सोनेरी चौकट

किती तरी दिवसांत तिने पायात चाळ घातले नव्हते की साधी गिरकी घेतली नव्हती
सोनेरी चौकट

*सोडी सोन्याचा पिंजरा*
** भाग एक**
“हे बघा सुनबाई आता तुम्ही एका घरंदाज घराण्याची सून आहात तेव्हा हे असे नाचणारिच्या सारखे वाजणारे पैंजण आता शोभत नाही,हे घ्या नवीन नाजूक तोरड्या घाला.

मधुचंद्राच्या गोड आठवणीत हरवलेल्या नूपुर ला ऐकून धक्काच बसला . इतके वर्ष घातलेले गुरुजींनी आशीर्वाद स्वरूप दिलेले पैंजण काढून टाकायचे?
मुकाट्याने पैंजण काढून तिने नाजूक नवे पैंजण घातले. जुने पेटीत ठेवताना तिला जाणवले आता ती पूर्वीची स्वच्छंद वातावरणातली लेक नाही तर एका घरंदाज घराण्याची सून आहे .

फिरून आल्यानंतर निनाद त्यांच्या कामात व्यस्त झाले…

नव्या घरातल्या रितीरिवाज समजून घेताना नूपुर ला जाणवले बाहेरून किती जरी नवीन विचाराचे वाटत असले तरी बरेच रुढीवादी लोक आहेत आणि आता तिलाही तसेच वागायला भाग पाडू पाहतात आहे .
आईकडे तिचे जाणे खूपच कमी होत असे सासरी खुश आहे असे समजून माहेरचे फार लक्ष नव्हते घालत.
आपल्या हातातून बरेच काही निसटते आहे असे सारखे जाणवत होते तिला.

लवकरच तिला आई होण्याची चाहूल लागली आता दोन्हीकडून कौतुका बरोबरच सूचनांच्या दृष्चक्रात ती अडकली.
“ फार धावपळ नको, नाच अजिबात करू नको ,दगदग फारशी बाळासाठी बरी नाही.”

कितीतरी महिने झाले तिने पायात चाळ घातले नव्हते की एक साधी गिरकी पण घेतली नव्हती .

दिवस भरले नुपूरला मुलगा झाला म्हणून सासऱ्यांनी तिला भेट म्हणून स्पर्धेत मिळालेले प्रशस्तीपत्र अस्सल सोन्याच्या चौकटीत मढवून दिले तिने कौतुकाने खोलीत भिंतीवर लावले दुरून त्याची सोनेरी चौकट त्याची झळाळी त्यांच्या ऐश्वर्याची जाणीव करून देत होते.

ते प्रशस्तीपत्र पाहता पाहता नुपूर त्या स्पर्धेच्या आठवणीत हरवली….


नूपुर शालेय शिक्षण पूर्ण करून कालेज ला दाखल झाली. कॉलेजचे ते फुलपंखी दिवस अनेक नवीन दालन नुपूर समोर उघडली जात होती.
“ अभ्यासाकडे दुर्लक्ष होता कामा नये”--- बाबांची ताकीद नूपुर नेलक्षात घेतली , प्रत्येक क्लास नीट अटेंड करत असे, तर डान्स क्लासच्या परीक्षाही ती छान तऱ्हेने पास होत होती...मुळातच तिला लहानपणापासून नृत्यांगना व्हायचे होते
कॉलेजची पहिली टर्म नुकतीच आटोपली होती पेपर छान गेले त्यामुळे वातावरणातील अभ्यासाचा ताण कमी होऊन एक आनंदी खेळकर पणा सर्वांमध्ये आला होता.

“कॉलेजच वार्षिक संमेलन लवकरच आहे” सर म्हणाले ..

“काय काय कार्यक्रम बसवणार आहे?


नुपूर तुझा डान्स परफॉर्मन्स ठेवू शकतो
एक दोन प्रतिभागीअजून आहेत!
नक्कीच, नूपुर खूप आनंदली…
--------------------------------------------------------------
क्रमशः
—---------------------------------------------