Login

स्पष्टपणा (लघुकथा)

स्पष्ट बोलून सतत एखाद्याचा अपमान करणे.....
'प्रिया तू सर्व लोकांच्या समोर असं बोलायला नको होतं'...

'मी जे काही बोलले ते खरं तेच बोलले'.... प्रिया स्पष्टपणे बोलते.

'तू खरं तेच बोलली पण सर्वांच्या समोर बोलण्याची काहीच गरज नव्हती'. राहुल वैतागून बोलतो..

'हे बघा राहुल मी स्पष्ट बोलणारी मुलगी आहे'. मागून एक आणि पुढून एक  करण मला अजिबात जमत नाही.

'अगं हो प्रिया, पण आपल्या बोलल्यामुळे जर समोरच्याचा अपमान होणार असेल. तर स्पष्ट न  बोलणं चांगलं असतं.आणि नाती टिकवायची असतील तर तोंड सांभाळून बोलायचं असतं...


'पण राहुल मला असं नाही वाटत'. समोरच्यालाही खऱ्याची जाणीव करून देणं गरजेचं असतं. त्यामुळे एखादाच मन दुखावलं तरी त्याने काही फरक पडत नाही. आणि प्रत्येक वेळी नाती टिकवलीच पाहिजेत असं नाही...

"स्पष्ट बोलून समोरच्याचा अपमान करणं हे माणसाच्या स्वभावात असतं पण स्पष्ट बोलून समोरच्याचा अपमान न करता ती गोष्ट त्याला समजून सांगणे. हे त्याच्या संस्कारावर अवलंबून असते".... अगं...काल आपल्या घरी पूजेला सगळे पाहुणे मंडळी  आली होती आणि माझी ताई देखील पूजेला आली होती. तिने हौसेने आपल्या दोघांसाठी पोशाख आणला होता .पण तू ताईला असं बोलायची काहीच गरज नव्हती केवढ्या भडक रंगाचे कपडे आणलेत.... आम्ही घालत नाही ... माझ्या ताईने तिच्या पसंतीचे कपडे आपल्यासाठी आणले होते आणि माझी ताई गावी राहत असल्यामुळे शहरातल्या बायका कशा रंगाचे कपडे वापरतात हे तिला माहिती नाही. पण एवढ्या पाहुण्यांसमोर तिला मान खाली घालायला लावण्याची काहीच गरज नव्हती".

'अरे... पण हे तुझ्या बहिणीला कळायला हवं होतं ना ? तू आता गावाला नाही शहरात राहतो. मी एवढ्या हौसेने माझ्या मैत्रिणींना पोषक दाखवायला गेले.  साडीचा रंग आणि डिझाईन बघून माझ्या सगळ्या मैत्रिणींनी तोंडच मुरडलं.  माझ्या मैत्रिणीने किती टॉन्ट मारले.... काय बोलल्या ते ऐकलंच ना तू ...ओल्ड फॅशन आणि डार्क कलरची साडी आहे....

'पण एखाद्याने आपल्याला जर  मनापासून एखादी गोष्ट जर भेट दिली असेल , तर तिचा असा अपमान करू नये... एवढी साधी गोष्ट तुला कळत नाही का प्रिया.

'तुमच्या ताईने आपल्याला भडक रंगाचा पोशाख आणलाच पण आपल्या परीला ड्रेस आणला तो किती झगझगीत होता'... त्यापेक्षा एखादी वस्तू आणली असती तरी चाललं असतं किंवा काही आणलं नसतं तरी चाललं असतं...

'राहुल, संतापन बोलतो ......काहीच आणलं नसताना तरी तू माझ्या ताईला काही ना काही बोललीच असतीस . एकुलता एक भाऊ असून पण  काही आणलं नाही म्हणून.

त्या दोघांच बोलणं, त्यांची मुलगी परी लांबूनच ऐकत असते. त्याचवेळी 'प्रियाने ,परीसाठी ऑनलाईन ऑर्डर केलेला ड्रेस घरी येतो. तो ड्रेस बघून परी देखील आईला बोलते आई हा ड्रेस मला अजिबात सुद्धा आवडला नाही या ड्रेसचे डिझाईन सुद्धा मला आवडल नाही.

'परी हा ड्रेस मी तुझ्यासाठी खूप प्रेमाने ऑर्डर केला आहे'. प्रिया तिच्या मुलीला बोलते...

'परी बोलते,... तरी मला या ड्रेसची डिझाईन नाही आवडली आणि " मी सुद्धा तुझीच मुलगी आहे ना! " तूच बोलतेस ना!  की माणसाने  नेहमी खरं आणि स्पष्ट बोलावं.. मग  मी खोटं कशाला बोलू, की मला हा ड्रेस आवडला म्हणून....

परीचे बोलणे ऐकून प्रियाला खूप वाईट वाटते व तिने केलेल्या चुकीची तिला जाणीव होते. ती राहुला बोलते.. "सॉरी राहुल ..मी असं ताईंना बोलायला नको होतं".

'राहुल बोलतो ....सॉरी मला बोलू नको .माझ्या ताईला फोन कर आणि फोन करून ताईला सॉरी बोल...

"प्रिया , ताईला फोन करते व बोलते ताई माझ्याकडून चूक झाली मी तुम्हाला काल पूजेत असं बोलायला नको होतं. मी माझ्या मैत्रिणींचा ऐकून तुमचा सर्वांसमोर अपमान केला त्याबद्दल मला क्षमा करा.

त्यावर ताई बोलते चूक तुझी नाही. ज्या लोकांच्या संपर्कात तू राहतेस, त्या लोकांचा गुण तुला लागलेला आहे. माणसाने स्पष्ट बोलावं... पण ...वेळ , काळ आणि नाती बघून.....