"काय म्हणायचे?? काय बाई आहे ही??" पहिली बाई
"हो ना.. मी तर हिला चांगली समजत होते.. पण कुठलं काय?? आता तर चांगुलपणाचा जमानाच राहिला नाही.." दुसरी.
"किती तयार होऊन ती ऑफिसला जाते?? अगदी नटूनथटून.." तिसरी
"काय बाई आहे?? प्रत्येक वेळी वेगवेगळ्या पुरुषाबरोबर येते.." असे एक नाही अनेक शब्द तिच्या कानावर येतात.. पण ती गप्प बसते काही एक अक्षर बोलत नाही.. पण आज तिची मुलगी प्रिया बाहेर येते आणि तिला या बायकांचे आवाज कानावर पडतात. तिला खूप राग येतो आणि ती त्या बायकांच्या गराड्यात जाऊन म्हणते,
"तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे माझ्या आईचा तेच कळत नाही. ती बाई इतकी वर्ष आमचं सांभाळ एकटी करते.. अगदी व्यवस्थित.. नीटनेटकी राहते.. कधी इकडची बातमी तिकडे करत नाही तुमच्यासारखं.. ठीक आहे ना एखाद्या वेळेस ऑफिसमधून यायला उशीर झाला तर एखाद्या ऑफिसमधील कलिगने तिला ड्रॉप केलं तर बिघडलं कुठे? तुमच्या मुली बाहेर कुठे कुठे दिवे लावतात हे माहिती आहे का तुम्हाला?
आणि तिची प्रगती बघून तुम्ही खुश व्हायला पाहिजे तर तुम्ही उलट तिलाच नाव ठेवता? तिने इतक्या वर्षात आम्हाला कसं सांभाळलं? आमचं पालनपोषण कसं केलं? हे आमच आम्हालाच माहित. तेव्हा तुम्ही आला होता का आमच्या मदतीला? ती स्वतःच्या पायावर उभी राहिली आणि आता जरा चांगले दिवस आले तर लागल्या बोलायला काय वाटेल ते? असं परत संशयाने माझ्या आईबद्दल बोललात तर याद राखा गाठ माझ्याशी आहे. चल ग आई.." असे म्हणून दोघेजण आत जातात..
आत गेल्यावर प्रिया सुमनला तिच्या खोलीत नेते.. आणि तिला बसवते..
"आई.. तू फ्रेश होऊन ये.. आम्ही बाहेर आहेत.." असे म्हणून प्रिया बाहेर गेली.. आणि सुमन फ्रेश व्हायला गेली..
"काय दी.. काय झालं??" सेजल प्रियाला वैतागलेले बघून म्हणाली
"आईला पण कसं समजतं नाही ग?? उगीच चर्चेला वाव.." प्रिया
"अगं काय झालं सांगशील का??" सेजल
"आज ती त्या मोहन काकासोबत आली.." प्रिया
"काय???" सेजल
"हो ना.. आणि बाहेर चर्चेला अगदी उधान आल होत.." प्रिया
"त्या बायकांना तर काहीच कामं नाहीत.. उगाच कुटाळ्या काढत बसतात.." सेजल
"त्यांचं काय तेच काम ग?? पण आईला समजायला नको काय?? उगीच त्या मोहन काकासोबत येते.. रिक्षाने यायचं ना.." प्रिया
"हो ग.. आणि तो कोण लागून गेला?? तिला सोडणारा.. आज बाबा असते तर अस चाललं असतं का??" सेजल
"बघ ना.. कस सांगायच तिला??" प्रिया
"आपण बोलूयात काय??" सेजल
"नको ग..पुढे बघू.." प्रिया
लेकींच हे बोलणं सुमनच्या कानावर पडत.. आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकली.. खरंच चुकलं का माझ?? असे तिला वाटू लागले.. मी मुलींना हव ते स्वतंत्र्य दिल.. त्यांना हवे तसे वागण्याची मुभा दिली.. आजच्या जमान्यात जसे वागतात तसे वागायची परवानगी दिली.. हेच चुकलं का माझं??
न्यू जनरेशनचा जमाना आहे.. या जमान्यात माझ्या मुलींना एक मुलगा मुलगी मित्र असू शकतात.. त्यांच्यात मैत्री होऊ शकते.. त्यासाठी इतर कोणत्याही नात्यात गुंफायची गरज नाही.. जसे की मानलेला भाऊ किंवा प्रियकर.. याची वेळोवेळी शिकवण दिली.. पण त्यांची विचारसरणी इतक्या खालच्या पातळीची असेल असे वाटले नव्हते..
सुमनला खूप वाईट वाटले.. ती तिच्या खोलीत जाऊन खूप रडली.. रडून थोडं हलकं झाल्यावर ती शांत बसली.. मग तिला तिचा भूतकाळ आठवू लागला..
सुमन काॅलेजला असताना अगदी साधी, सुंदर सिम्पल होती.. याचमुळे कदाचित सागर तिच्यावर भाळला होता.. काॅलेजच्या अगदी पहिल्या दिवसापासूनच त्याला ती आवडू लागली होती.. पण तिच्याशी बोलण्याची त्याची हिम्मत होत नव्हती.. रोज अगदी लवकरच तो काॅलेजला येत होता.. आणि गेटपाशी थांबून तिची वाटत बघत होता..
रोज तो फक्त तिला बघतच होता.. तेही अगदी लपून छपूनच.. ही लपाछपी बरेच दिवस चालू होती.. आता काॅलेजच शेवटचं वर्ष सुरू झालं.. सागरच्या मनाची घालमेल सुरु झाली.. यावर्षी तिला मनातलं बोलायलाच हवे.. नाहीतर सगळं व्यर्थ.. असे त्याला वाटू लागले..
मग आता काय करावे?? या विचारात असतानाच त्याला आठवले.. की सुमनची मैत्रीण त्याची चांगली मैत्रीण आहे.. पहिल्यांदा तिला हाताशी धरून काहीतरी होतंय का ते बघू.. आता छान कल्पना सुचली म्हटल्यावर सागर खूप खूश होतो..
सागर सकाळी लवकरच काॅलेजला गेला.. आणि नेहमीप्रमाणे गेटपाशी सुमनची वाट बघत थांबला.. थोड्या वेळाने सुमन आणि तिची मैत्रीण जी सागरच्या ओळखीची असते ती मेघना दोघी आल्या.. सुमनला बघून सागरला काय बोलायचे ते विसरूनच गेला..
त्या दोघी आत जाऊ लागल्या आणि एकदमच सागरने हाक मारली.. "मेघना.."
"अरे सागर बोल ना.." मेघना
"मला काही नोट्स हवे होते.." सागर सुमनकडे बघत म्हणाला.. तेव्हाच सुमनही त्याच्याकडे बघितली.. दोघांची नजरानजर झाली.. आणि 'दिलं मे कुछ कुछ हुवा..' अस काहीसं झालं.. सुमनला तर काहीच कळेना.. त्याच्याकडे ती थोडी आकर्षित झाली..
"हो देईन की.. कोणत्या विषयाचे हवे होते.." मेघना
"बघून सांगतो.." सागर म्हणाला
"बरं.." म्हणून दोघी तिथून जातात.. पण सुमन तिच हृदय तिथेच ठेवून जाते.. सागरला पाहिल्यापासून तिचं मन स्थिर नव्हतंच.. तिला फक्त तोच दिसत होता..
"याआधी मला कधी असे झाले नाही??.. मग आताच का होतं आहे??.. त्याला जेव्हापासून बघितले तेव्हापासून कसंतरीच होत आहे.. असे का होत असेल??.. मी त्याच्याकडे ओढली जात आहे.. पण का??" असा ती मनात विचार करत होती..
तिने वर्गात सहज पाठीमागे पाहिले तर तिला सागर दिसला.. तिला धस्स झालं.. ती लगेच मेघनाला म्हणाली.. "अगं तो तुझा मित्र आपल्या वर्गात आहे का??"
"कोण ग??" मेघना
"तो गेटवर भेटला होता तो.." सुमन
"सागर.. अगं हो.. तो आपल्याच वर्गात आहे.." मेघना असे म्हणताच सुमनला जोरात ठसका लागला..
क्रमशः
आवडल्यास कमेंट आणि लाईक करायला विसरू नका..
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा