Login

स्टॉक क्लिअरन्स सेल भाग 4

Stock
स्टॉक क्लिअरन्स सेल
भाग 4

ती सहन करत होती ,कारण त्याच्या वागण्याने आता फरक पडत नव्हता...

"गमावला आहेस हक्क ,माझे खर्च मी करते माझी सोय माझ्या इच्छा मी पूर्ण करते तर तुझ्यासाठी तुझे ओझे मी कमी करते..तू जे खर्च कधी केलेस ते आता बोज कमी केलेत...म्हणजे तू तुझ्या इतर खर्चाला मोकळा सोडला आहे..जा ज्यांना ज्यांना तू हवा आहे स्वार्थासाठी त्यांचे खर्च भगवा...तुझे बाबा म्हणत होते माझ्या मुलीची कोणतीच हौस मौज झाली नाही कधी ती तिची हौस मौज कर...त्यांच्या मुलांना बाप नसल्यामुळे तू बापाचे सगळे कर्तव्य पार पाड... तिथे पुरता पड...कमी पडू देऊ नकोस...आई वडिलांना सुख दे...पुढे त्या भाच्याचे मुलं होतील त्यांचे ही कर्तव्य तू पार पाड हरकत नाही ..मी आता माझ्या साठी सक्षम आहे...आता तुझी गरज नाही ही वेळ आली आहे... मग म्हणू नकोस मी नवरा नाही का ?? माझा हक्क नाही का इतका ही..?"

त्याला समजत होते पण उमजत नव्हते, त्याने तिला सांगितले..."सगळ्यांच्या गरजा पूर्ण होताच मी तुझ्यासाठी आहेच..पण तू मला समजून घे..."

"तू त्यांच्या गरजा पूर्ण कर हरकत नाही ,पण मी मात्र फार तुझी मला मदत होईल याची जरा ही आशा बाळगणार नाही...तू येशील केव्हा जेव्हा तू थकलेला असशील आणि माझ्या शिवाय कोणी विचारणारे नसेल तेव्हा...पण तेव्हा माझी मानसिकता कशी असेल मला माहित नाही...सती असतात ही पण मी ह्या युगातील स्त्री आहे...मी स्वतःची पुन्हा परीक्षा घेणार नाही.."

तिला स्वाभिमान जास्त आवडला ,आता तो जपणे हेच उद्देश होता...नवऱ्याला जणू सामाजिक कार्य करण्यासाठी वाहून दिले होते तिने...कारण तिने किती ही हित सांगू देत त्यांचे वाद वाढत जात होते..

"किती किती बोलतेस तू ,चल एक संधी दे मी घेऊन देतो ती साडी जी तू मागितली होती.." तो

"नको तेव्हा ही ती माझ्या कुवती बाहेर होती आणि आता ती स्टॉक मध्ये नाही...ती अशीच कोणी माझ्या सारखीने सेलची वाट बघून बघून ,पैसे जमून जमून घेतली आहे....तू राहू दे येईल सेल तेव्हा बघेन..माझ्या हिमतीवर मी घेईल...तू मात्र त्याची काळजी कर ज्यांना तुझी गरज आहे... कोणाच्या हौस मौज मागे रहाता कामा नये.... बायको काय वाट बघेन...आधी घरचे खुश ठेव ते तुझे आद्य कर्तव्य आहे.... त्यांनी आता पाय धरले असेल तरी तू मात्र त्यांना आधार दे...पैसे असून ही पैसे नाहीत म्हणाऱ्याचे हप्ते फेड... तू तेच चांगल्या प्रकारे करू शकतो..."

"मी चुकलो ग ,पण तू सांभाळून घे "

"चूक दुरुस्त होत नाही तोपर्यंत माफी नाही..कारण मी महान नाही,माझ्या वाट्याला सगळा उरलेला स्टॉक असेल ,बाकी सगळे तुझे चांगले ते आयुष्य घेऊन मोकळे होतील..मग जे उरले ते माझे असेल "

"मला काही वेळ दे, त्यांचे सगळे सुरळीत होताच मी तुझ्यासाठी हजर असेल.."

"आता नकोच ,कारण मी माझ्या गरजा माझ्या पगारातून भागवते ,शिकले आहे मी...जमेन तशी आंनद स्वतःच्या हिमतीवर विकत घेईल...नवरा नावाचा माणूस आहे पण तो इतरांच्या सुखासाठी झिजत आहे ह्यात आंनद मानेंन मी...तू लढा दे...न भरणारे मन ,अतृप्त आत्मे तृप्त कर... तुझ्या माणसांना पुरे पुरे अपंग कर...घे सगळे ओझे तुझ्या खांद्यावर...पण मला माझी पायी चालू दे..."

किती अंतर कापलेले असतात बायकांनी स्वतःचे स्वतः...बऱ्याचदा नवरे त्यांच्या ह्या अंतर कापण्यात सोबत असत नाही..त्यांना वेगळ्या जबाबदाऱ्या निभावण्यात मोठेपण वाटत असते... ती काय ती वाट बघेल. जबाबदऱ्यांचा , स्टॉक संपला की येईल तो तिच्या वाटेवर तुझी साथ हवी मला ह्या वळणावर म्हणत...