ध्यास तुझा (मुक्त छंद काव्य)
सोडून मला जाऊ नकोस
मनी ध्यास तुझाच रे मला
तुझ्याशिवाय जीवनात नाही कोणी
सख्या हे माहित आहे तुला
लागला तुझ्या प्रीतीचा गंध
तुझ्याशिवाय जगणे नको मला
रुसू नकोस तू माझ्यावर असा
विनंती करते सख्या मी तुला
तुझ्याशिवाय जगणे नको मला
रुसू नकोस तू माझ्यावर असा
विनंती करते सख्या मी तुला
थांब रे जरा, ऐक ना माझं
चुकलं असेल माफ कर मला
विरहाची शिक्षा नको देऊस
मरेन तुझ्याशिवाय सांगते तुला
चुकलं असेल माफ कर मला
विरहाची शिक्षा नको देऊस
मरेन तुझ्याशिवाय सांगते तुला
तुझ्या प्रीतीची रे मोहोर
उमटवली तू माझ्या मनात
जा नाही भेटणार तुला कधी
नाही येणार कधीही स्वप्नात..
उमटवली तू माझ्या मनात
जा नाही भेटणार तुला कधी
नाही येणार कधीही स्वप्नात..
सौ. स्वाती पाटील
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा