Login

सोनेरी नात्यांची वीण भाग 62

ही सोनेरी नात्यांची वीण आहे हळूहळू उलगडणार
सोनेरी नात्यांची वीण भाग 62

©️®️शिल्पा सुतार

दीर्घ कथा लेखन स्पर्धा डिसेंबर जानेवारी 2025-26

मोहन रावांच ऑपरेशन झालं. एक मोठ टेंशन कमी झालं. पण नेकलेस चा प्रॉब्लेम सुटेल का? आता पुढे...

आजी, पूनम हॉस्पिटल मधे भेटायला आल्या होत्या. मीनलताई, राजेश, सोनल त्यांचे आभार मानत होते.

"काहीही काय सुरू आहे सोनल? आपण फॅमिली आहोत. यापुढे अस बोलायचं नाही." आजी म्हणाल्या.

मीनलताई, आजी बोलत होत्या.

"मग पूनम तिकडे काय सुरू आहे? कोणीतरी तर छान सोबत आहे." सोनल तिला चिडवत होती.

" तू घरी नाही तर करमत नाही वहिनी."

" आर्या ठीक आहे ना."

" हो, ती तुझी आठवण काढते. "

सोनलला कसतरी वाटत होत. ती माझी जबाबदारी आहे.

थोड्या वेळाने त्या दोघी घरी गेल्या.

ऋषीचा फोन आला. "बाबा ठीक आहेत का?"

"हो अजुन आय सी यू मधे आहेत. आत्ताच डॉक्टर येवुन गेले." सोनल सांगत होती.

"अजून पैसे लागले तर सांग." ऋषी म्हणाला.

" हो, तुम्ही आईकडे दिलेले पैसे आहेत."

ऋषीने मीनलताईं कडे पैसे देवून ठेवले होते. त्यातून पुढे जावून औषध वगैरे घेणार होते.

आता सोनलला बरं वाटत होतं. ऋषी माझ्यासाठी खूप करतात. मी पण त्यांच खूप करेन. खरचं देव पावला हे स्थळ आमच्याकडे आलं. बर झालं मी लग्नासाठी होकार दिला. नाहीतर बाबांच आज काय झालं असतं?

तीन दिवसांनी मोहनरावांना घरी सोडलं तोपर्यंत सोनल हॉस्पिटलमध्येच होती. ते सगळे घरी आले.

"सोनल तुझी खुप मदत झाली." मीनलताई म्हणत होत्या.

" काहीही आई. आता काळजी करायची नाही. तू आणि बाबा तब्येतीची काळजी घ्या. दादाला ही जॉब मिळाला. आता मोठ घर घ्या." सोनल म्हणाली. इथे खूप अडचण होत होती. कसतरी ते ऐडजेस्ट करत होते.

" हो आधी हे घर सोडवून घेवू. त्यावर फार कर्ज आहे. वेळ लागेल पण होईल. हे ऋषी रावां मुळे शक्य झालं. "

" हो ना खरच हे खूप चांगले आहेत." सोनलला बर वाटत होतं.

रसिका वहिनी चहा घेवून आली. ती ही नीट वागत होती.

******

दुसर्‍या दिवशी राजेश ऋषीला ऑफिस मधे भेटायला गेला. ती कंपनी ते ऑफिस बघून त्याला काही सुचत नव्हतं. ओह माय गॉड किती पॉश आहे. त्याचा लगेच इंटरव्ह्यू झाला. तो बाहेर बसून वाट बघत होता.

"बोला काय रीपोर्ट?" ऋषी मॅनेजरला विचारत होता.

"राजेश फार हुशार आहे. काहीही करायची तयारी आहे साहेब. इंजिनियर आहे. माणूस कामाचा आहे."

"एक फिक्स पेमेंट द्या. सिक यूनीट नंबर तीन जॉईन करायला सांगा. ऑर्डर सक्सेस फुल झाली तर इन्सेंटिव्ह ही मिळेल अस पेपर वर द्या. फूल डीसीजन घेता येतील. " ऋषीने पेपर वर आकडा टाकला. सही केली.

"साहेब एवढा पगार?" मॅनेजर बघत बसला.

"माझे साले साहेब आहेत. बायको नाराज व्हायला नको." ऋषी हसत म्हणाला.

ते ही हसत होते.

राजेशला एक सिक युनिट सांभाळायला दिलं. तो लगेच जॉईन झाला. तिथे ऑलरेडी कामं सुरू होतं. तो माहिती घेत होता त्याच्या डोक्यात खूप आयडिया होत्या. तो त्या वापरणार होता.

ऋषीची टीम वाढत चालली होती. पूनम, राघव, आता राजेश जॉईन झाला.

सोनल शाळेत जॉईन झाली. संध्याकाळी ती घरी आली. आर्या खूप खुश होती. ती तिच्या जवळ होती.

" मम्मी तू नव्हती तरी मी होम वर्क पूर्ण केला."

" व्हेरी गुड."

" मम्मी तुला काम असलं तर तू बाहेर जाणार ना." आर्या विचारत होती.

" हो बेटा."

" तेव्हा मी रडणार नाही मम्मी."

"तू खूपच हुशार आहेस माझ बाळ." दोघींच फार छान बाॅंडींग तयार झालं होतं. तिला पूनमने अस समजून सांगितल होतं.

" मी बागेत खेळते."

" हो."

सोनल किचन मधे बघत होती. ती थोड्या वेळाने आशाताईंना भेटायला गेली. ती तिथे बसली होती. दोघी बोलत होत्या.

" कपाटातून ती पर्स दे बेटा. "

सोनलने उठून पर्स दिला. त्यांनी त्यातून डेबिट कार्ड काढून तिला दिलं.

"हे काय आई? मला नको."

" तुझ्याकडे असू दे. तुझे बाबा आजारी आहेत लागतील."

"नाही आई, ऋषी बघत आहेत. आता प्रॉब्लेम ठीक झाला."

"तू मला आधी का सांगितल नाही. " त्या ओरडल्या.

" हो ना आई. सगळं नवीन नवीन आहे मला ही काय कराव समजलं नाही."

पूनम, राघव सोबत घरी आले. ते आज घरासाठी सामान घ्यायला गेले होते. दोघ खुश होते. आर्या ही त्यांच्यात बसली होती.

" वहिनी हे बघ काय काय आणलं. "

" वाह. " सोनल त्यांच्यात बसली होती.

ऋषी घरी आला. फ्रेश होऊन आला. ते जेवायला बसले. सोनल घरी असल्यामुळे आज सगळ्यांना चांगलं वाटत होतं.

आर्या बर्‍या पैकी तिच्या हाताने जेवत होती. आशाताई ही पुढे येवून बसल्या होत्या. सोनल सगळ्यांना व्यवस्थित वाढत होती. ती पण ऋषी जवळ बसली.

"आज तू घरी आहेस तर छान वाटत आहे वहिनी. तू आमच खूप करतेस." पूनम म्हणाली.

" मी काहीच करत नाही. तुम्ही मला किती मदत करताय. आजी, ऋषी खूप थॅंक्यु तुमच्यामुळे बाबा वाचले." सोनल म्हणाली.

"असं काही नाही. उलट आम्ही कोणाच्या कामाला आलो." आजी म्हणाल्या.

ऋषी काही म्हणाला नाही.

" तुझं काय ठरलं पूनम? " आजी विचारत होत्या.

" आम्ही घर बघीतलं आहे. एक दोन दिवसात व्यवहार होईल. "

" घरी सांगितलं का? "

"हो सांगितलं पण तरीसुद्धा मी स्वतः जाणार आहे. " पूनम सांगत होती.

" बरं होईल. "

"राघव सुद्धा कंपनी जॉईन करणार आहे. त्याने तिकडे राजीनामा दिला आहे. तरी त्याला तीन महिने तिकडे काम करावे लागेल. नोटिस पिरेड आहे. " पूनम सांगत होती.

"आपण उरलेले पैसे भरून टाकू." ऋषी म्हणाला.

" हो त्याच्या मनाप्रमाणे पण होऊ दे. तो म्हणाला तर पैसे भरू. " पूनम म्हणाली.

" मी सांगतो दादा. " राघव म्हणाला.

" काही हरकत नाही. " ऋषी म्हणाला.

जेवण झालं. सोनल आर्याला झोपवत होती.

थोड्या वेळाने सोनल रूम मध्ये आली. ऋषी तिची वाट बघत होता. ती तीच सामान नीट ठेवत होती. ऋषी तिच्याकडे बघत होता. तिला ही ते समजत होतं. त्याने तिला मिठीत घेतलं. दोघं शांत होते.

"अहो खूप थँक्यु. आजपासून तुम्ही म्हणाल ते मी करेन. " सोनल हिम्मत करून म्हणाली.

"हे का आता? माझ्यासाठी की मी हेल्प केली म्हणून मला गिफ्ट." त्याने तिच्या कानाजवळ जावून कुजबूज केली. तिच्या अंगावर काटा आला होता. गोड भावना मनात होत्या. ती लाजली होती.

"दोघ. तुम्ही मला समजून घेता. तुम्ही माझ्यासाठी काय केलं तुम्हाला माहिती नाही. "

" पुरे सोनल. अस बोलायचं नाही. "

" दादाला मदत केली. बाबांची ट्रीटमेंट झाली. मला आधार दिला." ती मनापासुन म्हणाली.

" एवढ काही विशेष नाही. प्लीज शांत हो. मला आता ओकवर्ड वाटत आहे. सगळ्यांना आपल्या नशिबात असतं ते मिळतच. " ऋषी म्हणाला.

नेहमीप्रमाणे ती आवरून आली. ती खुश होती. ऋषी टीव्ही बघत होता.

" सोनल इकडे ये. " ती त्याच्या जवळ बसली.

त्याने तिच्याकडे बॉक्स दिला. ती उघडून बघत होती. तिचा नेकलेस होता. तिला खूप कसतरी वाटलं. ती खाली बघत होती. "सॉरी."

"कशाबद्दल?" त्याने विचारलं.

" ते मी न विचारता नेकलेस मोडला. त्या दिवशी बाबा ऍडमिट होते. तेव्हा बाबांची टेस्ट करणं फार गरजेच होत. त्यांना औषध ही हवे होते. पैसे भरल्या शिवाय ट्रीटमेंट सुरू होत नव्हती. मला काही सुचलं नाही." सोनल सांगत होती.

" काही हरकत नाही. अश्या वेळी मला एक फोन केला असता तरी काम झालं असतं. हा कोणाचा नेकलेस आहे?" त्याने विचारलं.

"आपल्या लग्नातला. माझा. " ती म्हणाली. मग तिला समजलं हे काय म्हणता आहेत. ओह माय गॉड. गैरसमज होतो आहे.

" आपल्या लग्नात मामींचा नेकलेस हरवला होता. तो मी घेतला नाही. " तिने मोबाईल मधला तिचा फोटो दाखवला.

" हा फोटो बघा. माझ्या गळ्यातला हा वरचा नेकलेस आहे. "

" मी असं म्हटलं का? " तो म्हणाला.

"नाही, पण तरी मामींचा आमच्या घरच्यांवर संशय होतात म्हणून सांगितलं. तुम्हाला ही आत्ता वाटल ना. अजून एक सांगायचं आहे. आजींनी माझ्या बाबांच्या ऑपरेशन साठी पन्नास लाख रुपये द्यायचे कबूल केले होते म्हणून मी लग्नाला हो म्हणाले होते. नंतर तुम्हाला समजलं तर प्रॉब्लेम येईल म्हणून आधीच सांगते. " सोनल म्हणाली.

" हो मला हे माहिती होतं. आजीने सांगितलं होतं. माझ्या मनात नेकलेस बद्दल काही नव्हतं फक्त वाटल की तू मला का सांगितलं नाही. " ऋषी म्हणाला.

" एक रिक्वेस्ट करू का? तो मामीचा नेकलेस कोणी घेतला हे समजेल का? त्याची चौकशी करा ना. मला आता आमच्यावरचा आरोप सहन होत नाही. " सोनल म्हणाली. ती नाराज होती.

" शांत हो सोनल. खरच सॉरी. फक्त मला खर काय आहे ते जाणून घ्यायचं होतं. म्हणून विचारलं." ऋषी म्हणाला.

" मी तुम्हाला काही म्हणत नाहिये. पण हा आरोप कायम सगळ्यांच्या मनात राहील. "

"तिथे हॉलमध्ये सीसीटीव्ही होते. मी चौकशी करतो." ऋषी म्हणाला.

ती सोफ्यावर जावून झोपली.

ऋषी बघत होता. त्याला वाटल होत ती कॉटवर झोपेल. ते सोबत वेळ घालवतील. पण सोनल हर्ट झाली होती. त्याला समजत होतं.

हे दागिने तिचे स्त्री धन आहे. ती हवं तस वापरु शकते. तिने नेकलेस चांगल्या कामासाठी वापरला. वडीलांच्या ट्रीटमेंट साठी पैसे वापरले होते. मी पण उगीच तिला बोललो. तिच्याशी बोलू का? नको? आधी सत्य काय आहे ते शोधायला हवं.

******

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"


0

🎭 Series Post

View all