स्टॉक क्लिअरन्स सेल
भाग 3
तिचा आता फार पार वाढला होता..
"तू एकदा म्हणालास की अश्या बायका नाही आवडत ज्या नवऱ्याच्या पाकिटातून चोरून पैसे घेतात...तेव्हापासून लक्षात ठेवले ह्यांना जी गोष्ट चोरी वाटते ती किती ही अडचण आली तरी करायची नाही...भीक मागून घेतल्या सारखे घ्यायचे पण हात पसरायची वेळ येऊ द्यायची नाही...अजून ही आपले स्थान त्यांच्या इतर नातेवाईकांइतके पोहचलेले नाही की ते जसे त्यांच्या गरजेला धावून जातात तसे माझ्यासाठी ही काही कर्तव्य आहे आपले पती म्हणून कळत नाही तोपर्यंत नाते सहज होणार नाही....तू निभाव जबाबदाऱ्या अनेकांच्या आता मला काही वाटत नाही...जे दुबळे नाहीत ,कमावते आहेत...मोठ्या पदावर आहेत ,तुझ्या पगारापेक्षा कैक पट कमावते आहे तू त्यांना मदत करतो ह्याचा अभिमान बाळगू की कीव करू असे वाटते...आणि मी पै पै जपते, स्वतःचे मन होऊन ही खर्च करत नाही...मैत्रिणी बाहेर होतील तितक्या बिनधास्तपणे खर्च करतात आणि मी मस्त कारण सांगते ,पैसे नाहीत पुन्हा कधी तरी बघू...तुम्ही या जाऊन...तुला काय माहिती की मी किती जपून खर्च करते..." तिने डोळ्यात पाणी आणत बोलणे थांबवले
हा नवरा नावाचा व्यक्ती इतर सगळी कडे पुरता पडतो ,खास करून त्यांच्या गरजा पूर्ण करतो जे त्याच्या गरजेला ही कामी पडत नसतात...सगळा खर्च ह्याने करण्याचा जसा मक्ता घेतला आहे... बाहेर गेला की ह्याने सगळ्यांच्या जेवणाचा खर्च करायचा ,चहा पाण्याचा खर्च...गाडी घेऊन गेला की त्याचे पेट्रोल ह्यानेच भरायचे...कुठे मुक्काम झाला की ह्याने मोठेपण मिरवायचे... चार भाऊ पण आई वडिलांच्या खर्च साठी पुण्याच्या नावाखाली पुढे यायचे हे नित्याचे... ते ही सहन करत...असू दे करेल तो आपले ही...पण एकदा सहज सेल लागला आहे हो त्या दुकानात जिथे मी मागच्या वेळी पैश्या अभावी साडी घेऊ शकले नाही तर आज ती साडी सेल मध्ये स्वस्ताता मिळत आहे....मला ती घ्यायची आहे...मला काही पैसे हवे आहेत, मला पैसे द्या ...ती प्रेमात त्याच्या जवळ येऊन म्हणाली होती..
तो लगेच म्हणाला ,पैश्याचे झाड लागले का माझ्याकडे..सतत सतत तेच पैसे पैसे...तू कमवून बघ किती कष्ट लागतात पैसे कमवायला..
तेव्हा तिला त्याने कसे झटकले होते ,तिचा हात खांद्यावर कसा दूर केला होता ते आठवले होते... आणि तेव्हा त्याचा बहिणीने पैसे मागितले होते ,दादा मेहुलला त्याची आवडती गाडी घ्यायची आहे ,तो धंदा करणार आहे म्हणतो तर त्या गाडीसाठी पैसे पाठव....
इकडे दादा लगेच पैसे घेऊन आला आणि बहिणीला लाख भर रुपये देऊन मोकळा झाला... जी बहीण हक्क आहे म्हणून सतत सतत पैसे असे घेऊन जात जणू तिची काही ठेव आहे..तिचे काही ह्याचा वर कर्ज आहे...
बहिणीला दिले त्याचे दुःख नाही पण तिला नेहमीच तू कमवून बघ कळेल तुला म्हणून बाजूला केले ह्याचे दुःख जास्त जिव्हारी लागले होते... तेव्हा एक ठरवले किती ही छोटी नौकरी असू दे आता घरात बसून अपमान करून घ्यायचा नाही...आपला फक्त आपल्या पैश्यावर हक्क आहे...नवऱ्याच्या पैश्यावर काडीचा ही हक्क नाही... तो हक्क त्याच्या माणसांचा...तिने दुसऱ्या दिवशी नौकरीसाठी शोध सुरू केला..
"मला नौकरी लागली आहे म्हणून तरी स्वाभिमान गहाण ठेवून तुझ्याकडे हात पसरत नाही ,पण म्हणून तुला काहीच हक्क नाही की तू माझ्या पर्स मध्ये माझ्या मागे ठेवलेले पैसे मोजत बसशील.." ती पुन्हा डोळे पुसत म्हणाली
"त्यात काय अग नवरा आहे ना मी तुझा इतका ही हक्क नाही का मला .?" तो
क्रमशः
,
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा