Login

सोनेरी नात्यांची वीण भाग 60

ही सोनेरी नात्यांची वीण आहे हळूहळू उलगडणार
सोनेरी नात्यांची वीण भाग 60

©️®️शिल्पा सुतार

दीर्घ कथा लेखन स्पर्धा डिसेंबर जानेवारी 2025-26

ऋषी सोनलने एकमेकांना आपल्या मनातलं सांगितलं. त्यांच्या संसाराला सुरुवात होईल का? आता पुढे.

ऋषी फोनवर बोलत होता. "एका माणसाचा बंदोबस्त करा. सुभाष नाव आहे." तो त्याच्याबद्दल थोड सांगत होता. "बाकी माहिती नाही. तुम्ही शोधून घ्या."

मी आता सोनलला अजिबात त्रास होवु देणार नाही. तो ऑफिसला आला. लगेच मीटिंग सुरू झाली.

त्याने वकिलाला फोन केला. "नाॅमिनी म्हणून माझी पत्नीचं नाव टाकायचं आहे. काय काय कागदपत्रे लागतील? "

" ते सांगत होता." त्याने त्याच्या असिस्टंटला ते काम दिले.

सोनल माझ्यासाठी महत्वाची आहे. ती घरी आल्यापासून खूप छान वाटतं आहे. ती सगळं सांभाळून घेते. माझी ही दोन चार आठवडय़ात किती प्रगती झाली. जिथे हात घालतोय ती ऑर्डर मिळते. ती मला खरच लकी आहे. तो खुश होता.

******

मोहनराव, मीनलताई हॉस्पिटलमधे आले. मोहनरावांना लगेच ऍडमिट केलं. त्यांना तिथे चक्कर आली होती. मीनलताई घाबरल्या होत्या. त्यांनी राजेशला फोन केला. तो हॉस्पिटलमध्ये आला. मोहनरावांची तब्येत क्रिटिकल होती.

डॉक्टरांनी राजेशला आत बोलवलं. " मोहनराव सिरीयस आहेत. आपल्याला लगेचच ऑपरेशन करावे लागेल. त्याआधी या टेस्ट करून घ्या. संध्याकाळपर्यंत निर्णय घेऊ. आता उशीर करता येणार नाही. "

"चालेल." राजेश काळजीत होता. अजून पैसे मिळाले नाही. कस होईल?

लंच ब्रेक मधे सोनल जेवत होती. तिचा फोन वाजत होता. राजेश नाव बघून तिने पटकन फोन उचलला.

"बाबांना ऍडमिट केलं आहे. "

ती घाबरली. "मी लगेच येते."

"सोनल थोडे पैसे आणायला जमतील का? बाबांच्या टेस्ट करायच्या आहेत आणि नंतर लगेच ऑपरेशन आहे. " राजेश म्हणाला.

"नंतर कसं करणार? " तिने विचारलं.

" हो ना. मला अजून पैसे मिळाले नाही. " राजेश म्हणाला.

"मी बघते. आजी घरी असतील तर लगेचच पैसे घेऊन येते." सोनल म्हणाली.

" हो. नंतर जमलं तर आपण दोघे मिळून आजींचे पैसे परत करू. आपले बाबा आपण जबाबदारी घ्यायला हवी. " राजेश म्हणाला.

" हो दादा. पैसे जमा करु. हळूहळू का होईना पैसे परत करू."

ती घाईने घरी आली.

आजी, आशाताई हॉस्पिटलमध्ये गेल्या होत्या. पूनम ऑफिसला गेलेली होती. आर्या शाळेतून आली होती. ती लताताई जवळ बसलेली होती.

" बरं झालं मम्मी मी तू आली." ती तिच्या सोबत होती.

" बेटा मी घाईत आहे. तू घरी थांबशील ना. लताताई हिच्याकडे बघा. " सोनलला काय करावं सुचत नव्हतं.

" नाही मम्मी मी पण तुझ्या सोबत येईल." ती ऐकत नव्हती. रडायला लागली.

तिला घेवून कस जाणार? ते ही हॉस्पिटल मधे? आधीच्या अनुभवावरून तिला माहिती होतं ऋषी ओरडतील.

सोनलचा फोन वाजत होता. राजेश होता. " सोनल लवकर ये बाबांना अजिबात बरं वाटतं नाही. ते सिरियस आहेत."

तिने आजींना फोन केला. "तुम्ही कुठे आहात?"

"आम्हाला घरी यायला दोन तास तरी लागतील. बरं झालं तू घरी आली सोनल. आर्याकडे बघशील." आजी म्हणाल्या.

"आजी, माझ्या बाबांना अ‍ॅडमिट केलं आहे. ते सिरियस आहेत. मी हॉस्पिटल जाते आहे. मला माहिती आहे माझे बाबा आमची जबाबदारी आहे. तरी थोडी मदत झाली असती. पैसे हवे होते. मी दादा, पैसे परत करायचा प्रयत्न करू. " सोनल शेवटी म्हणाली.

" अस का म्हणतेस बेटा. सगळं तुझ आहे. हो मी बघते. लगेच पैसे देते. ऋषीने दिले नाही का? " आजींनी त्याला सांगितलं होतं.

" नाही. दोन तीन तासात देता येतील ना? "

" हो बेटा. "

ती रूम मध्ये आली. काय करावं असं झालं होतं. आधी टेस्ट कराव्या लागतील.

तिने बॅग मधून लग्नाचा नेकलेस काढला. ती आर्याला घेवून निघाली. आधी दुकानात जाऊन हार मोडला. त्याचे चांगले दीड लाख रुपये आले. ती लगेच हॉस्पिटलमध्ये आली. आर्या तिच्यासोबत होती. काउंटर वर पैसे भरले. लगेच मोहनरावांची ट्रीटमेंट सुरू झाली.

"मी थोड्या वेळाने घरी जाते दादा. आजी तोपर्यंत येतील. त्यांच्याकडून पैसे घेते. आर्याला ही घरी सोडून देते. तू काळजी करू नको. आज पैशाची व्यवस्था होईलच." सोनल म्हणाली.

" मम्मी मी तुझ्या सोबत राहील." आर्या म्हणाली.

" अस करता का बेटा. घरी आजी असतिल. आत्तू असेल. मी पण लवकर येईल. थोड्या वेळाने घरी जा. ट्यूशन टीचर ही येईल. " सोनल तिला समजावत होती.

मीनलताईं कडे ही बघावे लागणार होतं. आई अशी गप्प गप्प झाली. सोनल काळजीत होती.

मोहनराव, मीनलताई अतिशय प्रेमळ जोडी होती. त्यांचे कधीच भांडण झाले नाही. आहे त्या परिस्थितीत त्यांनी संसार केला. आता मोहनराव अ‍ॅडमिट झाल्या पासून त्या फार काळजीत होत्या.

रसिका ही हॉस्पिटल मधे आली होती. ती पण सगळ सांभाळत होती. सोनल तिच्याशी जास्त बोलत नव्हती.

******

ऋषी सोनलला फोन लावत होता. ती फोन उचलत नव्हती. त्याला काळजी वाटली.

"संग्राम सोनल कुठे आहे बघ ."

त्याने खबरीला फोन लावला. तो बॉडीगार्ड ही होता.

" मॅडम शाळेतून केव्हाच्या निघाल्या. त्या घरी गेल्या. " त्याने सांगितलं. तो अजून माहिती देत होता.

" साहेब मॅडम बाहेर आहेत. त्या शाळेतून लवकर निघाल्या. घरी गेल्या. लगेच तिथून निघाल्या. त्यांनी सराफ दुकानात नेकलेस मोडला." संग्राम सांगत होता.

"काय?" ऋषी काम करता करता थांबला.

"हो. दीड लाख रुपये आले. "

" का पण. ती कुठे जाते आहे? एवढे पैसे का लागत होते?" ऋषी विचारत होता.

" माहिती नाही. गर्दीत त्या गायब झाल्या. "

" ड्रायवर कुठे आहे?"

" मार्केट मधे पार्किंग नाही. त्या रिक्षाने गेल्या होत्या. त्यांच्या सोबत आर्या होती. " संग्रामने सांगितलं.

" आजी कुठे आहे? "

" आजी आणि मॅडम हॉस्पिटलमध्ये गेलेल्या होत्या."

सोनलने अस का केल असेल? तो नेकलेस कोणाचा होता? सोनलने तो का मोडला? मी तिच्यावर खूप विश्वास ठेवतो आहे? मला वाटत तस तर नसेल? मागे मामी म्हणत होत्या त्यांचा नेकलेस चोरीला गेला. तो तर हा नसेल ना? अस नसेल.
सोनल चांगली आहे. तिच्या सोबत आर्या ही आहे. मग इतकी काय इमर्जन्सी होती की तिने मला ही सांगीतलं नाही. मी पैसे दिले नसते का? मला हे काय आहे ते बघावे लागेल.

"संग्राम पैसे भरून तो नेकलेस परत घेवून ये. माझ्याकडे दे." ऋषी म्हणाला.

"हो साहेब. "

त्याने सोनलला फोन लावला. यावेळी सोनलने फोन उचलला.

" काय सुरू आहे सोनल?"

"मी बाहेर आहे. " तिने सांगितलं.

"कुठे?" त्याने रागावर कंट्रोल ठेवत विचारलं. आर्याचा आवाज आला.

"तुझ्या सोबत आर्या आहे का?"

" हो. आहे."

" तुम्ही दोघी कुठे आहात? "

काय सांगू अस तिला झालं होतं. " ते मी हॉस्पिटल मध्ये आहे. मी तुम्हाला फोन करणारच होती. बाबा अ‍ॅडमिट आहेत."

"लहान मुलांना हॉस्पिटलमध्ये नेत नाही. माहिती आहे ना. " तो चिडचिड करत होता.

" हो माहिती आहे. घरी आर्या जवळ कोणी नव्हतं. ती ही ऐकत नव्हती. रडत होती. तस ईम्रजन्सी होती. सॉरी. अहो ते बाबा..." सोनल सांगत होती.

"एक मिनिट थांब. आजी फोन करते आहे." त्याने फोन ठेवला.

" ऋषी अरे तू सोनलला पैसे दिले का? तिचे बाबा अ‍ॅडमिट आहेत." आजी विचारत होत्या.

" नाही दिले. काय झालं? सोनल आता काहीतरी सांगत होती. मी ऐकून घेतलं नाही. " ऋषी म्हणाला.

" बहुतेक ते सिरियस आहेत. लगेच ऑपरेशन कराव लागेल. " आजी सांगत होत्या.

" ओह. मी बघतो. " ऋषी म्हणाला.

******

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"