Login

भगतसिंग भाषण

भगतसिंग भाषण

भाषण क्रमांक १
आदरणीय अध्यक्ष महोदय, आदरणीय शिक्षकवृंद आणि माझ्या मित्र-मंत्रिणींनो. आज 28 सप्टेंबर म्हणजे श्रेष्ठ देश भक्त आणि क्रांतिकारक भगतसिंग यांची जयंती. त्यानिमित्त आपण त्यांनी केलेल्या कार्याचा आढावा घेऊन त्यांना अभिवादन करणार आहोत तर माझे चार शब्द तुम्ही शांत चित्तने ऐकून घ्यावेत ही नम्र विनंती.

आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून आज जवळपास सत्तर वर्षे होत आली आपण उपभोगत असलेलं हे स्वतंत्र आपल्याला देशाला इतकं सहजासहजी मिळालेलं नाही. त्यासाठी अनेक लोकांनी पराकोटीचे त्याग केले तर काही लोकांनी खूप मोठी किंमत चुकवली आहे.

आपला देश इंग्रजांच्या गुलामगिरीच्या बेड्यांमध्ये जखडला गेला होता.. आपल्याला असेच स्वातंत्र्य मिळाले नाही तर त्यासाठी अनेक महान क्रांतिकारकांनी त्यासाठी त्यांच्या प्राणांची आहुती दिली आहे. तेंव्हा आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक लोक झटले त्यापैकी एक म्हणजे क्रांतिकारक भगतसिंग हे एक होते. आज 28 सप्टेंबर त्यांची जयंती त्या निमित्ताने त्यांच्या स्मृतीस जागवून वंदन करण्यासाठी आपण इथे जमलो आहोत.

यांचा जन्म 28 सप्टेंबर1907 रोजी पंजाब प्रांतातील ल्यालपूर जिल्ह्यातील बँगा गावात झाला होता. त्यांच्या आईचे नाव विद्यावती आणि वडिलांचे नाव किशन सिंग होते. त्यांच्या कुटुंबातील बरेच सदस्य भारतीय स्वातंत्र्य चळवळीत सामील झाले होते. भगतसिंग यांना हिंदी, उर्दू,पंजाबी,आणि इंग्रजी भाषेच्या व्यतिरिक्त बंगला देखील येत होती. वयाच्या 14 व्या वर्षीच ते गुरुद्वारात नानकासाहेब येथे अनेक लोकांना ठार मारण्याच्या विरोधातच्या आंदोलनात सहभागी झाले. नंतर ते युवा क्रांतिकारी चळवळीत सामील झाले, आणि ब्रिटिश सरकारच्या हिंसक मार्गाने पाडाव करण्यासाठी विचाराचे समर्थक झाले. इटलीच्या एका गटा पासून प्रेरित होऊन भगतसिंगने मार्च 1926 मध्ये 'नवजवान भारत सभा' स्थापन केली. नंतर ते हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिक संघाचे सदस्य देखील झाले. या संघात त्यांच्या सह चंद्रशेखर आझाद, रामप्रसाद बिस्मिल,शाहिद,अशफाखाल्ला खान सारखे दिग्गज होते.

डिसेंबर 1928 मध्ये, भगतसिंग आणि त्यांचे सहकारी सुखदेव राजगुरू यांनी ब्रिटिश पोलीस अधिकारी जॉन सॉंडर्सला लाहोर येथे गोळ्या घालून ठार केले. ब्रिटिश पोलीस अधीक्षक जेम्स कॉटच्या आदेशावरून लाला लाजपतराय यांच्या वर लाठीचार्ज करून जबर जखमी केले. त्या मुळे लाला लाजपतराय यांना आपले प्राण गमवावे लागले .लाला लाजपत राय ह्यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी त्यांनी जेम्स कॉटला ठार मारायचे ठरविले होते परंतु एन वेळी सॉंडर्स पुढे आल्यामुळे तो ठार झाला. या नंतर त्यांनी देशाला ब्रिटिशांच्या तावडीतून स्वातंत्र्य करण्यासाठी साहसाने ब्रिटिश सरकारचा सामना केला त्यांनी दिल्लीच्या सेंट्रल असेंब्ली मध्ये बॉम्ब हल्ला करून ब्रिटिश साम्राज्याच्या विरुद्ध उघड बंड केले. त्यांनी सेंट्रल असेंब्ली मध्ये बॉम्ब टाकून पळून जाण्याचा प्रयत्न देखील केला नाही. त्यासाठी त्यांना आणि त्यांच्या सह त्यांचे दोन सहकारी राजगुरू आणि सुखदेव यांना 23 मार्च 1931 रोजी फाशावर देण्यात आले.त्यावेळी त्यांचे वय अवघ्या 23 वर्षाचे होते. देशासाठी स्वतःच्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या या महान क्रांतिकारकास माझे विनम्र अभिवादन!
★★★★

भाषण क्रमांक २
सुर्याप्रमाणे तेजस्वी दिसणारे व्यासपीठ, आणि व्यासपीठावरील अध्यक्ष गुरुजन वर्ग, परीक्षक आणि माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला सर्वांना माझा नमस्कार! आज मी जे सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे ही नम्र विनंती

भगतसिंग यांचा जन्म 28 सप्टेंबर 1907 ला पंजाबच्या ल्यालपुर जिल्ह्यातील बॅंगा या छोट्याश्या गावी झाला.त्यांच्या आईचे नाव विद्यावती तर वडिलांचे नाव किशन सिंग होते.भगत सिंग यांचे वडील, किशन सिंग आणि काका, सरदार अजित सिंग हे दोघी त्याकाळचे लोकप्रिय स्वातंत्र्य सेनानी होते. दोघी गांधीजींच्या विचारांचे समर्थक होते.

1921 साली जेव्हा गांधीजींनी असहयोग आंदोलन सुरू केले तेव्हा भगतसिंग त्या आंदोलनात सहभागी झाले. परंतु चौरीचौरा येथील घटनेने व्यथित होऊन गांधीजींनी आपले आंदोलन थांबवले. हे सर्व पाहून भगतसिंग निराश झाले. भागसिंगच्या लक्षात आले की अहिंसेच्या मार्गाने भारताला स्वातंत्र्य मिळणार नाही. उलट इंग्रजी सत्तेचा जुलूम वाढतच जाईल. म्हणून त्यांनी सशस्त्र क्रांतीचा मार्ग स्वीकारायचे ठरवले. तो मार्ग इतका सोपा नाही याची देखील त्यांना पूर्ण कल्पना होती.

वलहानपणापासून त्यांना इंग्रजांच्या जुलमी सत्तेतून भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याची तीव्र इच्छा होती. 13 एप्रिल ला जेव्हा अमृतसर मध्ये जालियनवाला बाग हत्याकांड प्रकरण घडले तेव्हा भगतसिंग हे बारा वर्षाचे होते या घटनेचा खोल प्रभाव त्यांच्या मनावर झाला.13 वर्षाच्या वयात शाळा सोडून भगतसिंग यांनी लाहोरच्या नॅशनल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्या काळात त्यांची ओळख अनेक राजकीय नेत्यांशी झाली. याच कॉलेजमध्ये त्यांनी युरोपियन क्रांतिकारी आंदोलनाचा अभ्यास केला.

आणि ब्रिटिश सरकारच्या हिंसक मार्गाने पाडाव करण्यासाठी विचाराचे समर्थक झाले. इटलीच्या एका गटा पासून प्रेरित होऊन भगतसिंगने मार्च 1926 मध्ये 'नवजवान भारत सभा' स्थापन केली. नंतर ते हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिक संघाचे सदस्य देखील झाले. या संघात त्यांच्या सह चंद्रशेखर आझाद, रामप्रसाद बिस्मिल,शाहिद,अशफाखाल्ला खान सारखे दिग्गज होते.

डिसेंबर 1928मध्ये, भगत सिंग आणि त्याचे सहकारी, सुखदेव राजगुरू यांनी 21 वर्षीय ब्रिटिश पोलीस अधिकारी जॉन साँडर्सला लाहोर येथे गोळ्या घालून ठार मारले. जेम्स स्कॉट ह्यांना ठार मारण्याचा हेतू असताना चुकून साँडर्स बळी पडला. पोलीस अधीक्षक जेम्स स्कॉट याने हिंदुस्थानातील लोकप्रिय राष्ट्रवादी नेते लाला लजपत राय हे सायमन कमिशन विरुद्ध आंदोलन करत असताना ह्यांच्यावर लाठी चार्जचा आदेश देऊन त्यांना जबर जखमी केले. त्यामुळे लाला लजपत राय दोन आठवड्यांनंतर मरण पावले. त्यांच्या मृत्यूचा बदला म्हणून भगतसिंगांनी स्कॉटला मारण्याचा बेत केला होता. त्याच्या या कटात चंद्रशेखर आझाद व शिवराम हरी राजगुरू सहभागी होते. त्यानंतर भगतसिंग व राजगुरू यांचा शोध घेत असल्याचे पाहून चंद्रशेखर आझाद ह्यांनी चानन सिंघ नावाच्या भारतीय पोलीस अधिकाऱ्याला मारले.

त्यानंतर लोकांना इंग्रजी सत्ते विरुद्ध जागृत करण्यासाठी त्यांनी विधानसभेत बॉम्ब स्फोट करण्याचा निर्णय घेतला ठरलेल्या योजनेनुसार ते आपले सहकारी बटुकेश्वर दत्त यांच्यासोबत विधान सभेच्या सत्रात पोहोचले व त्यांनी बॉम्ब टाकला. या हल्ल्यात कोणीही मरणार नाही याची त्यांनी काळजी घेतली. बॉम्ब फुटल्यानंतर त्यांनी इंकलाब झिंदाबादचे नारे दिले. यानंतर ते स्वतःहून इंग्रजांच्या स्वाधीन झाले. पुढे पोलिसांच्या चौकशीत हे निष्पन्न झाले की इंग्रज अधिकारी सँडर्सची हत्या केली ही भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांनी केली आहे तेंव्हा त्यांच्यावर खुनाचा खटला चालवून तिघांना ही फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली.

23 मार्च 1931 ला आपल्या फाशीच्या दिवशी हे तिघी वीर इंकलाब झिंदाबाद, भारत माता की जय असा जय जयघोष करत आनंदाने फासावर आले. सरदार भगत सिंग हे देशाच्या महान क्रांतिकारी पैकी एक होते. देशाच्या स्वातंत्र्यात त्यांनी केलेलं बलिदान हे अभूतपूर्व आहे. आज जरी भगत सिंग आपल्या सोबत नाही आहेत, तरी त्यांची देशभक्तीची भावना आणि बलिदान सर्वांना प्रेरणा देत.भगतसिंग हे एक महान भारतीय क्रांतिकारी होते. ब्रिटिश साम्राज्याविरुद्धच्या लढ्यात त्यांनी केलेला दोन हिंसात्मक कार्यामुळे वयाच्या तेविसाव्या वर्षी इंग्रजांनी त्यांना फाशीची शिक्षा झाली. आणि ते हसत हसत फासावर चढले.

महान क्रांतिकारक भागसिंग यांनी आपल्याला देहप्रेम आणि देशसेवा यांचे धडे दिले. स्वातंत्र्य संग्रामाच्या त्या धगधगत्या हवन कुंडात त्यांनी त्यांच्या प्राणांची आहुती दिली म्हणून आपण आज हे स्वातंत्र्य उपभोगत आहोत हे आपण विसरता कामा नये.त्यांच्या बलिदानाचा आणि देशभक्तीला माझे कोटी कोटी नमन.