." ती परत झोपली.

" मी डोक दाबून देवू का?" त्याने विचारलं.

" नाही, नको. " ती म्हणाली.

" रीलॅक्स." तो बघत होता ती एकदम गडबडली होती.

जाऊ दे. ही ओके आहे. तिला तिचा वेळ घेऊ दे. आज त्याने टीव्ही लावला नाही. तो जरा वेळ पुस्तक वाचत होता. त्यांनी बघितलं सोनल झोपलेली नव्हती. चुळबुळ करत होती. पण तो परत बोलायला गेला नाही.

******

सकाळी सोनल भरभर आवरत होती. ऋषी झोपलेला होता ती हळूच खाली आली. लता ताई बिझी होत्या. ती मदत करत होती. तिने आर्या साठी पुर्‍या केल्या. त्यातल्या एक दोन तिने आशाताईंना दिल्या.

"घ्या आई पुरी खाऊन बघा. तिखट नाहिये."

"खूप छान चव आहे."

"हा तुमचा चहा."

"तू सुगरण आहेस सोनल." त्या खुश होत्या.

पूनम किचन मध्ये आली.

"बर आहे का वहिनी? तुझं डोकं दुखत होतं ना? आपल्याकडे विचित्र पाहुणे आले होते. मनातन सगळं काढून टाक. पण मला तुझा राग आला आहे. तु मला सांगायला हव होतं. मी त्यांच्याकडे चांगल बघितल असत. " पूनम चिडली होती.

" जावू दे पूनम. असे तर मला किती जण बोलतात काय काय सांगणार."

" मला तुला एक सांगायचं आहे वहिनी. मी आज राघवला एअरपोर्टवर भेटायला जाणार आहे. तो दिल्ली हून येतो आहे. " पूनम खुश होती.

"अरे वा चला थोडी प्रगती आहे. मग रात्री घरी येणार ना की... " सोनल तिला हसत होती.

पूनम लाजली होती. पण तिला माहिती होत राघव तितका डॅशिंग नव्हता.

" काहीही आपलं वहिनी अस आमच्याकडे काही होत नाही. ते जावू दे. मी काय करू ते सांग? "

" तुमच्या दोघांबद्दलच बोल. बाकी कोणाचाच विषय घेऊ नको. त्यांना राग येईल असं करू नको. "

" हो. वेगळया घराबद्दल बोलू का?" पूनम विचारत होती.

" अजून नाही आता प्रेम व्यक्त करायची वेळ आहे. " सोनल म्हणाली.

" ओके, अशी आयडिया आहे का?"

" हो. "दोघी हसत होत्या.

" तुमच कुठे पर्यंत आलं? काल तर दादा फूल ऑन तुझ्या बाजूने भांडत होता. तुला जवळ बसवून घेतलं." पूनम हसत होती.

" अग ते रिटा पासून सुटका मिळण्यासाठी होत." सोनल म्हणाली.

" अस का. अचानक गोड बातमी देशील."

" पूनम काहीही. तू दुसरा ड्रेस सोबत असू दे. छान तयार होऊन जा. "

" दुसरा ड्रेस म्हणजे वहिनी? "

" ही जीन्स काढ. छान चुडीदार घालून जा. झूमके वगैरे. टिकली. बघ फरक पडेल."

" बरं तशी तयारी करते." ती आत मधे गेली

सोनल आजींना भेटली. " आर्याचा डबा तयार आहे. ह्या कमी तिखट पुर्‍या या बाकीच्यांच्या. तुम्ही ही नाश्ता करा आजी."

" तू काही खाल्लं का? "

"हो. डबा ही भरपूर घेतला. मैत्रिणीं साठी ही."

"छान, लवकर ये ग. "

" हो. आजी मी काय म्हणते आहे. "

" काय?"

आशाताई आवाज देत होत्या. त्या तिकडे गेल्या.

" मी निघते. " ती शाळेत जायला निघाली.

आर्या अजून उठली नव्हती. ऋषी पण झोपलेला होता.

कारमधून तिने राजेशला फोन केला. तो पण ऑफिसमध्ये होता. त्यामुळे तिला बरं वाटलं. घरी रसिका वहिनी सगळं ऐकते मग ती चिडचिड करते

"दादा काल मी दोन ठिकाणी लोन बद्दल विचारलं. काही काम होईल असं वाटत नाही."

" मी पण आज फॅक्टरीमध्ये विचारतो. तसं काल मी एकाला पर्सनल लोन बद्दल विचारलं होतं. तू घरी काही बोलली का? आजी काय म्हणाल्या?" राजेश विचारत होता.

"नाही काल इकडे खूप पाहुणे होते. त्यांचाच गोंधळ संपत नाही. मला आजींशी मोकळं बोलायला वेळच मिळत नाही. जर जमलं तर आपणच करून टाकू. आजी नंतर पैसे देतील. नेमकं बोलतांना कोणी ना कोणी येतं. " सोनल सांगत होती.

" जावू दे. तुझ नवीन लग्न झालं आहे. एवढ व्यवहारी वागता येत नाही. "

"हो ना. "

" पुढच्या पंधरा दिवसात बाबांच ऑपरेशन झालचं पाहिजे. " राजेश म्हणाला.

सोनल शाळेत आली. काम सुरू झालं.

ऋषी तयार होवून आला. आर्या शाळेत गेली होती. पूनम रेडी होती. आज तिने अनारकली घातला होता. छान तयारी होती." अरे वाह बहिणाबाई ही तयारी वेगळीच आहे. "

" आज मी संध्याकाळी राघवला भेटायला जाणार आहे. "

" चांगल आहे. दोघांनी समजुतीने घ्या." ऋषी म्हणाला.

" आजी मी सोनल ही पार्टीला जाणार आहोत."

" आर्या राहील का? तुम्ही दोघी नाही." आजी म्हणाल्या.

" मी तिला समजावून सांगेल. ती राहील." ऋषी म्हणाला.

" आज नाश्त्याला पुर्‍या? "

" हो तिखट पुर्‍या तुझ्या बायकोने केल्या. खावून तर बघ बटाट्याच्या भाजी सोबत काय लागतात. आर्या ने करायला सांगितल्या असतील." आजी म्हणाल्या.

" तिला काय माहिती? "

"बाकीचे मूल डब्याला आणत असतिल. "

******

लंच ब्रेक मधे संध्या, सोनल जेवत होत्या. तिच्या मैत्रिणीचा फोन आला.

" लोनसाठी काहीतरी गहाण ठेवाव लागेल. "

"माझ्याकडे काही नाही." सोनल म्हणाली. आहे त्या घरावर ऑलरेडी लोन आहे.

"इतक का टेंशन घेतेस. तुझ्या मिस्टरांना सांग." संध्या म्हणाली.

" हो आता तेच कराव लागेल. बोलून बघते. "

ऋषीने सोनलला फोन केला. परत अननोन नंबर. बापरे सुभाष असला तर? तिने फोन उचलला नाही. अरे... ऋषी बघत होता. त्याने मेसेज केला.
"शाळेत सुट्टी झाली की सांग. बाहेर जायचं आहे.
ऋषी. "

तिने बघितलं फोन केला.

" मी तुला घ्यायला येतो. " तो म्हणाला.

" कुठे जायच आहे? " तिला प्रश्न पडला.

"मेहता ग्रुपमधे पार्टी आहे. तुला साडी घेवू."

"मी पण यायच का?" तिने विचारलं.

" हो मग, तू माझी बायको आहेस ना. कपल पार्टी आहे." ऋषी हसत होता.

ती दोन मिनिट खूप लाजली होती. यांना माझ्या बद्दल वाटत आहे हेच खूप आहे. पण हे पार्टी वगैरे नको वाटत. मी कधीच अश्या प्रोग्रामला गेली नाही.

"आर्या?"

"ती नाही. लहान मुल पार्टीत येत नाही. "

" आपणच जाणार?"

" हो काही प्रॉब्लेम? "

" नाही, मी अर्धा तास आधी सांगते."

******

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"


0

🎭 Series Post

View all