सौदामिनी भाग 5 अंतिम

आजीचा शोध संपणार आणि एक रहस्य उलगडणार.
सौदामिनी. भाग ५ (अंतिम भाग)

मागील भागात आपण पाहिले नुर सापडते. तिला घेऊन जाताना काही गुंड हल्ला करतात आणि मग रुक्मिणी निसटते. परंतु अभय आणि नुर सापडतात. करुणा खऱ्या लक्ष्मीच्या शोधात निघते. आता पाहूया पुढे.


एका आलिशान बंगल्याच्या बाहेर रुक्मिणी येऊन पोहोचली. प्रवेशद्वारावर उर्दूत नाव होते. कोणीतरी रुस्तम खान यांचा बंगला होता. रुक्मिणी मुद्दाम पुढे चालत गेली. एक चहाची टपरी होती.


"दादा एक चाय कडक." ती समोर बाकावर बसली.


"दिदी, चाय." चहावाला चहा देत म्हणाला.


"किती भारी बंगला आहे. हा रुस्तम मोठा आमीर आदमी असेल नाही." रुक्मिणी म्हणाली.


"अरे रुस्तम कब का मर गया। अब ये बंगला उसकी बिबी बिब्बो के नाम है।" चहाचे पैसे देऊन रुक्मिणी पुढे निघाली. तिने मागच्या बाजूने जायचे ठरवले. समोरून नक्कीच कॅमेरे असण्याची शक्यता होती.


अभयने सगळे शांत झाल्याचे पाहिले आणि सुटकेचा विचार करत होता. तितक्यात दरवाजा उघडल्याचा आवाज झाला. समोरून पावलांचा आवाज जवळ येत होता.


"चिंत्या, पट्टी निकाल." एक स्त्री बोलत होती. नुर आणि अभय दोघांच्या डोळ्यांवर असलेली पट्टी निघाली.


"लक्ष्मी तू?" नुर मोठ्याने ओरडली.


"चूप साली गद्दार, ओ गंदा नाम फक्त शिडी होती भारतात शिरायची." क्रूर हसून ती म्हणाली.


"सलिम, ह्या दोघांना मारून तुकडे कर आणि खाडीत फेकून दे. नुर तेरी सहेली जैसे तू भी गायब हो जाएगी। पाकिस्तानी हेर म्हणूनच तुला ओळखणार सगळे. चल अब्दुल चाकू निकाल." असे म्हणून तिने चाकू घेतला आणि नुरकडे जाऊ लागली.


आता आपण मरणार याची नुरला खात्री पटली. तिने डोळे बंद केले इतक्यात सायलेंट रिव्हॉल्व्हर मधून सुटलेल्या गोळ्या तिचा एकेक माणूस टिपत होत्या. ओरडण्याचा आवाज येताच ती मागे फिरली. आपल्या माणसांना कोण मारत आहे? हे तिला कळत नव्हते.


"कोण है? हिंमत असेल तर समोर ये. बिब्बो सोडणार नाही तुला." तिच्या प्रश्नासरशी पिस्तूल खाली टाकून एक तरुण मुलगी पुढे आली.


"सौदामिनी? कैसे मुमकिन है? मी स्वतः तुला अतिरेक्यांच्या ताब्यात दिलं." ती चक्रावून गेली.


"मी सौदामिनी नाही. तिची ग्रँड डॉटर रुक्मिणी." समोरून उत्तर आले.


"मतलब माधवची मुलगी. त्याला पण तेव्हाच मारणार होते; पण तो सापडला तेव्हा सैनिक येऊन पोहोचले." तिचे वाक्य पूर्ण व्हायच्या आत रुक्मिणीच्या पोलादी पंजाचा ठोसा तिच्या जबड्यावर बसला होता.


"तू पण मरणार ह्या दोघांच्या बरोबर. माझी माणसं सगळ्या बाजूंनी आहेत." तोंडावरचे रक्त पुसत बिब्बो म्हणाली."


त्या हांबिरची विधवा बनून इथे शिरले आणि गेली चाळीस वर्षे ह्या देशाला खिळखिळे करत आहे." क्रूर हसून ती बोलत होती. तेवढ्यात बाहेरून घोषणा झाली.


"संपूर्ण बंगला पोलिसांनी घेरला आहे. जो पळायचा प्रयत्न करेल त्याला गोळी घातली जाईल." करुणा वेळेवर मदत घेऊन पोहोचली होती.


गेली चाळीस वर्षे भारतीय भूमीवर असलेली एक पाकिस्तानी हेर पकडली गेली. परंतु तरीही आजी सापडली नव्हती. रुक्मिणी उदास मनाने पोलीस स्टेशनवर आली. अभयने त्याचा फोन चार्जिंग साठी लावला आणि आजीचा फोन आला.


"अभय ऐक मला इथे पाच फोटो सापडले. त्यातील पाचवा फोटो सौदामिनीचा आहे." आजी आनंदाने रडत होती.


"कशावरून आजी?" अभय म्हणाला.


"माझ्या जिवलग मैत्रिणीचे डोळे मी कसे विसरेल?" आजीने फोन ठेवला.

"रुक्मिणी तू ज्या पाच प्रिंट काढल्या त्यातील एक फोटो सौदामिनी आजीचा आहे असे आजी म्हणत आहे. कोणाचे फोटो आहेत ते?" अभयने विचारले. " पाकिस्तानी तुरुंगात कैद असलेल्या भारतीय कैद्यांचे फोटो आहेत." रुक्मिणी उत्साहात म्हणाली.


बिब्बो उर्फ लक्ष्मीचे सामान सिल करताना पोलिसांना एक डायरी सापडली. तिला वरून एक विशिष्ट कुलूप होते.

"मॅडम ह्या डायरीत काय असेल?" एक कॉन्स्टेबल म्हणाला. नुर तिथेच बसून होती.


"ए दिदी की डायरी है।" ती पटकन पुढे झाली. तिचे वाक्य ऐकताच अभय आणि रुक्मिणी धावले.


"अभय काय कोड असेल? माधव या फिर मेरे पापा का नाम श्रीकांत?"रूक्मिणी म्हणाली.


"नाही, ही दोन्ही नावे सगळ्यांना माहीत होती. सौदामिनी लष्करी आयुष्य जगताना ही नावे नाही वापरणार." असे म्हणून अभयचे डोळे चमकले.


त्याने रुक्मिणी नावाचे स्पेलिंग फिरवले आणि डायरी उघडली गेली. एका अंडर ग्राउंड एजंट रॉ एजंटची ती डायरी बघून लेडी बाँड अख्यायिका नसून सत्य असल्याचे समोर आले. रूक्मिणीने थरथरत्या हाताने डायरी बंद केली. तिच्या आजीच्या नावावर असलेला कलंक पुसला होता.


अभय आणि रुक्मिणी दोघांनी याबाबत गुप्तता पाळली. सगळे काम उरकून रुक्मिणी दिल्लीला परत गेली होती. इकडे अभय रुक्मिणी आजीच्या मागे लागला होता. आजी ह्या पंधरा ऑगस्टला आपल्याला वाघा बॉर्डर बघायला जायचे आहे. आजीने हार मानली आणि तयार झाली.


पाकिस्तान आणि भारत याही वर्षी काही कैदी सोडणार होते. बॉर्डर जवळ आली. एकेक कैदी सोडला जात होता.


"इस पागल औरत को लेने कोई नाही आयेगा।" पाकिस्तानी सैनिक हसून टाळ्या देऊन म्हणाला.


ती भारतीय भूमीजवळ येताच काहीशी थांबली. तितक्यात तिला मागून ढकलले आणि ती पलीकडे जमिनीवर पडली. तिचा कृश देह थरथरत होता. संपूर्ण हाडाचा सापळा झालेला देह उभा राहू शकत नव्हता. तितक्यात एक वृद्ध स्त्री तिच्या जवळ आली. तिला पकडुन उभे केले.


"सौदामिनी, उठ. मी आलेय." त्या स्त्रीने असे म्हणताच तो कृश देह तिला बिलगला आणि तिची शुद्ध हरपली.


आजचा प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम अतिशय खास होता. गेले चाळीस वर्षे पाकिस्तानी तुरुंगात राहूनही ब्रदेखील न उच्चारलेल्या आणि अनेक अशक्य मोहिमांत भाग घेतलेल्या एका महान स्त्रीचा आज परमवीर चक्र देऊन सन्मान होणार होता. कमांडर सौदामिनी पाठक आपला मुलगा डॉक्टर श्रीकांत, सून डॉक्टर कुसुम आणि तरुण रॉ अधिकारी रूक्मिणी यांच्या सोबत मंचावर आली आणि तिला मान वंदना द्यायला तिचा संपूर्ण वर्ग उभा राहून मोठ्याने टाळ्या वाजवत होता.

सदर कथा पूर्णपणे काल्पनिक असून मनोरंजन ह्या हेतूने लिहिली आहे. कृपया तोच हेतू धरून वाचावी आणि वाचनाचा आनंद घ्यावा.

प्रशांत कुंजीर.

🎭 Series Post

View all