संसाराचा सारीपाट
हरलो आता, पुराता हरलो
संसाराचा सारीपाट,खेळून खेळून दमलो
हरलोsssss
आता पुरा हरलो
संसाराचा सारीपाट,खेळून खेळून दमलो
हरलोsssss
आता पुरा हरलो
जिव्हा लालीत्याची तिच्या कमालच आहे
जीभ आहे धारदार, मानत नाही कधीच हार
माझ्या मानेवर करी सदा प्रहार
तिचा चेहरा पाहताच,
वाक्यच्या वाक्य गिळू लागलो
हरलो ssss, आता पुरता हरलो
तिचा दरारा अटकेपार
ती राणी मी हुकूमाचा ताबेदार
सारी पुंजी तिच्याच हाती,
मी कारकून नोकरदार
ती बायको मी नवरा, पुरता विसरलो
हरलो ssss,आता पुरता हरलो
ती राणी मी हुकूमाचा ताबेदार
सारी पुंजी तिच्याच हाती,
मी कारकून नोकरदार
ती बायको मी नवरा, पुरता विसरलो
हरलो ssss,आता पुरता हरलो
जाऊद्या हे माझे पुराण
मी तर जन्माचा बंदीवान
पण पहा हा शुभमंगल सावधान
नाहीतर सुटतं असं अवधान
तुम्हाला मिळो जोडीदार छान
संसाराची लज्जत वाढो,
मी तर जन्माचा बंदीवान
पण पहा हा शुभमंगल सावधान
नाहीतर सुटतं असं अवधान
तुम्हाला मिळो जोडीदार छान
संसाराची लज्जत वाढो,
हसून खेळून बागडून
शुभ होवोत इच्छा आकांक्षा,शुभेच्छा माझ्याकडून
शुभ होवोत इच्छा आकांक्षा,शुभेच्छा माझ्याकडून
...... योगिता मिलिंद नाखरे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा