सोडी सोन्याचा पिंजरा

नूपुर ला आता खूप तयारी करायची होती
सोनेरी चौकट भाग दोन
*सोडी सोन्याचा पिंजरा


नुपूर तुझा डान्स परफॉर्मन्स ठेवू शकतो
एक दोन प्रतिभागीअजून आहेत!
नक्कीच, नूपुर ला खूप आनंद झाला.वार्षिक कार्यक्रमात नूपुर ने एकल नृत्य प्रस्तुत केले.

नृत्य संपतात पूर्ण हॉलमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला व ‘वन्स मोर वन्स मोर ‘असे आवाज येऊ लागले.
नूपुर घरी आली ती बक्षीस घेऊनच.
ती आता एक चांगली नृत्यांगना म्हणून कॉलेजमध्ये प्रसिद्ध झाली..

इंटर कॉलेज स्पर्धेतही नुपूरला त्यांच्या कॉलेजतर्फे पाठवण्यात आले. या स्पर्धेत तीन वेगवेगळ्या पद्धतीचे नृत्य पेश करायचे होते.
ही स्पर्धा प्रसिद्ध सोने चांदीचे व्यापारी पेडणेकर ज्वेलर्स तर्फे स्पॉन्सर होती.
पहिल्या स्पर्धेत क्लासिकल ,दुसऱ्यात लोकनृत्य तर तिसऱ्यात वेस्टर्न नृत्य करायचे होते .

नुपूरला आता खूप तयारी करायची होती क्लासिकल ती सहजपणे करत असे पण वेस्टर्न ?? ते मात्र तिला शिकावे लागले.

स्पर्धेचा दिवस उगवला बरेच स्पर्धक आपली प्रस्तुती देत गेले त्यातून काही गळाले तर काही पुढे आले त्यात नुपूर ही होती ती पण पुढे आली फायनलचा दिवस उगवला….

पहिल्या आणि दुसऱ्या राउंडला क्लासिकल आणि लोक नृत्य प्रस्तुत करून नुपूर पुढे आली आता खरी परीक्षा होती..

वेस्टर्न डान्स साठी नुपूर ने उंच टाचेचे सॅंडल घातले जीन्स आणि वरती टॉप कानामध्ये मोठाले इयरिंग केसांचा बो, डोळ्यांनाआयशेडो,
नूपुर ने इथे ही कमाल केली....


परीक्षकांच्या टीम सोबत माननीय अध्यक्ष पेडणेकर बसले होते, तर हाॅल मधल्या खुर्च्यांवर सन्माननीय सदस्यांमध्ये त्यांची बायको व नातू निनाद होता.

वेस्टन म्युझिकवाजू लागले पडदा सरकला, नूपुर ने आपले हावभाव बदलत खूप उत्तेजक असे वेस्टर्न नृत्य प्रस्तुत केले.
सर्व प्रेक्षक मंत्रमुग्ध होऊन पाहत होते ते संपल्यानंतर बराच वेळ टाळ्या वाजत होत्या त्या नुपूर चे नाव स्पर्धा जिंकल्याचे जाहीर झाल्यावरच थांबल्या…

घरी पोहोचल्यावर सीमाने व काकूंनी तिची दृष्ट काढली.
दोन दिवस नूपुर घरातून बाहेर निघाली नव्हती या स्पर्धेने तिला खूप थकवून टाकले होते.

दोन दिवसांनी राकेश नूपुर चे बाबा घरी आले तो आनंदाची बातमी घेऊन. पेडणेकर यांनी आपल्या नूपुर ला मागणी घातली आहे. त्यांच्या नातवासाठी.
सीमा लाआश्चर्य वाटलं श्रीमंत घरंदाज लोक कसं काय जमणार ?
अगं श्रीमंत असले तरी साधे आहेत. राकेश म्हणाले, आपल्या घरी मागणी घालायला येणार आहे.


—-------------------------+++

क्रमशः-------------------------------------------