"जाउबाई जाताय तर आमच्या सोनूला सोबत घेऊन जा"
धाकल्या जावेने आदेश सोडताच थोरलीला चांगलाच राग आला. सोनूच्या मोठ्या काकाने लाडाने सोनूला कडेवर घेतलं आणि सोबत न्यायला लगेच तयार झाला, थोरल्या जाउबाईंचा मात्र चेहरा चांगलाच पडला. आज त्या दोघांनी बाहेर जेवायचा प्लॅन केलेला, त्यांचा मुलगा मोठा होता, आठवीला. तो मामाच्या गावी गेल्याने त्या दोघांना मोकळा वेळ मिळाला होता.
धाकल्या जावेने तिच्या सोनूला काका काकुसोबत पाठवून दिलं आणि तिला समाधान वाटलं. पण जेव्हा तिच्या नवऱ्याला समजलं तेव्हा तो तिलाच म्हणाला,
"तू वेडी आहेस का? कशाला आग्रह करायचा? एक तर त्यांना एकमेकांसोबत वेळ मिळत नाही हवा तसा, त्यात तू सोनूला पाठवून दिलंस"
"अहो मी नाहीच म्हणत होते पण सोनू खूप हट्ट करत होता, शेवटी मला पाठवावंच लागलं.."
थोरल्या जाउबाई आणि जेठ फिरून घरी आले. सोनू काकाच्या कडेवर होता, खुश दिसत होता. त्याच्या हातात बराच खाऊ होता. थोरल्या जाउबाईंचा मात्र चेहरा पार उतरला होता. कदाचित सोनूमुळे त्यांना अजिबात एकमेकांसोबत बोलायला मिळालं नसावं.
बऱ्याचदा हेच व्हायचं, थोरल्या जाउबाई आणि मिस्टर बाहेर निघाले की धाकली त्यांच्या मुलाला पुढे करून सोबत न्यायला आग्रह करायची.
पुढच्या खेपेस थोरल्या जाउबाईंनी शक्कल लढवली, सोनू शाळेतून यायच्या आधी त्यांनी नवऱ्यासोबत बाहेर जायचं ठरवलं.
थोरल्या जाउबाई तयार होऊन आल्या,
थोरल्या जाउबाई तयार होऊन आल्या,
"अहो, चला लवकर.. उशीर होईल.."
थोरले दिर म्हणाले,
"अजून अर्ध्या तासाने जाऊ..सोनू पण शाळेतून येईल, त्याला सोबत नेऊ"
थोरलीला कळून चुकलं, की धाकलीने मुद्दाम तिच्या नवऱ्याला सांगितलं असावं की सोनू येईलच त्यालाही घेऊन जा.
आता मात्र थोरलीचा संयम सुटला, ती म्हणाली..
आता मात्र थोरलीचा संयम सुटला, ती म्हणाली..
"सोनूला दरवेळी न्यायलाच हवं का? आपल्या दोघांना काही प्रायव्हसी आहे की नाही?"
हे ऐकून सासूबाई आणि मिस्टर तिच्यावरच चिडले, म्हणाले..
"सोनूचा काय त्रास होतो तुला इतका? लहान आहे तो..माझ्या पुतण्या आहे, मी त्याला नेणार म्हणजे नेणार.."
मिस्टर हटून बसले आणि थोरलीने रागारागाने जाहीर केलं,
"सोनू येणार असेल तर मी तुमच्यासोबत येणार नाही.."
असं म्हणत त्या रागारागाने खोलीत निघून गेल्या. धाकलीच्या नवऱ्यानेही सगळं बघितलं आणि तो तिच्यावरच चिडला,
"तुला परत परत का सांगावं लागतं? का सोनूला त्यांच्यावर थोपवायचा आग्रह असतो तुझा??"
"थोरल्या जाउबाईंना जाणीव व्हावी म्हणून.."
"कसली जाणीव?"
"आठवा, आपले जुने दिवस...नवीन नवीन लग्न झालं होतं आणि जाउबाईंचा ओम सहा वर्षाचा होता.."
नवऱ्याला जुनं सगळं आठवलं..
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा