Login

सूड (भाग:-४)

सूडाच्या भावनेने केलेले कर्म त्याच्यावरच उलटते हे सांगणारी कथा
शीर्षक:- सूड

भाग:-४

"तू हिंमत नको हारूस, बेटा. देवाने तुला गुरूजींशी भेट करून दिले म्हटलं तर त्यावरती ते नक्कीच उपाय काढून तुझ्या संकटाचे निवारण करतील. कोणालाही काहीही होणार नाही, विश्वास ठेव देवावर." करूणा त्याला धीर देत म्हणाली.

पूर्ण दिवस झोपलेली ओवी उठलीच नाही. तिने कोणतीही हालचाल केली नाही. तिच्या डोळ्याखाली काळी वर्तुळे वाढू लागली.
जसं जशी रात्र होण्याची वेळ जवळ येऊ लागली तसं तसे मानवला भीती दाटून चिंता वाटू लागली.

संध्याकाळ झाली सूर्य अस्ताला गेला आणि इकडे मानवची धडधड वेगाने वाढू लागली.

अंधार पडताच जशी ओवीला जाग आली तसे तिच्या चेहऱ्यावर भयानक हसू तरुळे लागले. ती अचानक मोठं मोठ्याने हसू लागली.

" शेवटचं हिला पाहून घ्या यानंतर ही  तुम्हाला कधीच दिसणार नाही. हिची आजची शेवटची रात्र असेल. म्हणून मन भरून आजच पाहून घ्या. यानंतर हिला मी माझ्यासोबत घेऊन जाणार कायमच. हिला आता कोणी वाचू शकणार नाही. ही माझी आहे म्हणून घेऊन जातो हिला. त्यापासून मला कोणीही रोखू शकणार नाही. आहा ऽ ऽ आहा ऽ ऽ " ओवी मधला आत्मा ओरडून ओरडून सांगत मोठ्याने क्रूरपणे हसत म्हणाला.

सर्वजण एकमेकांना धीर देत आत्म्याशी सामना करण्यास तयार होते. सर्वांनी मिळून गंगाजलाचा सगळीकडे शिडकाव केला. करूणाने पुन्हा एकदा शालकी धूप जाळले आणि त्याचा धूर सगळीकडे पसरवला.  त्यामुळे आत्मा अजून आक्रमण झाली.

ओवीच्या अंगातील आत्मा बेकाबू होऊन स्वतःला सोडून घेतले आणि टेबलवरचा चाकूने ओवीकडून तिच्या अंगावर घाव करू लागले.

मानव पाठीमागून ओवीच्या हाताला जोरदार धक्का मारला. त्यामुळे चाकू तिच्या हातातून खाली पडला. त्यामुळे ओवीचे लक्ष विचलित झाले. त्याचा फायदा घेत मानवने रुद्राक्ष मणी असलेला धागा तिच्या गळ्यात घातला.

रुद्राक्ष गळ्यात पडतात ओवी शांत झाली. मात्र तिचे शरीर झटपट करू लागले.

मानव आणि क्रिशने ओवीला दाबून धरले.

ओवी जोर‌ जोरात किंचाळत म्हणाली,"मला सोडा नाही तर हिला चिरून टाकीन."

सगळ्यांनी मिळून ताकदीनिशी तिला ओढत आणून गाडीत बसवले. क्रिशने पटकन गाडी चालू केली, गाडी पूर्णपणे लॉक करून टाकले जेणेकरून ओवी चालत्या गाडीतून बाहेर पडणार नाही. गाडी आता वेगाने गुरुजी असलेल्या ठिकाणी निघाली.

गाडीत बसल्यावरही ओवी जोर जोरात ओरडत होती. मानव आणि करुणाने तिला दाबून धरले होते तेव्हा ती म्हणाली," 
तुम्हाला वाटतं का‌‌ की तुम्ही हिला वाचवू शकाल.‌ तर विसरून जा. तसं काहीही होणार नाही. तिथे गेल्यानंतर दाखवून देईन मी काय चीज आहे ते?"

"खबरदार ! एक शब्दही बोलली तर. माझ्या सुनेला मी काही होऊ देणार नाही. ओम नमः शिवाय ! ओम नमः शिवाय !" करुणा आणि मानव 'ओम नमः शिवाय' मंत्रोच्चाराचा पुन्हा जोमाने जाप करू लागले. त्यामुळे ओवीच्या कानातून रक्त येऊ लागले. ती जोरात किंचाळू लागली. किंचाळ्याने कानटाळ्या बसत होत्या तरी त्यांनी हिम्मत हरली नाही. मंत्रोच्चार जोराने करू लागले.

अर्ध्या तासानंतर ते त्या मंदिरात पोहोचले. गुरुजी तिथेच सभामंडपात यज्ञकुंडात हवन करत होते. ओवीला ओढत आणत त्या सर्वांनी यज्ञकुंडाजवळ बसवले.

ओवी गुरुजींकडे रागाने रोखून पाहत
धुसफूसत म्हणाली," तुला काय वाटतं रे गुरूजी, तू मला वश करशील. अरे हट् ! तू माझं काहीच वाकड करू शकणार नाहीस. जर तू माझ्या मधात आलास तर याद राख तू ही विनाकारण नाहक मारला असशील."

तिला काहीच उत्तर न देता गुरुजींनी डोळे बंद केले. जवळच्या कलशातील पवित्र पाणी घेऊन मंत्र म्हणून तिच्या अंगावर शिंपडले. त्यामुळे ती वेदनेने कळवळू‌न मोठ्याने ओरडू लागली. तिला भयानक वेदना होऊ लागल्या. तिचे शरीर आतून जळत असल्यासारखे तिला वाटू लागले.‌

गुरुजी शांतपणे पण आवाजात जरब आणत म्हणाले," तू एक मलीन आत्मा आहेस. तू एक शरीर कमवू शकतेस पण ईश्वरचरणी तुझे काहीही चालणार नाही. त्या शक्तीसमोर तुला झुकावंच लागेल. वाईट शक्ती कितीही शक्तिशाली असले तरी देवासमोर त्याला झुकावं लागतेच. आज रात्री तुला‌ या मुलीचे शरीर सोडावच लागेल."

"नाही, कधीच नाही. मी जर हे शरीर सोडलं तर तिच्या आत्म्यासोबत तिलाही घेऊन जाईल." ओवीतील आत्मा जाण्यास नकार देत म्हणाला.

गुरुजींनी त्यांच्या कमंडलू मधून पाणी घेतले आणि ते पुन्हा अभिमंत्रित करून तिच्या अंगावरती टाकले.

गुरुजींनी यज्ञ कुंडाजवळ ठेवलेली छडी उचलली. त्या छडीला आधी गरम केले आणि ती छडी घेऊन ते ओवीच्या जवळ गेले.

"चल लवकर बाहेर निघ. नाहीतर तुझ्या आत्म्याला इतका त्रास देईन कि‌ तू थरथर कापशील." गुरुजी त्याला दम देत म्हणाले.

" अरे जा‌ ! मी कोणालाही घाबरत नाही. तू माझं काहीच वाकड करू शकत नाहीस." आत्माही हार मानण्यास तयार नव्हती.

त्याची ही गोष्ट ऐकून गुरुजींनी छडी जमिनीवर जोरात आदळली. त्यासरशी  ओवीच्या शरीराला वेदना होऊ थरथर कापले. मोठ मोठ्याने आरडून ओवी त्यांच्यावर धावू‌न गेली. गुरुजींनी पुन्हा पुन्हा विचारत छडी जमिनीवर आदळली. छडीच्या प्रत्येक प्रहाराचे त्या आत्म्याला खूपच वेदना होऊ लागली. त्यामुळे ओवीचे  शरीर कमजोर होऊ लागले.

गुरुजींनी मानव आणि क्रिशला इशारा केला. तसे त्या दोघांनीही त्यांचा इशारा समजून ओवीला धरून यज्ञकुंडाजवळ बसवले. तिथे जवळ ठेवलेल्या पुजेच्या ताटातील विभूती घेऊन मंत्र म्हणत तिच्या माथ्यावर लावले. विभूतीच्या स्पर्शाने आत्मा अजून जोरात किंचाळू लागली.

"माहिती आहे मला की तुला खूप त्रास होत आहे. तुला हा त्रास सहन करायचं नसेल तर सांग पटकन कोण आहेस तू? का तू या मुलीला त्रास देत आहेस?" गुरुजींनी आत्म्याला दरडावून विचारले.

"नाही सांगणार, कधीच नाही सांगणार. मी हिला बरबाद करायला आलेला आहे. मी जर सांगितलं तर तू हिला वाचवशील आणि ते मी कधीच होऊ देणार नाही. तुला मला जितका त्रास द्यायचा तितका दे ; पण मी तुला काहीच सांगणार नाही." ती आत्माही जिद्द करत म्हणाली.

"तू असं सरळ सांगून ऐकणार नाहीस ना. बघ मी आता काय करतो?" गुरुजी शांतपणे म्हणाले.

गुरुजींनी मंत्रोच्चार करायला सुरुवात केली. त्याचबरोबर ते यज्ञकुंडामध्ये समिधा टाकत गेले.

समीधा टाकल्याने ज्यावेळेस मोठ्याने ज्वाला पेटत होते त्याच वेळेस इकडे ओवीच्या अंगातील आत्मा देखील मोठ्या मोठ्याने चिरकत होता.

क्रमशः

गुरुजी ओवीच्या शरीरातून आत्म्याला बाहेर काढतील का? कोणाची आत्मा असेल ती? तिच्यासोबत असे कोणी केले असेल? जाणून घेण्यासाठी वाचा पुढील भाग..

जयश्री शिंदे

प्रस्तुत कथा पूर्णतः काल्पनिक आहे. अंधश्रद्धा पसरवणे हा हेतू नसून निव्वळ मनोरंजन म्हणून ही कथा वाचावी.


0

🎭 Series Post

View all