Login

दुःख चिमण्यांचे

Sorrow Of Sparrows Due To Us
चिमण्या चिमण्या
इवल्या इवल्या
अंगणात माझ्या
झाल्या गोळा
फेर धरुनी
नाचू लागल्या,
गाऊ लागल्या

अंगणी माझ्या
दाणे टिपती
पाणी पिती
एकमेकींना सांगती
गंमती जमती

हळूच आली
माझ्यापाशी
एक चिमणी
धीटुकलीशी
रडत, रडत
मला म्हणाली
आमची वस्ती
इतकी कमी
कशी झाली?