Login

एसटीतील भांडण भाग -२

बसमधील भांडणाच्या गमती जमती
जलद कथालेखन स्पर्धा नोव्हेंबर 2025
विषय - तोंड दाबून मुक्क्यांचा मार

एसटीतलं भांडण
भाग -२

ती बाई शेवटी उभ्याने प्रवास करत होती. सगळा अपमान गिळून.
गिळून कसला तिच्या मानसन्मानावर जणू पेट्रोल छिडकले गेले होते ते चांगलेच भडकले होते. त्याच्या माय, बाप ,बहीण,लेकरं सगळ्यांचा उद्धार करून झाला होता तिचा.

त्याने माणुसकीच्या नात्याने तिला पाच मिनिट बसायला जागा काय दिली तर ती हात पाय पसरायच्या तयारीत होती. त्याच्यावरच डाव उलटवून मोकळी झाली होती.

तेवढ्यात कंडक्टर बसमध्ये त्या स्टॉपवरून बसलेल्या प्रवाशांचे तिकीट काढण्यासाठी म्हणून उठले.

ही बया वाट पाहूनच होती. आपलं थुलथुलीत शरीर सांभाळत हुश्य.. करत ती लगेच त्या सीटवर स्थानापन्न झाली.
पण तरी तोंडाचा पट्टा मात्र अखंड चालूच होता.

कंडक्टरचे तिकीट फाडून झाले आणि ते आपल्या जागे जवळ आले. शेवटी कंडक्टरलाच म्हणावे लागले," मॅडम उठा"

"उठावेच लागते का ?खरेच थकली आहे हो मी"
"अहो ती कंडक्टरची सीट आहे माहिती आहे ना तुम्हाला?"

तोच शेजारी बसलेला माणूस बोलला," थोडा वेळ बसू देत हो थकल्या आहेत त्या."

"हो का ? थकल्या आहेत का? मग तुमची सीट द्या ना त्यांना. तिथे बसू द्या ना. तुम्ही उभे रहा. मला का शहाणपणा सांगता?"कंडक्टर चिडूनच बोलला.

आता तो माणूस कंडक्टरला बोलू लागला.
" वा म्हणजे फार हुशार दिसता तुम्ही? मला उठवून त्या बाईला तुम्ही तुमच्या जवळ बसवून घेणार. फार चांगले विचार आहेत तुमचे. बघा हो बाई बघा. कंडक्टर च काम असतं प्रवाशांना मदत करणं."

आता मात्र कंडक्टरचा तीळपापड झाला होता.

आता त्या दोघातच बाचाबाची सुरू झाली.

"वा!आलेत मोठे धुतल्या तांदळाचे.दुसर्याला ज्ञान पाजळायला. एवढा कळवळा आहे तर द्या ना आपली सीट तिला.
तुम्ही त्या बाईजवळ बसलात तर चालले? मी तर माझ्याच सीटवर बसायचे म्हणतोय ना?उगाच काहीपण आळ घ्यायचा.
अन् लक्षात ठेवा, आमचं रोजचंच काम आहे. आम्ही पारखतो चांगलं प्रवाशाला कोण कसा आहे ते.
उठा लवकर दोघांपैकी कोण उठते ते आपसात ठरवा माझी सीट मला द्या."

"काय तरी माणसासारखे माणसं एका बाईला उभे ठेवतात आणि स्वतः मस्त बसतात." ती तनतनत उठून उभी राहिली.

ती उभी राहत नाही तर बसला जोरदार हिसका बसला आणि बाजूच्या माणसाचा धक्का तिला लागला. मग काय ? त्याच्याशी तिची हुज्जत बाजी सुरू झाली.
तिला शांत बसवतच नाही की काय ? कळतच नव्हते.

तेवढ्यात....

पुढे काय मजा घडते ते बघू पुढील भागात.
क्रमशः
भाग-३मधे
©®शरयू महाजन
0

🎭 Series Post

View all