आपण मागील भागात पाहिले की सुमन आणि सागर एकमेकांना बघता बघता त्यांच्यात छान मैत्री होते.. त्यांचा एक चौकोनी ग्रुप तयार होतो.. ते खूप गप्पा गोष्टी, अभ्यास सगळं काही एकत्र करतात.. एक दिवस ते सगळे बाहेर भेटायचं ठरवतात.. ते एका बागेत भेटतात.. पण प्रशांत आणि मेघना लवकर येत नाहीत.. आता पुढे..
सागर आज खूप खूश होता.. तो आणि सुमन पहिल्यांदाच बाहेर भेटले होते.. बागेत जास्त गर्दीदेखील नव्हती.. काही मुले खेळत होती.. आजच त्याला मनातलं सांगावसं वाटत होत.. पण तिचा अवघडलेपणा बघून तो शांत झाला..
"रिलॅक्स हो.. इतकी का अवघडली आहेस??" सागर
"काही नाही रे.. अजून ते दोघे आले नाहीत ना म्हणून.." सुमन
"येतील ग.. तू बस बघू निवांत.." सागर
"हं.. बोल.." सुमन
"काय??" सागर
"काय बोलत होतास ना??" सुमन
"इतकी अवघडून बसू नको म्हणालो.." सागर
"अरे ते पहिल्यांदाच एका मुलासोबत बाहेर आले आहे ना.. म्हणून असेल.." सुमन
"मी पण.." सागर
"बहुतेक ते दोघे येणार नाहीत.. आपण जाऊया काय??" सुमन
"येतील ग.. थांब थोडा वेळ.. मी भेळ घेऊन येतो तोपर्यंत.." सागर
सुमन नको म्हणत असतानाही सागर भेळ घेऊन येतो.. दोघे भेळ खात गप्पा मारू लागले.. आता सुमन थोडी रिलॅक्स झाली.. ती सागर सोबत भरभरून बोलत होती.. ते दोघे बागेत जाऊन एक तास झाला.. तरी मेघना आणि प्रशांत आले नाहीत.. म्हणून ते परत घरी जायचं ठरवतात..
"आपण परत येऊया काय दोघेच??" सागर
दोघेजणच नको.. ग्रुपने आलो तर बरं पडेल.. घरचे कुणी बघितले तर काही खर नाही.." सुमन
"बर चालेल.. आज मला खूप छान वाटलं.." सागर
"मला पण.." सुमन मग दोघेही आपापल्या घरी जातात..
दुसरा दिवस उजाडतो.. सगळे नेहमीप्रमाणे काॅलेजला जातात.. सागर प्रशांतला बघितल्याबरोबर त्याच्याशी भांडायला जातो.. काल का आला नाहीस याबद्दल जाब विचारतो..
"मला सांग.. काल तुला मज्जा आली की नाही.." प्रशांत
"मस्त वाटलं रे काल.. पण तू विषय बदलू नकोस.." सागर
"नाही.. विषय बदलत नाही.. तेच तर सांगतोय मी.." प्रशांत
"म्हणजे??" सागर
"अरे तुमच्या दोघांना एकांत मिळावा..म्हणून आम्ही मुद्दाम आलो नाही.." प्रशांत
"काय???" सागर
"हो.. मीच तर मेघनाला जायला नको म्हणून सांगितल.." प्रशांत
"अरे.. दोस्त हो तो ऐसा.." असे म्हणत सागर प्रशांतला मिठी मारतो..
अशाप्रकारे त्या सगळ्यांची मैत्री खुलत जाते.. ते एका टप्प्यावर येऊन थांबतात की जिथून त्यांना कोणी वेगळे करू शकणार नाही.. दिवसेंदिवस ते एकमेकांत गुंतत चालले होते..
सागर आता सुमनला मनातलं सांगायचं कधी याचा विचार करत होता.. मग तो जाॅब लागल्यावर तिला सांगायचं आणि त्यानंतर तिच्या घरी जाऊन तिला मागणी घालायची असे ठरवतो..
त्यानंतर सागर नोकरीच्या शोधात जातो.. आणि लवकरच त्याला एक छान अशी नोकरी मिळते.. तेव्हा सागरला खूप आनंद होतो.. तो त्याच्या मनातलं सुमनला सांगणार होता.. तेवढ्यात त्याचे काही मित्र येतात.. त्यांचे शेवटचे वर्ष असल्यामुळे स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात सर्वांनी भाग घ्यायचं असे ठरवतात.. त्यामुळे सुमनला प्रपोज करण्याचा दिवस लांबणीवर पडला..
स्नेहसंमेलनात यांच्या ग्रुपने एक नाटक करायचे ठरवतात.. अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावर नाटक करायचं ठरते.. नाटकात एक कुटुंब आहे असे दाखवणार असतात.. त्यात दोन जोडपी आणि एक तान्ह मुल अर्थातच नाटकात.. एक भोंगी साधू अशी कल्पना ठरते..
मग आता कोणतं पात्र कोण घेणार याविषयी चर्चा होते.. "सागर आणि सुमनची जोडी छान दिसेल.." एकजण म्हणाला.. आणि सुमनचे हृदय धडधडू लागले..
नाटकाची रंगीत तालीम सुरू झाली.. त्यानिमीत्ताने ते दोघे अजून जवळ येतात.. रोजच बोलणं आणि भेटण आता त्यांना त्याची सवयच झाली होती.. नाटक खूप सुंदर झालं.. सगळ्यांकडून त्यांचं खूप कौतुक झालं..
कधीतरी वेड्यागत मन उगाच हसत
तुझ्या आठवणीने हळूच गालात लाजत
कधीतरी वेड्यागत मन हळव होतं
तुझ्या आठवणीने डोळ्यात आसव येतं
कधीतरी वेड्यागत मन उगाच जातं
हळूच तुझ्या कुशीत बिलगून तुला राहतं
दोघेही अगदी स्वप्नात असेच पाहत होते.. आता सागरला नोकरी मिळाली होती.. तो फक्त सुमनला प्रपोज करून तिच्या घरी तिला मागणी घालायला जाणार होता..
आज सागर सुमनला प्रपोज करणार होता.. त्याने तिला त्याच बागेत बोलावलं होतं जिथे ते पहिल्यांदा गेले होते.. सुमन थोडी घाबरतच तिथे आली.. मेघनाने तिला निरोप दिला होता की "सागरला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे.. आणि तो बागेत तुझी वाट पाहत आहे.." म्हणून सुमन तिथे आली..
"सागर बोल ना.. काय बोलायचं आहे??" सुमन
"अगं बस तर पहिला लगेच काय प्रश्न तुझे??" सागर
"अरे घरी खोटं बोलून आले आहे.. म्हणून म्हणाले काय ते लवकर सांग.." सुमन
"बरं सांगतो.. पण पटलं तर हो आणि नाही पटलं तर मला मारायचं नाही.." सागर
"अरे तुला कशाला मारेन??" सुमन
"हे बघ सुमन.. तुला खूप दिवसांपासून एक सांगायचं होतं.. अगदी काॅलेज सुरू झाल्यापासून तू मला खूप आवडतेस.. पण तुला कसं सांगायचं म्हणून मी गप्प होतो.. पण आता सांगतोय..
सुमन माझ्या स्वप्नातली परी बनून माझ्या आयुष्यात येऊन माझे आयुष्य सुंदर बनवशील.. मी एका जीवनसाथीच्या रूपात तुला पाहतो.. तर तू माझ्या आयुष्यात येऊन माझे जीवन पूर्णत्वास नेशील.. तू मला आयुष्यभरासाठी साथ देशील.. माझ्याशी लग्न करशील.." सागर हे सांगताना सुमनच्या डोळ्यातून पाणी येतं होते.. कदाचित तिला हे अनपेक्षित असेल.. सागर पण तिचं मन मोकळं होऊ दे म्हणून काही बोलत नाही..
थोड्या वेळाने ती भानावर येते.. तर सागर तिच्याकडेच बघत होता..
"काय झालं??" सागर
"काही नाही रे.. मला स्वप्नात देखील वाटलं नव्हतं की तू माझ्यावर प्रेम करशील.." सुमन
"मग खरं करतोय ना.. आता तुझं काय उत्तर आहे ते सांग??" सागर
"नाही कशी म्हणेन मी?? पण....." सुमन
"पण काय ग??" सागर
"घरचे तयार होतील.." सुमन
"होतील ना.. त्यात काय?? मी उद्याच तुझ्या घरी तुला मागणी घालायला येणार आहे.." सागर
"काय??? पण ते तयार होतील काय??" सुमन
"बघूया.." सागर
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा