Login

स्टॉक क्लिअरन्स सेल भाग 2

Stock
स्टॉक क्लिअरन्स सेल
भाग 2

तिच्या पर्स मध्ये किती पैसे असो त्याने असे चोरून बघणे तिला नाही पटले...

कोणाला ही नाही आवडणार...


ती आता त्याच्या कडे डोळे फाडून बघत होती तिला दाऊट होताच हा माझे पाकीट चोरून बघत असतोच..म्हणजे हा माझी पर्स बघत असतो तर...त्यातले पैसे ही बघत असतो तर...आता तर हद्द झाली ,मी माझे पाकीट कुठेही ठेवू ह्यांना कसे कळते.. किती नोटा ,किती सुट्टे हे तर जबर राखण करतात ,पाळत ठेवून असतात....आता पुन्हा जागा बदलावी लागणार म्हणजे

"तुम्हाला कसे माहिती ?? तुम्हाला कसे माहिती पडले..मी किती पैसे ठेवले आहे ते ???" ती आता जाब विचारत होती

"ते ,ते ,ते ते हे हे हे ,मी मी मी सहज बघितले होते काल त्यात हळूच पैसे टाकून तुला तुला सरप्राईज देऊ म्हणून पर्स उघडली होती ,तेव्हा दिसले मला..." तो घाबरत

"सरप्राईज देताय ,मला सरप्राईज देताय..? आणि तुम्ही सरप्राईज देताय.? होय..? कधी तरी मगितल्याशिवाय ही पैसे देत नाहीत आणि तुम्ही सरप्राईज देताय..? " ती रागात

"देत नाही का ग तुला सरप्राईज तुला कधीच...सांग सांग..!! दिलेच नाही का कधी सरप्राईज तुला सहज ,आठवून सांग..नीट आठवून सांग..." तो प्रेमात येऊन

"हो हो दिलेत ना अगदी खोटे ही नाही बोलणार पण दिले ते ही ते एक दोन रुपयांचे चिल्लहर दिलेत तर...किती मोठे मन करून द्यायचे तुम्ही...मग कुठे ते हजारदा ऐकवायचे मी दिले!! मी दिले म्हणून..उपकार तुमचे...माझ्यावर ते किती मोठे..." ती रागात होती पण सत्य हीच परिस्थिती होती ,तो आत्ता आत्ता कुठे पैसे देत होता..

"मला सांगा मी आता किती पैसे देऊ सरप्राईज म्हणून ,पण रागवू नकोस...मी लगेच देतो थांब..खूप मोठे मन आहे माझे...त्याची काय तू परीक्षा घेतेस..!! हे बघ घे पाचशे रुपये...खुशssss हो आता..." तो

'राहु द्या ,तुम्ही तुमचे इतर घर भरा.. भावाला ,अजून बहिणीला , भाच्याला, मित्राला पाठवा...त्यांच्या नजरेत महान व्हा...माझे मी बघून घेईल...पण पुन्हा माझ्या कडे किती पैसे असतात ,किती आहेत हे बघण्याची तसदी घेऊ नका...चोरून तर अजिबात तसदी घेऊ नका ,माझ्या नजरेतून पडू नका..!! " तिला त्याच्या ह्या वागण्याचा राग आला होता..त्याच्या कडे हात पसरवायला आता तिला आवडत नव्हते... जितके लक्ष त्याचे इतरांच्या गरजा भागवण्याकडे होते तितके बायकोकडे असले असते तर तिला पैसे वाचवण्यासाठी मैत्रिणीशी खोटे बोलावे लागले नसते... आहेत ते पैसे वाचवायचे असतात...तिला ही माहेरी वाटले कधी तर द्यावे वाटत असतात हे त्याच्या गावी कधी आलेच नाही..

"बरं माझी चूक झाली ,आता तरी सांग ना मी किती पैसे देऊ तुला...मी आज खुश आहे तू म्हणशील तितके पैसे देतो तुला...पण अशी नाराज नको होऊ माझ्यावर...मान्य आहे मी नको बघायला होती तुझी पर्स पण झाली चूक.."

"तू मोबाईल ही बघतोस ,मी तरी काही म्हणत नाही..तू पर्स ही बघतोस तरी मी काहीच बोलले नाही पण जेव्हा मी तुझा मोबाईल बघेल किंवा तुझी पर्स अशी चोरून बघेल तेव्हा तू काय करशील माहीत आहे ?? " ती

"मला नाही आवडणार ते साहजिकच आहे.." तो