Login

सोनेरी नात्यांची वीण भाग 56

ही सोनेरी नात्यांची वीण आहे हळूहळू उलगडणार
सोनेरी नात्यांची वीण भाग 56

©️®️शिल्पा सुतार

दीर्घ कथा लेखन स्पर्धा डिसेंबर जानेवारी 2025-26

ऋषी आणि सोनल मेहतांकडे पार्टीला जाणार होते. त्यांची तयारी सुरू होती. पूनम ही राघवला भेटायला जाणार होती. पुढे बघू...

चार वाजता सोनलने मेसेज केला. लोकेशन दिलं. बरोबर साडे चार वाजता ऋषी आला. ती छान हसत कार मधे बसली. दोघ खुश होते.

" तुमची शाळा छान आहे."

" हो खूप चांगली आहे. शिस्त आहे. ठरल्या प्रमाणे परीक्षा होतात रिजल्ट लागतो. कधीतरी या. आतून ही शाळा दाखवेल. आबासाहेब खूप चांगले आहेत."

" मी पण त्यांना ओळखतो."

ते दुकानात आले. आल्या बरोबर दुकानादार स्वतः उठून भेटायला आले.

" साड्या दाखवा. रेड पार्टी वेअर. बाकीच्या रोज नेसायच्या. काही चांगल्या. काठपदर. "

" अहो इतक्या साड्या नको. एक दोन घ्या. तुम्हाला बरीच माहिती दिसते आहे . " सोनल विचारत होती.

ऋषीने मोबाईल दाखवला." हे बघ. " साड्यांचे प्रकार सर्च केले होते.

तिने डोक्याला हात लावून घेतला. ती हसत होती.

"साड्या घेवून झाल्या की चांगल्यातले ड्रेस दाखवा." ऋषी म्हणाला.

ती त्याच्याकडे बघत होती. इतका खर्च?

ऋषीने छान साड्या निवडल्या.

" ही निळी साडी किती छान आहे. बघू. " ऋषी म्हणाला.

सेल्स गर्ल मदत करत होती. सोनल छान दिसत होती.

" मॅडम या साडीवर असे केस मोकळे सोडा. कानात स्टोनचे टॉप्स. वाह मॅडम ही हिरवी साडी पण घ्या. डार्क कलरच्या साड्यां तुम्हाला छान दिसत आहेत. "

" हो." ऋषी तिच्याकडे बघत म्हणाला.

" अहो इतक्या साड्या कधी नेसणार." सोनल म्हणाली.

त्याने ऐकलं नाही.

आजी, आईसाठी साड्या घेतल्या. पूनम साठी ही. ते निघत होते.

" अहो, आर्या साठी काहीतरी घ्या. सगळ्यांचे नवीन कपडे बघून ती रडेल."

तिला ही फ्रॉक घेतला. चला आर्यासाठी सोनल मनापासून सगळं करते. तो निश्चिंत होता.

ते निघाले. ती त्याच्याकडे बघत होती. यांच्याशी बोलू का? बाबां बद्दल सांगू का?

"काय झालं?" त्याने विचारलं. ती बोलणार त्याचा फोन वाजत होता. तो बिझी झाला. ते घरी आले. चहा झाला.

"आजी, आई या तुमच्या साड्या. या पूनम साठी."

"मला?" आर्या बघत होती.

"तुला काहीच आणलं नाही." ऋषि म्हणाला.

ती रडणार होती.

"अहो तिला चिडवू नका. इकडे ये आर्या. हा बघ तुझा फ्रॉक. " ती फ्रॉक घालून देत होती.

" मम्मी मला तूच आवडते." आर्या खुश होती.

" खर्च डॅडीचा झाला. सगळ्यांना मम्मी आवडते अस आहे. " ऋषी म्हणाला.

आजी, आशाताई, सोनल हसत होते

नवीन फ्रॉक घालून आर्या रेडी होती. ती सोनल सोबत होती.

" सोनल जा तयार हो. आपण एका तासात निघू." ऋषी म्हणाला.

सोनल तयार झाली. लाल प्लेन साडी तिला खूप छान दिसत होती. केस मोकळे सोडलेले. छोटी टिकली लावलेली. हातभर बांगड्या होत्या. "आर्या बेटा आजी जवळ रहाणार ना?"

"हो मम्मी. डॅडी म्हणाला. लहान मुलांनी पार्टीत यायच नाही."

" टीचर येईल होमवर्क कर. रात्री आजी देईल ते जेव. आत्तु ही उशिरा येणार आहे. "

"मी एकटी?" ती रडणार होती.

" हो मग आर्या मोठी मुलगी आहे. ती आजी जवळ रहाते. "

" हो मम्मी. "

सोनलला कसतरी वाटत होत. हीचं माझं नातं काय आहे. अगदी माझी लेक असल्या सारखा त्रास होतो. या पार्टीत ही का जायच आहे? अगदी सवय नाही. तिथे कोण असेल कोण नाही? उगीच आर्याला सोडून इकडे तिकडे फिरा.

ऋषी रूम मधे आला. तो सोनल कडे बघत होता. बापरे ही फार सुंदर दिसते आहे. हा रंग तिला शोभतो आहे. हिचे केस सुंदर आहेत.

" पार्टीच्या दृष्टीने तयारी ठीक आहे का?" तिने विचारलं.

" हो. खूप सुंदर. " तो म्हणाला. गप्प बसला.

" मी आर्याकडे बघते. " ती गडबडली होती.

" एक मिनिट." तो कपाटाजवळ गेला. एक नेकलेस घेवून परत आला. "हा घाल."

"मंगळसूत्र आहे ना."

" या साडी वर डायमंड छान दिसत आहेत." ती नेकलेस घालत होती. हुक लावता येत नव्हता.

"मी मदत करू? " त्याने विचारलं.

ति त्याच्याकडे बघत होती. ती पाठ करून उभी राहिली. त्याने तिच्या गळ्यात नेकलेस घातला. "बघ किती छान दिसतेस. "

"हो मम्मी." आर्या म्हणाली. दोघ गडबडले. तो बाजूला झाला. तो कपाटातून कपडे घेत होता समोर मायाचा फोटो होता. सोनल लांबून बघत होती. यांनी आर्याच्या आई बद्दल मला काही सांगितल नाही. की फोटो दाखवला नाही. जावू दे मी पण सुभाष बद्दल काही सांगितलं नाही. काल त्याचा फोन आलेला ते आठवून तिला उगीच टेंशन आलं.

दोघी खाली आल्या. आजी सोनल कडे बघत होत्या." काळ काहीतरी लाव बाई. माझी नजर होईल. "

" आजी काहीही. " सोनल हसत होती.

" आर्याकडे बघा. "

" हो."

त्या दोघी आशाताईंच्या रूम मधे आल्या. त्या ही उठून बसल्या." वाह सोनल इतकी सुंदर दिसते आहे. ही साडी खूप छान आहे."

" ठीक आहे ना आई?"

" हो बेटा."

"ऋषी? " आशाताई विचारत होत्या.

"ते तयार होत आहेत."

राजेश फोन करत होता." सोनल मला या आठवड्यात लोन मिळेल. माझा मित्र हो म्हणाला."

" पण ते काहीतरी गहाण ठेवायच म्हणत होते ना? "

" मी सांगितलं सहा महिन्यात पैसे परत करेन."

"बर झालं. तो पर्यंत मी आजींशी ही बोलते. "

ऋषी तयार झाला. तो फोनवर बोलत खाली आला. सोनल त्याच्याकडे बघत राहिली.

हे अगदी हीरो सारखे दिसत आहेत. यांना व्हाइट शर्ट खूप चांगला दिसतो. त्यात ब्लॅक सूट. ओह माय गॉड. कर्तुत्वाच तेज चेहर्‍यावर होतं. हातातलं घड्याळ चमकत होतं. चकचकीत शूज. वाह. तिने दुसरीकडे बघितलं. अस बघायला बर वाटत नाही.

मधे तो एका पायरीवर थांबला. त्याने खाली वाकून पँट नीट केली. तरी सोनल त्याच्याकडे बघत होती.

तो तिच्या समोर येवुन उभा राहिला. तिच्याकडे बघत होता. " तयारी ठीक आहे ना?"

ती एकदम लाजली.

" तू केव्हाची माझ्याकडे बघते आहेस ना. मग सांग ओके ना." तो म्हणाला.

" नाही, अस नाही, ते म्हणजे... हो तयारी छान आहे." ती गडबडत म्हणाली.

उगीच हावरट सारखं मी यांच्याकडे बघतं होते का? हे काय विचार करत असतिल? तिला हसू येत होतं. जावू दे माझा नवरा आहे. आज ते प्रचंड हॅन्डसम दिसत आहेत.

" मम्मी लवकर ये. " सोनल आणि ऋषीला पापी देवून आर्या आजी सोबत आत गेली.

तिला सोडून जातांना सोनलला कसतरी वाटत होतं.

" चल आता. आर्या नीट राहील."

ते निघाले. कार मधे ऋषी सोनल कडे बघत होता. "तू काहीतरी बोलत होतीस ना."

" केव्हा?"

" घरी जातांना."

" काही नाही असच."

ते काम झालं. राजेश दादाला लोन मिळतंय. मग यांना का सांगा. ते काय म्हणतील पन्नास लाखासाठी माझ्याशी लग्न केलं.

तस ऋषीला हे माहिती होतं.

"अहो तिकडे वागा बोलायचे काही नियम आहेत का? " तिने विचारलं.

" अस काही नाही. तू आहे तस रहा. " ऋषी म्हणाला.

हे लोक श्रीमंत मी त्यांच्या तुलनेत काही नाही. तील उगीच टेंशन आलं होत.

"अहो. मी खूप साधी दिसते आहे का? "

" तू खूप सुंदर आहेस. अजून सांगू?" तो विचारत होता.

आता सोनल लाजली होती. नको... तिने मान हलवली. तिचा तिच्या नशिबावर विश्वास नव्हता.

तिचा फोन वाजत होता. तिने बघितल ओळखीचा नंबर नाहिये. सुभाष असेल का? ओह माय गॉड.

"काय झालं? कोणाचा फोन होता." त्याने विचारलं.

"लोन घ्या, लाइफ इन्शुरन्स असेल."

"ओह."

ते फाईव्ह स्टार हॉटेल मधे आले. सुंदर व्यवस्था होती. पार्टी हॉल मधे त्यांच स्वागत झालं. सोनल खूप छान दिसत होती. सगळे तिच्याकडे बघत होती.

मनीष आला. त्याची पत्नी सोबत होती. अनिता, सोनलची लगेच मैत्री झाली. ती सोबत आहे म्हणून सोनलला बर वाटलं.

एवढी सुंदर बायको मिळाली म्हणून बरेच लोक ऋषीचा हेवा करत होते.

******

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"