सोनेरी नात्यांची वीण भाग 5
©️®️शिल्पा सुतार
दीर्घ कथा लेखन स्पर्धा डिसेंबर जानेवारी 2025-26
सोनल घरी आली. बघू आता आई, बाबा, मावशी म्हणताय ते तिला पटत का? ती लग्नाला होकार देते का?
रसिका वहिनी चहा करत होती. सोनल समोर बसली.
"दमली का ग?" मावशींनी विचारलं.
" हो मावशी."
" काय बाई पोरीच्या मागे फिर फिर आहे. पण सोनल तू खूप लकी आहेस. तुझ्यासाठी एक खूप छान स्थळ आलं आहे. हे लग्न झालं ना तर ही राज्य करेल राज्य." मावशी नजर काढत म्हणाल्या.
सोनल मीनलताईं कडे बघत होती. "आई काय आहे? तुम्हाला काही काम नाही का? रोज उठून या मावशी इथे येतात. वेगवेगळे स्थळ सुचवतात. मला मोकळ सोडा."
" काय प्रॉब्लेम आहे सोनल? जे झालं ते गेलं. किती दिवस त्रास करून घेणार? यापुढे तू अशीच राहणार का? काय चिडचिड आहे? अग ऐक तरी हे स्थळ खूप छान आहे. " मावशी म्हणाल्या.
" काही का असे ना माझा नकार आहे. माझं डोक दुखत आहे. आई मी आत पडते. मला प्लीज त्रास देवू नका. " सोनल चिडचिड करत होती.
रसिकाने खूण केली. राजेश बाहेर येवून त्यांच्यात बसला. सोनल सगळं बघत होती. आता हे नक्की सगळे मिळून मला समजावतील.
मावशी ऋषी बद्दल सांगत होत्या. सगळे सोनलकडे बघत होते.
" इतक चांगलं स्थळ शोधून सापडणार नाही. बंगला इतका मोठा आहे. आपली पूर्ण गल्ली त्यात बसेल इतका मोठा परिसर आहे. गाडी, नोकर, चाकर, मोठी फॅक्टरी सगळं काही आहे. काही करावं लागणार नाही फक्त नीट वागायचं. इनामदार साहेबांना सांभाळून घ्यायचं." मावशी बोलत होत्या.
इनामदार साहेब म्हणजे कोण असेल? ते असं का अचानक का लग्न करताय? कधी न बघितलेली मुलगी त्यांनी का पसंत केली? ते तर श्रीमंत आहेत. किती स्थळ येत असतिल. मग त्यांच्यात काही प्रॉब्लेम असेल का? की वयस्कर असतिल? ही नक्की फसवणूक आहे. मला यात पडायचं नाही. ती विचार करत होती.
"मला लग्न करायच नाही. तुमचं काहीही सुरू असतं. इथे मी शाळेतून दमून येते. घरी असं. " सोनल चिडली होती
" तुला हे लग्न करावं लागेल. चांगलं स्थळ आहे. उगीच हट्ट करू नकोस सोनल. आई, बाबा आपला चांगला विचार करतात. " राजेश म्हणाला.
"तू काय बोलतो दादा? मी आई बाबांच नेहमी ऐकते. पण माझ्या आयुष्यात अश्या घटना घडल्या, आता काहीच नको वाटतं." सोनल त्याच्याकडे बघत म्हणाली.
"सोनल ताई हे बरोबर बोलत आहेत. लग्नाचा विचार करा. तुमचं म्हणजे देव देतो कर्म नेतं अस आहे. आम्हाला ही आमचा संसार आहे. तुमच ओझं किती दिवस इथे. त्यापेक्षा मानाने लग्न करून घ्या." रसिका म्हणाली.
" अरे याला काय अर्थ आहे? माझ ओझे होतं असेल तर मी दुसरीकडे रहाते, त्यासाठी लग्न हा एकमेव पर्याय नाही ना. आई, बाबा हे बघा कसे बोलत आहेत. मी माझं कमवते. उलट तुम्हाला पैसे देते. आईच करते. रसिका वहिनी तुला पैसे द्यायची गरज नाही. तू असेच माझ्या पर्स मधून पैसे घेते. " सोनल चिडली होती. ती पण खूप बोलली.
"अहो बघितलं का? सोनलताई माझ्यावर आरोप करत आहेत. मला यापुढे त्या इथे रहायला नको आहेत. त्यांना त्यांच बघायला सांगा. " रसिका बडबड करत होती. ती राजेश जवळ जावून बसली.
" रसिका तू शांत हो. जावू दे. सोनल बेटा मी काय म्हणते आहे. तू तरुण आहेस. झालं ते गेलं. परत आयुष्य सुरु करावं लागेल ना. किती दिवस इथे राहशील. चांगल स्थळ आलं आहे. विचार कर. " मावशी ऋषी बद्दल सांगत होत्या.
" ऋषी इनामदार म्हणजे त्या आजींचा नातू का? " सोनलने विचारलं.
" हो, त्या मंदिरात भेटतात त्या. "
" त्याच तर उद्या लग्न होत ना? मग काय प्रॉब्लेम झाला? " सोनलला माहिती होतं. आजींनी यांना ही आमंत्रण दिले होते.
" ती नवरी पळून गेली. " मीनलताई सांगत होत्या.
" ती पळून गेली म्हणून आता मी का? मी बरी सोपी सापडली? मला जमणार नाही. एकतर मला परत लग्न करायच नाही. अस घाईत तर मुळीच नाही. असे चुकीचे निर्णय होतात. आता परत तो ताण मला नको आहे. कोण कोणते ते लोक. ओळखीचे नाहीत. त्यांना मुलगी ही आहे ना. " सोनल म्हणाली.
" तुमचा ही डिवोर्स झाला की सोनलताई. ते विसरू नका. " रसिका म्हणाली.
घरचे सोनलला लग्नासाठी तयार करतील का? काय होईल पुढे? वाचत रहा.
******
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा