Login

सोनेरी नात्यांची वीण भाग 64 अंतिम

ही सोनेरी नात्यांची वीण आहे हळूहळू उलगडणार
सोनेरी नात्यांची वीण भाग 64 अंतिम

©️®️शिल्पा सुतार

दीर्घ कथा लेखन स्पर्धा डिसेंबर जानेवारी 2025-26

सोनल, ऋषीच्या सुखी संसाराला सुरवात झाली होती. दोघ खूप खुश होते. आता पुढे...

सोनल सकाळी उठली. ऋषीने परत तिला मिठीत घेतलं.

"अहो सोडा ना. आवरावं लागेल. खाली जावं लागेल. किती वाजले ते ही पाहू द्या. "

" आज शाळेत जावू नकोस. आपण असच सोबत राहू."

" अस चालणार नाही. घरात बाकीचे लोक ही आहेत ते काय म्हणतील. शाळेत ही मधेच सुट्टी घेता येत नाही. मी लवकर घरी येईल." सोनल सुटायची धडपड करत होती. ऋषीची मिठी घट्ट होती.

"आपण फिरायला जायचं." त्याने तिच्याकडे बघत विचारलं.

"हो. आर्याला ही नेवू ना. आपण दोघे नाही ना. आपल्याला लेक ही आहे. तिला एकटं सोडायला नको. मला तिच्या शिवाय करमत नाही. "सोनल म्हणाली.

ऋषी आता निर्धास्त होता. माझ्या पेक्षा हिला आर्याची जास्त काळजी आहे. अजून काय हवं? लग्न करायचा माझा हाच तर उद्देश होता. सोनल सगळ्यांना सांभाळून घेते. खूप प्रेम देते.

"तू म्हणते ते करू. मी तुझ्या शब्दा बाहेर नाही. " तो म्हणाला.

सोनल किचन मधे होती. तिच्या सोबत आर्या होती. आर्या बडबड करत होती.

"पटकन खा आर्या. पराठा आवडला ना. दूध ही पि." तिने तिची पापी घेतली.

"हो मम्मी. डब्याला हाच पराठा दिला ना?" तिने विचारलं.

"हो."

आर्या शाळेत गेली.

पूनम धावपळीत होती. आज ती तिच्या सासरी जाणार होती. त्यानंतर त्यांनी नवीन घर घेतलं होतं तिथे हळूहळू सामान शिफ्ट करणार होते. त्यानंतर लगेच पूजा होती. ती तिकडे रहायला जाणार होती.

सोनल पुढे बसली होती. पूनम तिच्याकडे बघत होती. "वहिनी, मग काल तुम्ही केव्हा परत आला?"

"उशीर झाला होता."

"हो का, झोपायला ही उशीर झालेला दिसतोय. काय विशेष? दादा काय म्हणाला?" ती मुद्दाम चिडवत होती.

" पुरे ग." सोनलचा चेहरा सगळं सांगत होता.

" थोड तरी सांग."

" जा बाई मी आत लंच बॉक्स पॅक करते." सोनल आत गेली. पूनम हसत होती.

ऋषी खाली आला. "सोनल कुठे आहे?"

"आहे, तुझी बायको इथेच आहे. काय बाई वहिनी दादा दादा करते, दादा ही सारखं वहिनी कुठे ते बघतो. बघितलं राघव. " पूनम म्हणाली

राघव, आजी हसत होते.

" काहीही आपलं मी सहज विचारलं. " ऋषी हसत म्हणाला.

राघव आणि पूनम नाश्ता करून निघाले. सासरी आले. त्यांनी घेतलेल्या निर्णयाच घरच्यांनी स्वागतच केलं. ते पण फ्लॅट बघायला आले होते .सगळ्यांना घर आवडलं.

" काय काय सामान हवं ते लिस्ट करून घे पूनम." तिच्या सासुबाई म्हणाल्या.

पूनम विचार करत होती यांनी आधीच इतकं समजूतदार पणे घेतलं असतं तर ही वेळ आली नसती. आता अस ही ठीक आहे. गोड राहू. राघव साठी मला हे कराव लागेल.

******

सोनल शाळेत आली. सुभाष भेटायला आला होता. त्याला बघून ती घाबरली होती. त्याने आवाज दिला. " सोनल..."

"तुमचं आता इथे काय काम आहे?" तिने विचारलं.

"तू लग्न केलंस का?"

"हो."

"ऋषी इनामदार तुझे मिस्टर आहेत का?" त्याने विचारलं.

" हो. "

" चांगलाच हात मारला."

" हे काय बोलणं झालं. किती घाणेरडे विचार आहेत. तुमचं आता काय काम आहे. मला यापुढे भेटायला यायचं नाही आणि फोन करायचा नाही." सोनल म्हणाली.

"थोडे पैसे लागत होते." सुभाष म्हणाला.

" हे तुम्ही मला का सांगताय? आधी तर पैसे मागून, हुंडा घेवून मला खूप त्रास दिला. आता काय आहे? यापुढे तुमचा माझा काही संबंध नाही. " सोनल म्हणाली

ती आत जात होती. त्याने रस्ता अडवला.

" मला पन्नास हजार रुपये हवे आहेत. उद्या यावेळी भेट. तुझा नवरा तर खूप श्रीमंत आहे. तुझ्यासाठी ही रक्कम काही विशेष नाही. नाहीतर मी काय करेल सांगता येत नाही. " त्याने धमकी दिली.

ती घाबरली होती. काय करावं? तिने ऋषीला फोन करून सगळं सांगितलं. उगीच स्वतः सगळं सोडायला गेल तरी यांना बरोबर समजत. त्यापेक्षा मीच आधी सांगितलेलं बर.

आबासाहेबांनी तिला आत बोलवलं." तुला लोन हवं होत ना?"

"बाबांचं ऑपरेशन झालं." ती सांगत होती.

" कुठून पैसे भरले ?"

"माझ्या मिस्टरांनी दिले. "

"ऋषी इनामदार तुझे मिस्टर आहेत?" त्यांनी विचारलं.

"हो सर."

" वाह, तुमचं कस जमलं?"

"आजी आणि आई मैत्रिणी आहेत. मंदिरात ओळख झाली. तिथे लग्न जमलं."

" आता छान रहा. ही नोकरी करणार ना? ". त्यांनी विचारल. त्यांना माहिती होतं ऋषी किती श्रीमंत आहे.

" हो आबासाहेब हे माझ काम आहे. मी सोडणार नाही. "

ती वर्गात आली. रीव्हीजन सुरू होती.

ऋषी रात्री घरी आला. ती सुभाष बद्दल परत सांगत होती." मला त्याची भिती वाटते. "

" काळजी करू नको. बंदोबस्त होऊन जाईल. तू त्याच्या कानामागे ठेवून द्यायची होती. ठीक आहे मी बघतो. माझ्या लाडक्या बायकोला त्रास देतो म्हणजे काय." त्याने तिला जवळ घेतलं.

" अहो. सोडा ना. खाली जेवायला चला. "

" त्या आधी थोड. " तो मुद्दाम तिला पकडत होता.

" तुम्ही असे निघाल मला वाटल नव्हतं." ती म्हणाली.

" कस?" त्याने विचारलं.

"रोमँटिक." ती छान हसत होती.

" टॉवेल दे. जरा नवर्‍याची सेवा करत जा. नुसत सुंदर दिसलं म्हणजे झालं का? "

दोघे खाली आले. आर्या, आजी, आशाताईं सोबत जेवण झालं. पूनम, राघव कामात होते. ते उशिरा घरी येणार होते.

दुसऱ्या दिवशी सोनल शाळेत आली. ती कार मधून उतरली. कार पुढे गेली. सुभाष लक्ष देऊन होता. त्याने तिला अडवलं.

संग्राम आणि इतर लोक मध्ये आले. त्यांनी सुभाषची चांगलीच धुलाई केली.

"यापुढे आमच्या मध्ये मध्ये करायचं नाही. यापुढे जर सोनल मॅडम भेटायचा कींवा फोन करायचा प्रयत्न केला तर बघा. आमच्याहून कोणी वाईट नाही."

सुभाषला पोलीसांच्या ताब्यात दिलं.

पुनमकडे दुसऱ्या दिवशी पूजा होती. सकाळी सोनल तयार होती. हिरवी काठ पदराची साडी ती नेसली होती. ऋषी, आर्या तिच्याकडे बघत होते.

" मम्मी किती सुंदर दिसते ना डॅडी. " आर्या म्हणाली.

"हो बेटा. " ऋषी म्हणाला.

" आटपा दोघांनी, आवरा बर. " सोनल आवाज देत होती.

" जा आर्या रेडी हो." ऋषी म्हणाला.

" हो चल मम्मी." आर्या म्हणाली.

" तू इकडे ये सोनल."ऋषी आवाज देत होता.

" तुम्ही आर्या समोर काहीही काय बोलता हो. मी खाली आहे लवकर आवरून या." सोनल त्याला ओरडत होती.

" अरे माझे कपडे कुठे आहेत ते तरी सांग. "

" आर्या लहान आहे तिला मदतीची गरज आहे. तुम्ही तुमचं आवरा. "

" याला काय अर्थ आहे. " ऋषी आवरत होता.

ते पूनमच्या फ्लॅटवर आले. आजी, आशाताई नंतर येणार होत्या. खूप सुंदर फ्लॅट होता. सगळ्यांना आवडला.

पूनमच्या सासरचे लोक आलेले होते. सगळ्यांनी ओळख करून दिली. सोनल खूप कामात होती. सत्यनारायणाची पूजा व्यवस्थित झाली. त्यानंतर जेवणाचा प्रोग्राम होता.

दुपारनंतर ऋषी ऑफिसला गेला. सोनल, आर्या... पूनम बरोबर घर लावायला मदत करत होत्या. जरा वेळाने ते सगळे घरी आले.

ऋषी रात्री घरी आला. ते जेवायला बसले.

"आत्तू घरी नाही तर वेगळंच वाटत आहे ना?" आर्या म्हणाली.

"हो ना पण ती तिच्या घरी आहे हे जास्त बरं वाटतं आहे. ती सुखी राहायला हवी." सोनल मनापासून म्हणाली

आशाताई, आजी, ऋषी सगळे सोनल कडे बघत होते. ही खरच फार चांगली आहे.

सोनल आर्याला झोपवत होती. ऋषी ही त्यांच्यात बसला होता. थोड्या वेळाने ते दोघ रूम मधे आले.

"अहो मी उद्या माहेरी जाणार आहे."

" का? " ऋषी तिच्याकडे बघत होता.

" बाबांना चेकअप साठी न्यायचं आहे. आता दादा वहिनी बिझी आहेत."

"ठीक आहे संध्याकाळी परत ये."

सोनल शाळा सुटल्यावर आईकडे आली. ती... मीनलताई, मोहनरावांना घेऊन हॉस्पिटलमध्ये आले. त्यांच चेकअप झालं. तब्येत व्यवस्थित होती. डॉक्टरांनी अजून औषध लिहून दिले.

"आई पैसे आहेत ना? "

" हो खूप पैसे आहेत. मी विचार करत होती ते ऋषी रावांना परत करते. "

" ते घेणार नाही. बाजूला असू दे. तुमच्या दोघांसाठी वापरा."

सोनलने त्या दोघांना घरी सोडलं. रसिका घरी आली होती. ती जरा व्यवस्थित वागत होती. राजेशचं काम जोरात सुरू होतं. एक मोठ्या ऑर्डर वर तो काम करत होता. त्या ऑर्डर मुळे कंपनीला खूप प्रॉफिट होणार होता.

पूनम इकडे तीच सामान घ्यायला आली होती. ते सगळे बोलत होते.

"आम्ही फिरायला जातो आहोत." ऋषीने सांगितलं.

आर्या खूप खुश होती. ती काय घ्यायला घ्यायचं ते ठरवत होते.

"तू नाही जाणार आहेस बेटा. तू माझ्यासोबत थांबणार. आत्तू कडे येणार ना." पूनम म्हणाली.

आर्या सगळ्यांकडे बघत होती.

"आपण मस्त गार्डनमध्ये फिरायला जाऊ. बर्गर खावू. " पूनम तिला समजावत होती.

" ती पण आमच्या सोबत फिरायला येणार आहे. पूनम, राघव सुद्धा येणार आहेत. " ऋषी म्हणाला.

" तुमच्यामध्ये आमचं काय काम? तुम्ही दोघं जाऊन या. " पूनम म्हणाली.

" आपण सगळ्यांनी जायचं आहे." ऋषीने बुकिंग केली. सोनल बॅग भरत होती.

" ऋषी, आर्या तुमचे कोणते कपडे घ्यायचे? पटकन सांगा. "

आर्या तिचे कोणते फ्रॉक घ्यायचे सांगत होती. ऋषीचे कपडे सोनलला घ्यावे लागले.

दुसऱ्या दिवशी सकाळी ऋषी, सोनल, आर्या, राघव, पूनम सगळे निघाले. आजी बाहेर पर्यंत आल्या होत्या. त्या खूप सूचना करत होत्या.

"एकमेकांची काळजी घ्या. आर्या कडे बघा नाहीतर तुम्ही तुमच्या दुनियेत मस्त असाल. "

आशाताई पण सगळ्यांशी छान बोलत होत्या.

ते निघाले. छान समुद्रकिनारी रिसॉर्ट बुक केला होता. ते वातावरण सगळे उत्सुक होते. ऋषी सोनलच्या समोरच पूनम आणि राघव रूम होती.

रूम मधे सामान ठेवून ते समुद्रावर गेले. सगळे खूप खेळत होते. ऋषी, सोनल हातात हात घेवून दूरवर फिरून आले. तोपर्यंत जेवणाची ऑर्डर दिली होती. खूप मजा येत होती. सोनल आर्याला खूप छान सांभाळत होती.

ते रूम वर आले. दमून आर्या झोपली होती. ऋषीने दरवाजा बंद केला.

"अहो काय हे?"

"फिरायला आलो ना मग चल इकडे ये." दोघ सोबत होते.

" इकडे किती छान वाटत ना?" सोनल म्हणाली.

"इथे बंगला बांधायचा का?" त्याने विचारल.

सोनल छान हसत होती. "तुम्ही काहीही करू शकता."

"आता वेळ वाया घालवू नकोस. नाहीतर आर्या उठेल. " दोघ रमले होते.

दुसर्‍या दिवशी ते तिथे फिरायला गेले. जवळच किल्ला होता. तो बघून झाला. पूनम, आर्या, सोनल ने खूप शंख शिंपंले गोळा केले. खूप मजा येत होती. जेवण ही खूप छान होतं. आज त्यांनी बोटीत बसुन दूर पर्यंत लांब फेरा मारला. आर्या सोबत सोनल खुश होती.

रात्री पूनम आर्याला घेऊन गेली. ऋषी सोनल रूम मध्ये होते. तो तिच्या मागे मागे करत होता. तिच्याशी गोड बोलत होता. "आता काय करू या?" त्याने विचारलं.

दोघ बाल्कनीत समुद्राकडे बघत बसले होते. दोघांचे हातात हात होते. तिने त्याच्या खांद्यावर डोकं टेकवलं होतं. थोड्या वेळाने त्याने तिला उचलून आत नेलं. दोघ रमले होते. ते आता खूप सुखी राहणार होते.

"अहो मला तर हे स्वप्नं वाटत आहे."

" हे सत्य आहे सोनल. आपण सोबत आहोत. आपण असच राहणार आहोत."

ती खुश होती. तिने अजून पुढे येवून ऋषीला मिठी मारली. तो तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत होता. ती त्याच्या सानिध्यात विरघळत होती. एक सुखी कुटुंब पूर्ण झालं होतं.

समाप्त.

वाचकांचे खूप आभार.

******

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"


0

🎭 Series Post

View all