सोन्याच्या साखळीत गुंतलेलं आयुष्य. भाग - ४
पावसाळ्याचे दिवस होते आणि रात्रीची वेळ होती. वीजा कडाडत होत्या, पण सानिकाच्या मनातल्या वादळाला त्या ही मागं टाकतील इतकं सगळं डोईजड झालं होतं.
त्या दिवशी सानिकाच्या सासरच्या घरात मोठं भांडण झालं होतं. कारण होतं दिपकला नवीन ऑफिससाठी लागणारे ५ लाख रुपये.
सानिकाने स्पष्ट सांगितलं, "बाबांना हृदयविकाराचा त्रास आहे. ते इतके पैसे उभे करू शकणार नाहीत. त्यामुळे प्लीज, तेवढी तरी दया दाखवा." तिच्या बोलण्यावर दिपकचा विकृत स्वभाव जागा झाला.
सानिकाने स्पष्ट सांगितलं, "बाबांना हृदयविकाराचा त्रास आहे. ते इतके पैसे उभे करू शकणार नाहीत. त्यामुळे प्लीज, तेवढी तरी दया दाखवा." तिच्या बोलण्यावर दिपकचा विकृत स्वभाव जागा झाला.
"जर पैसे नाही दिलेस, तर इथे तुझं काहीही टिकणार नाही! न घर, न नातं, न स्वतःचं अस्तित्व, तुला या घरातून निघून जावं लागेल, तेही कायमचं, परत तुझं तोंड सुद्धा आम्हाला दाखवायचं नाही!" दिपक ओरडून बोलला.
सासूबाई दरवाज्यात उभ्या राहून सानिकाच्या शिक्षणाचा उद्धार करत होत्या
"काय उपयोग आहे गं तुझ्या शिक्षणाचा, जर तू सासरचं घर चालवू शकत नाहीस, तर... त्यापेक्षा अडाणी असती तर बरं झालं असतं, आम्ही ना आता मुलाला हुंडा न घेता लग्न केलं आणि तुला सून म्हणून या घरात आणले ह्याची शिक्षा भोगतो आहोत." सासूबाई म्हणाल्या.
"माझ्या शिक्षणाचा उपयोग नाही, असं म्हणू नका... मला जर तुम्ही घराबाहेर पडू दिलं असतं तर मीही चार पैसे कमावले असते, हे असं माझ्या बाबांकडे पैसे मागण्यापेक्षा मेहनतीने कमावले असते. पण तुम्हाला ते चालत नाही." सानिकाने उत्तर दिले. पण त्याचवेळी दिपकने तिच्या अंगावर हात उचलला आणि तिला मारलं.
त्या दिवसापासून सानिकाला मारहाण होऊ लागली आणि तिचा खुपच छळ चालू झाला. पण लोक नावं ठेवतील म्हणून सानिका माहेरी जात नव्हती.
एक दिवस तर दिपकने कहरच केला, तिला जेवायलाच दिले नाही. वरतून तिच्या हाता पायांना इस्त्रीचे चटके दिले. सानिकाला आता ते सगळं असह्य होत होते. वेदनांनी तिचं शरीर आणि मन दोन्ही पिळवटून निघत होते. त्या रात्री सानिकाने तिची जुनी डायरी बाहेर काढली. डोळ्यांतून अश्रूचे थेंब ओघळत होते. तरीही तिने त्या डायरीत शेवटची नोंद लिहिली.
"आई, बाबा… मी खुप प्रयत्न केला. खरंच खुप प्रयत्न केला. पण इथल्या चार भिंतींमध्ये माझं श्वास घेणं थांबलं आहे. माझ्या मृत्यूला कोणाला जबाबदार धरू हेच कळत नाही, पण तरीही मला माफ करा…" तुमचीच सानू.
दुसऱ्या दिवशी सकाळी बाथरूमचं दार बराच वेळ बंद होतं. त्यानंतरचा क्षण मात्र अंगावर काटा आणणारा होता.
सानिकाने गळफास लावून आत्महत्या केली होती. तिच्या आत्महत्येची बातमी गावभर पसरली आणि त्या घटनेने गाव हादरून गेला. गणपत आणि यशोदाच्या कानावर ही बातमी पडताच ते धावत आले. आणि हमसून हमसून रडू लागले.
"माझ्या सानूला हुंडा दिला नाही त्याची एवढी मोठी शिक्षा मिळेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं." गणपत रडता रडताच म्हणाले. आज त्यांना त्यांच्या मुलीला लग्न करून या घरात पाठवल्याचा खुप पश्चात्ताप होत होता. पण वेळ निघून गेली होती त्यामुळे त्याचाही काहीच उपयोग नव्हता. सानिकाला नाईलाजाने तिचा जीव गमवावा लागला होता.
पोलिसांनी प्राथमिक चौकशी सुरू केली. सानिकाची डायरी मोबाईल मधले मॅसेज आणि गावकऱ्यांची साक्ष. यामुळे सगळं हळूहळू बाहेर येऊ लागलं.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा