आपण मागील भागात पाहिले की सुमनला तिच्या सोसायटीमधल्या बायका काहीबाही बोलल्या.. तिची मुलगी प्रिया त्या बायकांना गप्प करून आईला आत नेते.. नंतर ती आणि तिची बहिण सेजल आईविषयी काहीही बोलताना सुमन ऐकते.. तिला खूप वाईट वाटते.. ती तिच्या खोलीत जाऊन खूप रडली.. मग तिला तिचा भूतकाळ आठवू लागला.. आता पुढे..
सुमनने जेव्हा पासून सागरला पाहिली होती.. तेव्हा पासून ती थोडी सावधच झाली.. तिला अवघडल्यासारख वाटतं होत.. तो बघतोय का?? हे पहावं असे वाटत होते.. पण आपण मागे बघितले तर त्याला संशय येणार म्हणून ती तशीच बसून राहिली.. काॅलेज सुटल्यावर क्षणाचाही विलंब न करता लगेच घरी गेली..
घरी गेल्यावरही तिचं मन स्थिर नव्हतंच.. सागरने काय जादू केली होती काय माहित?? तिला फक्त त्याचाच चेहरा दिसत होता.. "कोण होता तो?? सारखा माझ्याकडेच का बघत होता.. आणि कधीपासून बघतोय काय माहित?? मी पण कशी ना?? कुठे लक्षच देत नाही.. कोण आहे कोण नाही?? अगदी वेंधळी आहे.. पण खरंच तो माझ्याकडे बघत असेल तर.. मी त्याला आवडत असेन तर.. नको नको.. उगाच भलतच होऊन बसायचं.." असा रात्रभर विचार तिच्या मनात घोळत राहिला..
दुसरा दिवस उजाडला.. दोघांनाही एकमेकांची ओढ लागलीच होती.. सागर नेहमीपेक्षा लवकरच कॉलेजपाशी आला.. नेहमीप्रमाणे तो गेटपाशी सुमनची वाट बघत उभा राहिला..
थोड्या वेळाने सुमन आली.. दोघांची नजरानजर झाली.. आणि सुमनने त्याला एक हलकिसी स्माईल दिली.. झालं.. त्या स्माईलमुळे सागर आणखीनच घायाळ झाला.. आता फक्त बेशुद्ध पडायचा बाकी होता.. तो तिच्या पाठोपाठ वर्गात जाऊन बसला.. त्याची नजर फक्त सुमन वर होती.. आणि हे लगेच सुमनाला जाणवलं..
याआधी तिने इतके लक्षच दिले नाही.. पण यावेळी तिने त्याच्याकडे लक्ष दिले.. तो अगदी जाणून भुजून तिला दाखवायची की मी तुला पाहतोय.. तू मला आवडतेस.. पण त्याच्या तोंडातून एक शब्दही निघायचा नाही..
"अरे सागर.. जरा तुझी वही दे रे.." मित्र
सागरचे मुळीच लक्ष नव्हते.. मित्राने दोन-तीन वेळा हाक मारली.. तर तो त्याच्या तंद्रीतच होता.. मग तो मित्र त्याला हलवू लागला.. तेव्हा कुठे त्याचं लक्ष गेले..
"काय रे परशा काय झालं??" सागर
"अरे, कधीचा बोलवतोय लेका.. कुठं लक्ष आहे तुझं.." परशा म्हणजे प्रशांत..
"आहे की इथेच.. बोल.." सागर
"अच्छा या फुलाकडे होय.. " प्रशांत
"तोंड सांभाळून बोल.." सागर
"तेच तर करतोय.. सुमन म्हटलं तरी तुला राग येणार.. बर आता वहिनीच म्हणतो.." प्रशांत
"ये बात." म्हणून दोघे एकमेकांना टाळी देतात..
"ए सागर.. असं मनात ठेवून चालत नसतंय रे भावा.. बोलून टाक बघू मनातलं.." प्रशांत
"होय रे.. पण ती हो म्हणायला पाहिजे ना.." सागर म्हणाला..
"मग काय नुसता बघून काय करणार??.." प्रशांत
"अरे आधी मैत्री करायची.. मग विचाराचं.." सागर
"धन्य आहेस रे बाबा तू.." प्रशांत
त्यादिवशी दोघेही सुमन आणि सागर एकमेकांच्याकडे चोरून बघत होते.. सुमन खूप लाजत होती.. जणू तिला ते त्याच बघण आवडत होतं.. हे तिला सांगायचे होते..
आता किती दिवस असे बघायचे?? बोलायला तर हवे ना.. असा विचार सागरच्या मनात येऊ लागला.. मग त्याने मेघनाची मदत घ्यायचं ठरवलं.. तो रोज मेघनासोबत बोलू लागला.. गप्पा मारू लागला.. वही नोट्सचे देवाणघेवाण करू लागला.. पण सुमनपर्यंत तो अजून गेलाच नाही..
अखेर तो दिवस उजाडला.. सागरला अर्थशास्त्र या विषयाचे काही नोट्स हवे होते.. मग तो नेहमीप्रमाणे मेघनाकडे नोट्स मागायला गेला.. "अरे सागर.. माझ्याकडे नाहीत रे त्या नोट्स साॅरी.." मेघना
"अगं मग आणखी कुणाकडे आहेत का ते बघून दे ना.." सागर
"बरं विचारते.." म्हणून ती सुमनला विचारते मग सुमन लगेच वही देते.. तेव्हा दोघेही एकमेकांशी प्रत्यक्ष बोलतात..
सुमनची वही मिळाली म्हणून सागर खूप खूश होतो.. तो फक्त ती वही जवळ घेऊन बसतो.. त्याला न्याहाळत बसतो.. त्या वहीचा वास घेतो.. अगदी वेड्यासारखे वागत असतो.. त्याला जणू तिचं मिळाल्यासारखं वाटत होते.. तो रात्रभर वही जवळ घेऊनच झोपला..
नोट्स पूर्ण झाल्यावर त्याने सुमनला तिची वही परत केली..
"थॅन्क्यू.." सागर वही देत म्हणाला
सुमनने फक्त एक स्माईल केली..
"तुझं अक्षर खूप सुंदर आहे.. अगदी तुझ्यासारखच.." सागर नकळत बोलून गेला..
"काय म्हणालास??" सुमन माहिती होत तिला पण परत ती मुद्दामच विचारते..
"अक्षर छान आहे म्हणालो..." सागर जीभ चावतच म्हणाला.. सुमन परत गालात हसत "थॅन्क्यू.." म्हणाली
हळूहळू ते एकमेकांसोबत बोलू लागले.. ते दोघेही आता बोलताना घाबरत नव्हते.. एकमेकांशी छान बोलत होते.. ते एकमेकांचे खूप चांगले मित्र बनले होते.. त्यांचा छानसा एक ग्रुप तयार झाला होता.. मेघना, प्रशांत, सागर आणि सुमन.. चौकोणी ग्रुप..
कोठेही जाताना ते एकत्रच जात.. कॉलेजमध्ये पण कायम एकत्र राहत होते.. खूप गप्पा, चर्चा आणि अभ्यास सगळं काही एकत्रच असायचं.. त्यांना एकमेकाची खूप सवयच झाली होती.. काहीही करायच असेल तरी चौघे मिळूनच करणार..
एक दिवस चौघे जण बाहेर भेटायच ठरवले.. कॉलेज अभ्यास याव्यतिरिक्त गप्पा मारायला.. मजा मस्ती करायच ठरवतात.. मग त्यासाठी एक जागा आणि वेळ दिवस ठरवतात.. तो दिवस कॉलेजच्या वेळेव्यतिरिक्त सुट्टीचाच ठरवतात.. म्हणजे निवांत बोलता येईल..
अखेर तो दिवस उगवला.. रविवारचा दिवस वेळ संध्याकाळी चार वाजता.. सगळे एकत्र एका बागेत जमा होणार होते.. सागर नेहमीप्रमाणे वेळेच्या आधी जाऊन पोहोचला..
थोड्या वेळाने सुमन पण आली.. तिला पाहून सागरला खुप आनंद झाला.. थोडा वेळ दोघेही बाहेर मेघना आणि प्रशांतची वाट पाहत थांबले.. बराच वेळ झाला तरी ते दोघे आले नाहीत..
"चल आत जाऊन बसू.." सागर थोड्या वेळाने म्हणाला
"नको.. अजून थोडा वेळ वाट बघू की.." सुमन
"माझे पाय खूप दुखत आहेत इथे उभा राहून.." सागर
"बरं चल.." म्हणून दोघेही बागेत जातात.. तिथे एका बाकड्यावर दोघेही बसतात.. सुमन थोडी अवघडली होती.. तिला काय बोलावे काहीच समजत नव्हते?? त्यात ती एका मुलासोबत होती.. कोणी बघितले तर काय म्हणतील? अशी भीती वाटत होती.. त्यामुळे ती लवकर सागरसोबत बोलत नव्हती..
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा