कृष्णविवर हा शब्द कथा -कादंबऱ्यांमध्ये दाट दुःखाची छाया या अर्थी येत असला तरी, प्रत्यक्षात काही कृष्णविवरे अंतराळात असतात. \"मिल्की रे गॅलेक्सी\" आपली आकाशगंगा. शास्त्रज्ञांच्या मते अशा कितीतरी आकाशगंगा विश्वात अस्तित्वात आहेत. अर्थात प्रचंड अंतरामुळे त्यांचा सखोल अभ्यास करणे शक्य झालेले नाही. अनेक ग्रहताऱ्यांची मिळून बनलेली आपली आकाशगंगा मुळात निर्माण कशी झाली? विश्वाच्या उत्पत्तीच्या काळात प्रचंड अग्निगोलापासून तुटून वेगळ होत वेगवेगळ्या आकारमानाचे आगीचे गोळे अंतराळात हळूहळू थंड होत गेले. वायूचे हे प्रचंड गोल अखेर ग्रहगोल आणि तारे बनले. लाखो वर्षांपूर्वी यांची उत्पत्ती झाली असून पुढील लाखो वर्षे ते अस्तित्वात राहणार आहेत.
आकाशातील मन भारून टाकणारे तारे म्हणजे नेमके काय? धूळ आणि हायड्रोजन वायूचे ढग हेच त्यांचे स्वरूप. प्रचंड उष्णतेमुळे हायड्रोजन वायू चमकतो. या चमकदार वायू गोलांनाच तारे म्हणतात. ताऱ्यांच्या सुरुवातीच्या अवस्थेला \"प्रोटोस्टार\" म्हणतात. प्रोटो म्हणजे सुरुवात किंवा पहिला. ही प्रोटो स्टार नंतर मोठे होत जातात. मोठे होण्याची अवस्था संपल्यानंतर त्यांना स्टार म्हणतात. वर्षानुवर्ष चमचमत राहणाऱ्या या तार्याचे आयुष्य त्यांच्या आकारमानावरंच अवलंबून असते.
मोठ्या ताऱ्यांच्या अंतर्भागात असलेल्या प्रचंड उष्णतेमुळे तिथे आर्यन ची निर्मिती होते . हे आर्यन एखाद्या स्पंच प्रमाणे काम करते आणि ताऱ्याची सर्व ऊर्जा शोषून घेते . काही वेळा या प्रक्रियेत जे मागे राहते , ते अंधारी गुहे सारखे असते. ही \"ब्लॅक होल्स\" म्हणजेच कृष्णविवरे. ही कृष्णविवरे एखाद्या प्रचंड व्हॅक्यूम क्लिनर प्रमाणे अंतराळात त्यांच्या संपर्कात येणारी प्रत्येक गोष्ट आणि प्रकाशही गिळंकृत करतात. अशी कितीतरी कृष्णविवरे अंतराळात विहरत असतात.
माहिती आणि फोटो - साभार गुगल
(वाचकहो तुम्हाला जर माझं लिखाण आवडत असेल तर मला फॉलो करा आणि आपली मत नक्की नोंदवा )
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा