सौंदर्य.

कविता -सौदर्य राधिका कुलकर्णी.


#सौंदर्य

काय आहे सौंदर्य!!

घोर काळ्या मिट्ट
अंधारात ऊन्हाचा
अवचीत कवडसा
म्हणजे ...सौंदर्य

भुकेलेल्या अनाथ
लेकराच्या चेहऱ्यावर
आलेला तृप्तीचा
ढेकर
म्हणजे ...सौंदर्य

तप्त उजाड
सुकलेल्या माळावर
तहानलेल्या धरणीला
ओलावणारा
पावसाचा पहिला थेंब
आहे सौंदर्य

सौंदर्य काय आहे..

प्रेयसीचे काळे कुंतल
सौंदर्य आहे...

भाबडे निरागस हास्य
सौंदर्य आहे...

राधेचे निर्व्याज प्रेम
सौदर्य आहे..

कृष्णाच्या मंजुळ
बासरीचे
अनुरागी स्वर
सौंदर्य आहे..

दुसऱ्याच्या दु:खात
ढाळलेला एक अश्रु
सौंदर्य आहे.

मानवाने मानवासाठी
दिलेला मदतीचा
हात सौंदर्य...

तनामनात सौंदर्य आहे

कणाकणात सौंदर्य आहे.

निसर्गाच्या हर त्रृतुत
सौंदर्य आहे..

मी सुंदर आहे
तू सुंदर आहे

त्याहूनही
मी-तू पणा संपून
तादात्म्यता
सौंदर्य आहे....
~~~~~~~~~~~~~~~
©®राधिका कुलकर्णी.

🎭 Series Post

View all