जलद कथालेखन स्पर्धा नोव्हेंबर 2025
विषय - तोंड दाबून मुक्क्यांचा मार
विषय - तोंड दाबून मुक्क्यांचा मार
एसटीतलं भांडण
भाग -१
भाग -१
"अहो बाईसाहेब ,उठा ती माझी सीट आहे."भारती जरा आश्चर्य मिश्रित फणकार्यानेच म्हणाली.
ती बाई जवळजवळ भारतीच्या नवऱ्याच्या खांद्यावरच मान ठेवून झोपेचे नाटक करत होती.

"आता तर मी खिडकीतून बघितले ही बाई तुमच्या सोबत बोलत चांगली फिदीफिदी हसत होती. आणि मी गाडीत चढल्यावर आता झोपेचे नाटक करते आहे.नाटकी कुठली."
"तुमचे काय रिझर्वेशन आहे काय ? की तुम्ही खरेदी केली जागा?
वा रे वा !उठा म्हणे उठा.का उठू मी?"बाई जरा धीटाईनेच बोलत होती.
"अहो आम्ही नागपूर वरून बसलो आहोत इथे मी फक्त फ्रेश व्हायला म्हणून खाली उतरली होती तर त्या जागी तुम्ही येऊन बसल्या. म्हणजे खाली उतरणेही गुन्हा झालं का? उठा उठा माझी सीट आहे ती."भारती
ती बाई आणखीच मोकळी बसली आणि म्हणाली," नाही उठत काय कराल ?"

आता मात्र भारती पुरती वैतागली होती.
आता ती नवऱ्यावर चिडली.
"तुम्ही कसं काय बसू दिलत हो. मी फक्त पाच मिनिटांसाठी खाली उतरले होते."

"अगं त्याही नागपूरवरूनच बसल्यात. त्यांना सीट मिळाली नाही. इथवर उभ्या आल्यात. आता तू खाली उतरली होती म्हणून मी त्यांना म्हटले बसा पाच मिनिट पायाला तेवढाच आराम होतो."
ते शब्द ऐकले आणि भारती उद्वीग्न झाली.
"वा! फार उदार."
आता भारतीची जीभ आडवीतिडवी सुसाट पळत सुटली.तिचा वेग एसटीच्या वेगापेक्षाही जास्त होता.

"अहो बायको बसली होती ना शेजारी ?जेव्हा एकटे जाता तेव्हा तर काही मी पाहायला येत नाही.
तुम्ही शेजारी कुणाला बसवता ते.
ती समोर म्हातारी बाई उभी आहे तो म्हातारा माणूस उभा आहे त्यांची कणव नाही आली तुम्हाला हिचीच बरी आली."

सगळी एसटी तिने डोक्यावर घेतली होती. सगळे लोकं बिन पैशाचा तमाशा बघत होते.
कंडक्टर ही शांतपणे बघत होता.
ती बाई गालातल्या गालात गुलुगुलु हसत होती.

ते बघून भारतीचा पारा अधिकच चढला ती दोघांच्या मध्ये जाऊन बसत तिला ढकलत होती.
ती सुशिक्षित बाई जरा जास्तच लठ्ठ होती भारतीच्या धक्क्याने खाली पडली.

सगळ्या एसटी भर हशा पिकला.
आता ती पदर खोचून भांडायला तयार झाली कारण तिचा अपमान झाला होता ना इतक्या लोकांसमोर.
ती भारतीच्या नवऱ्याला म्हणाली,

"तुमची बायको बसली असताना तुम्ही कशाला मला बसवून घेतलेत? लंपट छाप पुरुष मेला. मला दुसरी सीट मिळाली असती ना. मला काय माहित ती तुमची बायको आहे म्हणून.
मला वाटले असेच बसवून घेतलेत तुम्ही कुणाला तरी शेजारी. ती आता इथे खाली उतरली म्हणून मला म्हणता आहात."

त्या दोघीही सुटल्या आणि टारगेट मात्र भारतीचा नवरा झाला.
भारती ने ही तोंड सुख नवऱ्यावरच घेतले आणि ती बाई ही तोंडाच्या आवडीने त्यालाच बोलत सुटली.
एसटीत बसलेली सगळी लोकही मनात येईल तसं त्यालाच बोलत होती.
तो बिचारा एवढेशे तोंड घेऊन सगळं ऐकत बसला. काय करणार ना दुसरा उपाय तरी काय होता त्याच्याकडे? करू गेलो काय अन उलटे झाले पाय अशी गत झाली होती त्याची.
तो त्या बाईला एवढे सुद्धा म्हणू शकला नाही की मी तुम्हाला पाच मिनिट फक्त बसा म्हटले होते.

कारण तिनेच त्याची इज्जत काढून टाकली होती.
भारतीचा नवरा 'तोंड दाबून मुक्क्यांचा मार' सहन करत होता.
पुढे अजून काय मजा घडते ते बघू पुढील भागात.
क्रमशः
बाकी पुढील भागात
भाग-२मधे
क्रमशः
बाकी पुढील भागात
भाग-२मधे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा