सोनेरी नात्यांची वीण भाग 61
©️®️शिल्पा सुतार
दीर्घ कथा लेखन स्पर्धा डिसेंबर जानेवारी 2025-26
मोहन राव सिरियस होते. सोनल पैसे जमवायचा प्रयत्न करत होती. नेकलेस मोडून तिने चूक केली का? आता पुढे...
ऋषीने परत सोनलला फोन लावला." तू कोणत्या हॉस्पिटलमध्ये आहेस मला पत्ता पाठवं."
" हो. "
" मी लगेच येतो."
सोनल देवाच्या धावा करत होती. बाबांचं ऑपरेशन लगेच व्हायला हवं. पैसे मिळायला हवे. ऋषि आता रागात होते. हे का चिडले आहेत? ते ही एक टेंशन होतं. एक तर आता माझं थोड नीट होत होतं. काय करू? आता अजून एक टेंशन नको.
मी थोड्या वेळाने आर्याला घरी सोडून देईन. आजी पैसे देतील का? काही समजत नाही. थोड्या वेळाने विचारून बघू. नाहीतर आबासाहेबांना फोन करू.
मोहनराव आयसीयू मध्ये ऍडमिट होते. मीनलताई, सोनल बाहेर बसलेल्या होत्या. ती आईकडे बघत होती. आर्या तिच्या मांडीवर होती. राजेश, रसिका समोर बसले होते.
ऋषी हॉस्पिटल मधे आला. तो राजेश बोलत होते. ऋषीने लगेच पैसे भरले. राजेश डॉक्टरांना भेटायला गेला. ऋषी सोनलला भेटायला आला. "अहो बाबा."
"हो माहिती आहे." तो म्हणाला.
" लगेच ऑपरेशन करावे लागेल."
"हो पैसे भरले आहेत."
"काय? खूप खूप थँक्यु. तुम्हाला माहिती नाही तुम्ही किती मदत केली आहे." तिला काय करावं अस झालं होतं. ती त्याच्या मिठीत शिरली. ती खूप रडत होती. तो तिला सांभाळत होता. आर्या त्याच्या कडेवर होती.
"शांत हो सोनल. तू रडते आहे बघून आई ही त्रास करून घेतील. " तो म्हणाला.
ती बाजूला सरकून बसली.
" सकाळपासून बाबांना काहीच समजत नाही. त्यांना शुद्ध येईल ना?" सोनल विचारत होती. ती हळवी झाली आहे स्पष्ट समजत होतं.
"हो बाबांना ऑपरेशन झाल्यावर लगेच बर वाटेल."
"थँक्यु. तुम्ही पैसे दिले. मला माहिती आहे ही रक्कम जास्त आहे. मी थोडे थोडे परत करेन." सोनल म्हणाली.
"काळजी करू नकोस. बाबांना बर वाटायला पाहिजे. " तो म्हणाला. तो ही तिथे बसला. आर्या त्याच्या जवळ झोपली होती.
"अहो तुम्ही आर्याला घेवून घरी जा. बाबांच्या टेस्ट सुरू आहेत. ऑपरेशन बहुतेक रात्री होईल. थोडा आराम करा."
"तू ही घरी चालते का? " त्याने विचारलं.
"नाही मी इथेच थांबते. आईजवळ कोणी हवं."
" ठीक आहे. मी थोड्या वेळाने येतो. " तो आर्याला घेऊन गेला.
आजी, आशाताई घरी आलेल्या होत्या. सगळया मोहनरावां बद्दल विचारत होत्या.
"ऋषी पैसे भरले का? "
" हो आजी. "
" आपल चुकलं. आपण आधीच पैसे द्यायला हवे होते. सोनल वर सांगायची वेळ का आली? मी मागे ही सांगितलं होतं. तसे ते लोक फार चांगले आहेत. सोनल म्हणत होती जमेल तसे पैसे परत करेन." आजी सांगत होत्या.
"हो मला ही म्हणत होती." ऋषीने सांगितलं.
"ऋषी, माझं सोनलच बँक अकाऊंट एकत्र करून दे. त्यातून ती हव ते घेईल." आशाताई म्हणाल्या.
"नको आई मी बघतो. माझ लक्ष आहे." एक तर ते नेकलेसचं काय आहे? अजून समजलं नाही. तसा माझा सोनल वर विश्वास आहे. पण तरी ही चौकशी करावी लागेल.
ऋषी थोडा बिझी होता. थोड्या वेळाने तो खाली आला. "आजी मी हॉस्पिटल मधे जातो आहे. रात्री तिकडे थांबतो. "
" ऋषी जेवून जा. सोनल, बाकीच्या मेंबर साठी डबा ही ने. "
ऋषी डबा घेऊन आला. सोनलने मीनलताई, राजेश, रसिका सगळ्यांना जेवायला दिलं. ती ही जेवली. ती ऋषी सोबत कॅन्टीन मधे चहा घेत होती. " आर्या घरी रहाते ना? "
" हो पूनम घरी आली आहे. "
" ते राघव राव असतिल. "
" हो तो आला आहे."
" चला ते सोबत राहिले तर बर होईल. " सोनल मनापासून म्हणाली.
तो बघत होता. ही नेहमी माझ्या घरच्यांचा चांगल होवू दे असा विचार करते. नीट वागते. ती अशी घाबरलेली वगैरे नाही. नेकलेस घेतला असता तर ती इतकी मोकळी बोलली नसती. तिने नक्की तो नेकलेस हॉस्पिटल साठी मोडला असेल. पण मग ही मला सांगत का नाही. तो नेकलेस कोणाचा होता हे एकदा समजलं म्हणजे बर होईल.
रात्री स्पेशल डॉक्टर आले. पहाटे ऑपरेशन झालं. ऑपरेशन सक्सेसफुल झालं. थोड्या वेळाने मोहनराव शुद्धीवर आले. ते आय सी यू मधे होते. सगळे लांबून बघत होते. आत जायची परवानगी नव्हती. रात्रभर ऋषी ही हॉस्पिटलमध्ये होता.
" अहो तुम्ही घरी जा. बाबा आता ठीक आहेत." सोनल म्हणाली. तिला माहिती होत तो किती बिझी होता. यांना ऑफिसला ही जाव लागेल.
" तू जरा वेळ घरी येतेस का?"
"नाही. मी आईकडे बघते. " तो निघाला.
राजेश, सोनल, मीनलताई, रसिका हॉस्पिटल बाहेर उभे होते.
" राजेश दादा तू ही नीघ. तुझा जॉब महत्वाचा आहे. वहिनी तू ही जा. आम्ही इथे बघतो. " सोनल म्हणाली.
तो काही म्हणाला नाही.
" दादा काय झालं?"
"काल ऑफिस मधे महत्वाची मीटिंग झाली. बर्याच लोकांना काढून टाकलं. मला ही काढलं. मला घरी जायची घाई नाही. तुला शाळेत जायचं तर जा. मी बाबांकडे बघतो. " राजेश सांगत होता.
ते सगळे काळजीत होते. आता काय होईल. घर कस चालेल? बाबांच एवढं मोठं ऑपरेशन झालं. पुढे औषध असतिल. घेतलेले पैसे परत करायचे दूर दूर पर्यंत चान्सेस दिसत नव्हते.
" जावू दे दादा. मी आहे ना. तुला जॉब मिळे पर्यंत मी मदत करेन. ती कंपनी तशी होती. नुसत काम करून घेत होते. पगार वेळेवर देत नव्हते. " सोनल म्हणाली.
" मी कामाला सुरवात केली." रसिका म्हणाली.
" कुठे?" सोनल विचारत होती.
" घराजवळ एक क्लास आहे तिथे टीचर म्हणून जाते. पैसे कमी मिळतात. पण मी करेन. "
" तू चांगल करते आहेस वहिनी, पुढे जावून तू स्वतः चं काहीतरी करू शकते. क्लासेस काढू शकते."
" मी पण आहे राजेश. माझ्या ही फराळाच्या ऑर्डर असतात." मीनलताई म्हणाल्या.
" तू किती करशील आई. तू आता बाबांकडे बघ. "
आता काय कराव विचार करून सगळे नुसते उभे होते. बाबांच ऑपरेशन झालं हेच एक चांगल झालं होतं.
ऋषीने आत्ताच इतकी मदत केली. त्यांना परत दादाच्या जॉबच कस सांगणार. सोनल विचार करत होती.
मोबाईल सोनल जवळ राहिला म्हणून ऋषी परत आला. त्याने सगळं ऐकलं.
" एवढी काळजी करू नका राजेश दादा. तुम्ही माझं ऑफिस जॉईन करा. बायो डेटा पाठवा. सध्या बाबांकडे बघा. सोमवारी मला येवून भेटा." ऋषी म्हणाला. त्याने एका मिनिटात प्रश्न सोडवला होता. पैसा, पावर हाती असेल तर काहीही करता येतं.
राजेश खूप हुशार होता. तो कोणतही काम सहज करू शकत होता. त्याला बर वाटलं. ते सगळे ऋषी कडे बघत होते.
" पण काम अवघड असेल राजेश दादा. बंद पडलेली फॅक्टरी सुरू करायचा विचार करतोय. बिझनेस वाढला पाहिजे. ते काम तुम्हाला देतो."
" तुम्ही काहीही सांगा ऋषी. मी करेन. तुम्ही म्हणाल ते होईल. तुमच्या मुळे बाबा वाचले. आता हा जॉब देताय. तुम्हाला माहिती नाही ही किती मोठी मदत आहे." राजेश हात जोडत म्हणाला.
" अस म्हणु नका. हात तर मुळीच जोडू नका. तुम्ही सोनलचे भाऊ आहात. मला तुमच्या बाबांची सेवा करायची संधी मिळाली तेच खूप आहे. " ऋषी म्हणाला.
सोनल त्याच्याकडे बघत होती. मी खरच लकी आहे. मला इतका चांगला नवरा मिळाला.
ऋषी घरी आला. आजी, पूनम मोहनरावां बद्दल विचारत होत्या. आर्या नाराज होती. ती मम्मी... मम्मी करत होती. शेवटी तिने फोन लावला." मम्मी तू कुठे आहेस. घरी ये."
" आजोबा अॅडमिट आहेत ना बेटा. तू आत्तु, आजी जवळ नीट रहा. शाळेची तयारी झाली का? शाळेत जा. रडायचं नाही. लंच बॉक्स मधे काय आहे."
" माहिती नाही मम्मी. मला तू आवडते. तू लवकर ये." आर्या म्हणाली.
"हो. आजोबांना घरी सोडल मी लगेच येईल."
आर्या शाळेत गेली.
आशाताई आता बर्यापैकी फिरत होत्या. दहा पंधरा पाउल टाकत त्या हॉल मधे येवून बसल्या. त्यांनी सगळ्यां बरोबर नाश्ता केला. त्या ही सोनलच्या बाबांची चौकशी करत होत्या.
थोड्या वेळाने ऋषी ऑफिसला गेला. संग्रामने नेकलेस सोडवून आणला होता. तो त्याने त्याच्या बॅग मधे ठेवला.
******
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
