सौदामिनी भाग 3

काय असेल सौदामिनीचा भूतकाळ
सौदामिनी. भाग -३

मागील भागात आपण पाहिले सौदामिनी प्रधान आपली आजी असून ती गायब असल्याचे रुक्मिणीला समजते. आपल्या आजीवर असलेला पाकिस्तानी हेर हा कलंक पुसायचा निर्धार रुक्मिणी करते. आता पाहूया पुढे.


एअर इंडियाचे विमान मुंबईकडे झेपावले आणि रूक्मिणीने आतापर्यंत रोखलेले अश्रू वाहू लागले. आजवर तिने आजीची किती स्वप्न रंगवली होती. आपली आजी पाकिस्तानी हेर? कल्पनाच करवत नव्हती. विचारांच्या तंद्रीत असताना डुलकी लागली. विमान मुंबई विमानतळावर उतरत असल्याची घोषणा होताच रुक्मिणी जागी झाली.


विमानातून बाहेर येताच तिने फ्लाईट मोडवर असलेला मोबाईल नेटवर्क मोडवर आणला. अभयचा मॅसेज होता. तिला घ्यायला तो मुंबईत आला होता. दुसरा ऑफिसचा मेल होता. पाचही जण रॉ एजंट असल्याची आणि त्यातील चार जणांची नावे दिली होती. पाचव्या एजंटची माहिती मिळाल्यावर पाठवू असा उल्लेख होता.
अभय बाहेर आतुर होऊन तिची वाट बघत होता.


‘सौदामिनी सारखी दिसणारी ही मुलगी प्रत्यक्षात कशी असेल?’ असा विचार करत असताना समोरून ती चालत आली. डेनिम जीन्स, पांढरा शर्ट,मोकळे केस आणि प्रचंड आत्मविश्वास. तिने अभयला ओळखले. ते दोघेही बाहेर पडले.


"मिस रुक्मिणी काय खाणार? महाराष्ट्र स्पेशल?" त्याने विचारले.


"काहीही चालेल ती काही माहीत फोनवर शोधत म्हणाली.


"काहीही असा पदार्थ इथे मिळत नाही." अभयच्या उत्तरावर ती मोकळेपणे हसली. दोघांनीही थोडे खाऊन घेतले आणि गाडी मुंबईबाहेर पडली.


"गाडी थांबव. शांतपणे आतच बसून रहा."

जवळपास तासभर प्रवास झाल्यावर रुक्मिणी अचानक म्हणाली तसे अभयने काहीच न समजून गाडी थांबवली. त्यांची गाडी थांबताच त्यांच्या मागे येणारी एक गाडी थांबली.


"अभय गाडी परत सुरू कर आणि आता कुठेच थांबू नकोस." आपला पाठलाग होत असल्याची खात्री झाल्यावर रुक्मिणी सावध झाली.


मुंबई कार्यालयात तिने नुर नावाच्या गायिकेचा शोध घेण्यासाठी माहिती पाठवली आणि कोकणचे सौंदर्य बघत होती. संध्याकाळ होत येताच गाडीने गावात प्रवेश केला.


"रुक्मिणी मी एक क्राईम जर्नालिस्ट आहे. माझा अंदाज असा सांगतो कोणीही सामान्य मुलगी आपला पाठलाग होत असल्याचे शोधू शकत नाही." अभय असे म्हणाला आणि रुक्मिणी त्याच्याकडे आश्चर्याने बघू लागली.


"पण तू इंजिनियर है ना?" तिने विचारले.


"ते पैसे कमवायला. तू दुर्वास नावाच्या पत्रकाराच्या स्टोरी वाचल्यात का?" त्याने हळूच विचारले.


"काय? मुंबईतील अनेक क्राईम धुंडनेमे पोलिसांना मदत करणारा आणि त्यातील सच बाहेर आणणारा दुर्वास?" रुक्मिणी असे म्हणत असतानाच गाडी अंगणात थांबली आणि तो विषय बंद झाला.


रुक्मिणी आजी बाहेर आली. समोर दिसणारी तरुणी बघून आजी जागीच थांबली.


"सौदामिनी प्रत्यक्ष समोर उभी आहे असे वाटतेय." आजी तिच्या कानावरून बोटे मोडत म्हणाली. त्या दोघांना आजी आत घेऊन गेली.


"नाव काय तुझे?" आजीने विचारले.


"आजी अपना नेम सेम आहे." रुक्मीणीने उत्तर दिले.


"ती पण एक गंमत आहे. आम्ही कॉलेजात असताना ठरवले होते. ज्याला नात होईल त्या मैत्रिणीने तिला दुसरीचे नाव द्यायचे." रुक्मिणी आजी हसून म्हणाली.


"अभय रूक्मिणीला तिची खोली दाखव. तोपर्यंत मी चहा घेऊन आलेच." आजी आत गेली.


"अभय प्रिंटर है काय?" रुक्मिणी त्याला विचारत होती." हो आहे ना. तू आवरून खाली ये." अभय बाहेर गेला. रुक्मीणीने दरवाजा बंद केला. ती अभयच्या गावी यायला तयार झाली कारण तिला शोधायची दोन माणसांचा पत्ता तिथून जवळच होता.


इकडे अभयदेखील काही कमी नव्हता. त्याने रुक्मिणी केंद्र शासन विभागात काम करत असल्याची माहिती काढली होती. रुक्मिणी साधासा पंजाबी ड्रेस घालून खाली आली. आजी चहा आणि खायला घेऊन वाटच बघत होती.

"रुक्मिणी चहा घे, तुला पाहून मला आता उद्या मरण आले तरी चालेल असं वाटतयं. तू द सौदामिनी प्रधानची नात आहेस." रुक्मीणी आजी बोलतच सुटली.


"आजी एक बात पुछू? अगर आपकी इतकी दोस्ती होती मग तुम्ही तिला शोधले नाही?" रुक्मिणी म्हणाली.

"रुक्मिणी अगं एकोणीसशे ऐंशी साली माझं लग्न झालं. तो काळ खूप वेगळा होता. त्यानंतर सौदामिनीचे लग्न कोणी आर्मी ऑफिसर माधव पाठक यांच्याशी झाले. पुढे मग संपर्क नाही राहिला." आजीच्या डोळ्यात पाणी होते.

"आजी, बुरा मत मानो आप. पण आता मी जे सांगते ते ऐका. मेरी आजी, आपकी सौदामिनी पाकिस्तान की जासुस थी ऐसा सब बोलते है। माझे वडील तिचं नावही घेत नाहीत." रुक्मिणीच्या डोळ्यात पाणी होते.


"काय? माझी सौदामिनी पाकिस्तानी हेर? अगं ती छातीवर गोळया झेलेल पण देशाशी गद्दारी करणार नाही. माझी सौदामिनी असे करूच शकत नाही." रुक्मिणी आजी ताडकन उठून निघून गेली.


"रुक्मिणी, आपण शोधून काढू खरे काय ते. त्यासाठी माधव पाठक आणि सौदामिनी जिथून गायब झाले त्या ठिकाणाहून सुरुवात करावी लागेल." अभयने तिला समजावले.


आजीने जेवणाची तयारी करायला घेतली. अभय आणि रुक्मिणी दोघांनी एकोणीसशे चौऱ्यांशी साली जम्मू खोऱ्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्याची माहिती काढायला सुरुवात केली. त्याकाळी सोशल मीडिया नसल्याने एवढी मोठी घटना किती सहज विरून गेली होती. आर्मी ऑफिसर आणि त्यांच्या कुटुंबीयांना निशाणा बनवणाऱ्या हल्ल्यात जवळपास पंधरा ऑफिसर,अनेक बायका आणि मुले मारली गेली होती.


"लूक, रुक्मिणी आपल्याला ग्राउंड रिपोर्ट हवाय. माझी खात्री आहे ह्या रहस्याची मुळे इथेच आहेत." अभय म्हणाला.


"बस दो घंटे. आपल्याला रिपोर्ट मिळेल." रुक्मिणी मेल टाईप करत म्हणाली.


"अभय,खाली या जेवायला." आजीने आवाज दिला.


"आजी उकडीचे मोदक? क्या बात है।" रुक्मिणी आनंदाने ओरडली.


दोघेही भरपेट जेवले आणि थोडा बाहेर फेरफटका मारायला जायचा असे ठरवले. अभय आणि रुक्मिणी बाहेर चांदण्यात फिरत होते. अचानक रुक्मिणी त्याला सोडून थोडे पुढे गेली त्याबरोबर मागून अभयला दोघांनी पकडले.

"गुपचूप चालत रहा नाहीतर त्या पोरीला मारून टाकू." धमकी देणाऱ्याने समोर पाहिले समोर कोणीच नव्हते. दुसऱ्या क्षणी अभयवर पिस्तूल रोखणारा जमिनीवर आणि दुसरा सहा फूट लांब उडाला होता.


"ओय, बराबरी वालोसे पंगा घे." रुक्मिणी ओरडली. तेवढ्यात त्यातील एकाने वाळू उधळली आणि आजूबाजूची माणसे जमा व्हायच्या आत पळ काढला.


"रुक्मिणी खरं सांग कोण आहेस तू?" अभयने विचारले.


"वक्त आने दो सब भेद खुलेंगे. देखो रिपोर्ट आई है, प्रिंट काढून वाचू." रुक्मिणी पुढे चालू लागली.


"रुक्मिणी आजीला सांगू नको." अभय म्हणाला. तिने होकारार्थी मान हलवली आणि दोघे घरी आले.


अभयने घरी आल्यावर रिपोर्ट प्रिंट केला. एकोणीसशे चौऱ्यांशी साली झालेला हा हल्ला अतिशय नियोजनबध्द आणि इथून बातम्या फुटल्याने झाला होता. त्या रात्री मेजर माधव पाठक आणि त्यांच्या पत्नीने पार्टी दिली होती. ऐन मध्यरात्री झालेल्या ह्या हल्ल्यात फक्त तीन ते चार लहान मुले आणि एका ऑफिसची बायको वाचली होती. जी मूळची काश्मीरची होती.


लेफ्टनंट हंबीरराव पाटील यांची काश्मिरी बायको जिचे लग्नानंतर नाव लक्ष्मी होते. त्यानंतर तो लष्करी तळ बंद करण्यात आला. मेजर माधव पाठक यांच्या पत्नीचा त्यानंतर पत्ता लागला नाही आणि मृतदेह देखील सापडला नाही. रिपोर्ट वाचून दोघेही थांबले.


आता लक्ष्मी हंबीरराव मोहिते ह्या नावाच्या बाईला शोधायचे होते. त्यानंतर बरेच प्रश्न सुटणार होते. तिकडे नूरचा पत्ता देखील सापडला होता. उद्या सकाळी मुंबईला निघायचे ठरवून अभय आणि रुक्मिणी झोपायला गेले. वाटेतच ज्या दोन व्यक्तींच्या घरी जायचे होते त्यांची भेट घेता येणार होती.

नूर आणि लक्ष्मीबाई सापडतील?
सौदामिनी तिथून गायब झाली मग ती जिवंत असेल का?
वाचत रहा.
सौदामिनी
©®प्रशांत कुंजीर.

🎭 Series Post

View all