Login

सोनेरी नात्यांची वीण भाग 58

ही सोनेरी नात्यांची वीण आहे हळूहळू उलगडणार
सोनेरी नात्यांची वीण भाग 58

©️®️शिल्पा सुतार

दीर्घ कथा लेखन स्पर्धा डिसेंबर जानेवारी 2025-26

राघव पूनमच तर ठरलं ते सोबत रहाणार होते. सोनलला ही ऋषीचा चांगला अनुभव येत होता. तो अतिशय समजूतदार चांगला होता. आता पुढे.

ऋषी, मनीष, सोनल, अनिता खूप एन्जॉय करत होते. सोनलने सगळयांशी खूप गप्पा मारल्या.

ती डिनर आणायला गेली. ऋषीला काय आवडत हे तिला बर्‍यापैकी माहिती झालं होतं. ती त्याच्या जवळ बसली. तिने त्याला डिश दिली.

"थँक्स, अरे हे माझ्या आवडीचे पदार्थ आहेत. तुला कस माहिती? तुझी डिश कुठे आहे?" ऋषीने विचारलं.

"हो घेते."

"तुला काय आवडतं?" त्याने विचारलं.

"हेच." ती म्हणाली. तशी तिची काही आवड निवड नव्हती. केल ते खायचं. ती तिची डिश घेवून आली. त्याच्या जवळ बसली.

"तू माझी डिश का आणली? माझी काळजी का घेते आहेस सांग ना?" ऋषी विचारत होता. तिच्याकडे बघत होता.

बापरे यांना मी मधे मधे केलेलं आवडल नाही का? की आणखीन काही आहे? ती पण त्याच्याकडे बघत होती.

"नाही म्हणजे अस काही नाही. तुम्हाला भूक लागली असेल ना. म्हणुन वाढून आणलं." तिला काय बोलाव असं झालं होतं.

" तू फार चांगली आहेस. मी खरच लकी आहे. मला तु जीवनसाथी म्हणून मिळाली. " तो म्हणाला.

आज यांना काय झालं? अचानक इमोशनल झाले. त्याच्या प्लेटच्या बाजूला ग्लास होता. ओह... यांनी ड्रिंक्स घेतले वाटतं.

" आज छान वाटत ना." ऋषी आरामात बसला होता.

" हो."

" पार्टीत खूप मजा आली. "

" मनीष, अनिता चांगले आहेत. " ती म्हणाली.

" तुझ्या बरोबर ही मी कंफर्टेबल असतो. आपण एकमेकांना समजून घेतो. आपल्याला एकमेकांची गरज आहे. पुढचा विचार करायला हवा. माझ्या सोबत रहाशील सोनल?" त्याने विचारलं.

ती एकदम गडबडली पण हे बरोबर बोलता आहेत मला त्यांचा सपोर्ट हवा आहे. बाबांच्या ट्रीटमेंट साठी ही पैसे हवे आहेत. त्यांना मी त्यांच्या घरच्या कडे बघायला हवी आहे. आर्या, आई यांना खरच गरज आहे.

"अहो जेवून घ्या. आपण थोड्या वेळाने घरी जावु." ती म्हणाली.

" हे माझ्या प्रश्नच उत्तर आहे सोनल? मी काय विचारलं. सांग ना." ऋषी विचारत होता.

ती इकडे तिकडे बघत होती. कोणी ऐकलं तर नसेल ना. "मी पोळी घेवून येते."

"कुठे जावू नकोस. इथे माझ्यासमोर बस. " त्याने तिचा हात धरला.

"अहो नको ना."

" आपला विचार करणार ना सोनल? आपल्या दोघांच्या आयुष्यात काय झालं आपण एकमेकांना विचारल नाही. जावू दे झालं ते गेल. आता नवीन सुरुवात करू या. तस ही आई, आजी, पूनम, आर्या बरोबर तुला काही प्रॉब्लेम नाही. " ऋषी म्हणाला.

" तुम्ही ही चांगले आहात." ती म्हणाली. गप्प बसली.

" तेच म्हणतो आहे. पण माझा विचार करशील?"

" हो, मी विचार करून सांगते." ती म्हणाली.

मला आज पर्यंत एवढ महत्वं कोणीच दिलं नव्हतं. हे नक्की शुद्धीत आहेत ना? ड्रिंक्स जास्त झाले असतिल? आज गोड बोलायचे. उद्या विसरून जायचे. परत तु कोण मी कोण. कठिण आहे. खर काय आहे ते कस समजणार? हे उगीच रोमँटिक होत आहेत. मला जवळ घेत आहेत. यांनी घरी जावून मला काही केलं तर? तिला उगीच धडधड झाली.

"तुम्ही जेवा ना. "

" सोनल तू सुंदर आहेस. त्यापेक्षा मला काय आवडत सांगू. तू स्वतः पेक्षा दुसर्‍यांचा जास्त विचार करतेस. मनापासून सगळ्यांच करते. मला तुला खूप सुखी ठेवायचा आहे."

सोनल तो काय म्हणतो ते फक्त ऐकत होती.

" तुला काय वाटल मी ड्रिंक्स घेतल्या मुळे अस बोलतो आहे. मी शप्पथ घेवून सांगतो मी थोडी घेतली आहे. तुझ्याबद्दल हे मनापासून बोलतो आहे. " तो म्हणाला.

स्पष्ट दिसत होत हे नेहमी पेक्षा वेगळे वागत आहेत. पण असे प्रेमळ वाटत आहेत. रोज खूप प्रॅक्टिकल असतात. सोनलला हसू आलं. हे प्रेम उद्या पर्यंत टिकलं म्हणजे पुरे आहे. ती पण त्याची बडबड एन्जॉय करत होती.

वेळ झाला होता. सगळ्यांना भेटून ते निघाले. कार मधे ऋषी तिच्या जवळ बसला. तिचा हातात हात घेतला. तो तिच्या पदराशी खेळत होता." तुला साडी छान दिसते. नेहमी नेसत जा. तू शाळेत जातांना छान दिसतेस."

तिला काही सुचत नव्हतं. नशेत माणूस खरं बोलतो. यांना माझ्या सोबत संसार करायचा आहे. मी काय करू? लगेच होकार देवू का? काही समजत नव्हतं.

तिच्या खांद्यावर डोके ठेवून तो झोपला होता. अगदी जवळ. त्याचे केस तिला मानेला लागत होते. तिच्या अंगावर काटा येत होता. ते घरी आले.

"अहो उठा. " तिने आवाज दिला. ते रूम मधे आले. त्याने आत जावून कपडे बदलले. ती अजून सोफ्यावर बसून होती. तो बाहेर आला. त्याच्या जागेवर झोपला.

तिने कपडे बदलले ती सोफ्यावर झोपली. तो सोफ्याजवळ आला. ती उठून पटकन मागे सरकली. तो ज्या पद्धतीने वागत होता तिला समजत नव्हते काय होईल.

" एवढ घाबरायला काय झालं? तिकडे कॉटवर झोप. इथे सोफ्यावर त्रास होतो." तो म्हणाला.

"नाही नको. तुम्ही झोपा ना. पाणी देवू का?" तिने विचारलं.

" चल, मी तुला विचारल्या शिवाय काही करणार नाही. मी ओके आहे." ऋषी म्हणाला.

ती कॉटवर झोपली. तो त्याच्या नेहमीच्या बाजूला झोपला. ती त्याच्याकडे बघत होती. हे अस कठिण आहे. हे काय विचार करत असतिल. मी उगीच गडबडले. आमचं लग्न झालं आहे. त्यांचा हक्क आहे. तेच मागत आहेत. होकार देवू का?

" अहो. " तिने हिम्मत करून हाक मारली.

" इट्स ओके सोनल. टेक यूवर टाइम. काही घाई नाहिये. मनापासून होकार दे." तो झोपला.

******

मोहनरावांना रात्रभर बर वाटत नव्हतं. सकाळी लवकर मीनल ताईंनी डॉक्टरांना फोन केला. थोड्या वेळाने ते हॉस्पिटल मधे जाणार होते. राजेश ऑफिसला गेला. त्याची साधी नोकरी होती. जास्त सुट्ट्या घेतल्या तर घरी बसावं लागेल. बिकट परिस्थिती होती.

रसिका स्वयंपाक करत होती. "आई डबा न्या."

"हो."

तिने चहा करून दिला. रिक्षा बूक करून दिली.

"डॉक्टर काय म्हणतात ते सांगा. मी सोहमला घेवून दुपार नंतर येते."

"हो. घरी बघ. घाई करू नकोस. सगळ्यांच हॉस्पिटलमध्ये काही काम नाही." मीनलताई म्हणाल्या.

******

सोनल लवकर उठली. ऋषी झोपलेला होता. ती आंघोळ करून खाली आली. ती पटापट आवरत होती. आर्या आज लवकर उठली. ती किचन मधे आली.

"माझ बाळ काल एकट होत." तिने तिला कडेवर घेतलं.

"आत्तू घरी आली होती. मामाही आले." तिने सांगितलं.

"हो का. तू दूध पी चल." तिने तिला खुर्चीवर बसवलं.

सोनल लताताईंना मदत करत होती. तिने पोहे केले.

पूनम आली.

"काय मग मॅडम? काय सुरू आहे? आम्हाला समजलं." सोनल हसत होती.

" वहिनी राघव आला आहे. "

" मग पुढे? काय रीपोर्ट?"

" काही नाही. तो माझ ऐकणार म्हणतो आहे. " पूनम सांगत होती.

" कस काय? काय जादू केली? " सोनल मुद्दाम चिडवत होती.

" काहीही काय ग. "पूनम लाजली होती.

" तुमची पार्टी कशी होती? तू काल फार सुंदर दिसत होतीस. आजी सांगत होत्या. फोटो बघून. "

"पार्टी ठीक होती. "

"दादा काही म्हणाला का?"

" अश्या बद्दल?"

"तु इतकी सुंदर दिसत होती म्हणून कॉम्पीलीमेंट दिली का? "

"नाही ना."

"तुम्ही दोघं किती बोर करताय. आता काय प्रॉब्लेम आहे नीट रहा ना." पूनम म्हणाली.

"हो. "

" नुसत हो काय? तुझ्याकडे किती आयडिया आहेत. दादाला मनव ना वहिनी. "

"काहीही सांगू नकोस. त्यांच्या बाजूने होवू दे." सोनल म्हणाली.

तिने ऋषी विचारतो आहे ते सांगितलं नाही. ते गोड सीक्रेट स्वतः जवळ ठेवलं.

" मग राघव राव कुठे आहेत? त्यांना पोहे चालतील ना?"

" हो. दादा कुठे आहे ?"

"ते झोपले आहेत. "

" त्याला उठवते राघवला लवकर जायच आहे ."

"हो. "

ऋषी खाली आला. डायनिंग टेबल जवळ सोनल काम करत होती. तो तिच्याकडे बघत होता. तिने ही त्याच्याकडे बघितलं. ती पटकन आत गेली. मला हे जमणार नाही. नुसती धडधड होते.

******

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"


0

🎭 Series Post

View all