Login

स्टॉक क्लिअरन्स सेल भाग 5

Stock
स्टॉक क्लिअरन्स सेल

भाग 5

त्याची धडपड इतरांचे मन जिंकण्यासाठी...

त्याने आज सकाळी बहिणीला फोन करून सांगितले ,आता तुझा मोठा मुलगा चांगला सक्षम झाला आहे ,तर इथून पुढे तुला लागणार खर्च ,तुझी आर्थिक अडचण त्याच्या कानावर घालत जा...त्यात माहेरातून हिस्सा घेतला आहेच तर आई वडिलांना ही काही दिवस तुझ्या कडे घेऊन जात जा...मी होती शक्य ती मदत केली आहे ,आता मला माझ्या घरातील सगळ्या अडचणी वेळीच दूर करायच्या आहेत...

"आता मला तुझा असा वेळ तुला द्यायचा आहे ,सुरुवात त्या तुला आवडलेल्या पैठणी साडी पासून करायची आहे...आणि ती सेल मधली साडी न घेता अगदी नवी कोरी घ्यायची आहे...तू हात ठेवशील ती घेऊन द्यायची आहे...."

"मी जोपर्यंत झालेल्या गोष्टी विसरून जात नाही तोपर्यंत मला कसलीच हाव नाही...कारण विसरणे सहज नाही " ती

त्याला आता सहज सुचले होते, तो तिच्या पाया जवळ बसला होता..आणि तिची माफी मागितली होती...तिच्या डोळ्यात भरून आलेले पाणी ओघळणार इतक्यात त्याने तिला मिठीत घेतले होते...

ती म्हणाली ,"पैठणी लाखो असतात पण निदान ती आपण तुला घेऊ अशीच म्हणणार जर तिला ते ही शब्दाच स्वप्न दाखवून प्रेमात बांधत नसेल तर तिच्या आयुष्यात त्याचे महत्व वाढणे शक्य नसते... त्याने तिला गृहीत धरावे ते ही सतत हे एका मर्यादेत, पण त्यापलीकडे ती गेली तर तिला परत घेऊन येणे शक्य नसते... तू मला वेळीच हात दिला आहेस ,नाहीतर मी ही त्या पलीकडे जाणार होते...जिथे तुझी काही एक गरज मला भासणार नव्हती अशी मनःस्थित होत चालली..."

तितक्यात सासरे बुवांचा फोन आला होता ,तिला दिसला तो त्यांचा फोन आहे..त्याने लगेच तिचा हात सोडून फोन घेतला

"बोला बाबा ,कशी आहे तब्येत तुमची..? सगळं ठीक आहे ना तुमचं..! पैसे पाठवून द्यायचे आहेत ना तुम्हाला काही, आहे माझ्या लक्षात... तीच तजबीज करत होतो येतील ते तुमच्या खात्यात..."

त्याने तिच्या नजरेला नजर मिळवण्याची ही हिम्मत दाखवली नाही..पण ती तिथून जात असतानाच लगेच बाबा तिकडून म्हणाले

"हम्मम्म पैसे नाही ते तर टाकच तू पण आपली ताई कधी कुठे फिरायला गेली नाही ,तिला तिच्या नवऱ्याने कधी नेली नाही...दुःखात आयुष्य गेले ,त्यात पाच मुलं त्यांचे खर्च...त्यात त्यांना आजारी पडल्यावर कुठे फिरायला जमले नाही...तुम्ही लोक सगळे जात असतात ,तुमच्या बायकांनी जग पाहिले तसे तिला ही दाखवा म्हणतो मी...तिला देव देव करायचे आहेत तर हे एक पुण्याचे काम कर, तिला मस्त तिकिटे काढून दे...सगळे देव करेन ती...त्यात उद्या आपण सगळे मिळून पंढरपूर गाणगापूर, करून येऊ तर भाऊ म्हणतो दादाच्या गाडीने जाऊन येऊ सगळे..."

इकडे हे ऐकून तर त्याचा आता पारा चढला होता, खरंच बायको म्हणते त्यात काही एक चुकीचे नाही ,बोट दिले की हात मागतात ,हात दिला की खांद्यावर बसतात ,आणि खांदा दिला की डोक्यावर बसतात..जरा ही मनाला खाही वाटत नाही ह्यांच्या...बायकोची तशी काय हौस केली नाही ,जग जितके हे फिरून आले इतके आम्ही ही फिरून आलो नाहीत...आज सांगून टाकावेस वाटते त्यांना असे त्याने मनोमन ठरवले..

"बोल दादा गप्प का ,दे गाडी पाठवून ,त्यात पेट्रोल भरून दे ,सोबत तुझा ड्रायव्हर दे..."

"बाबा आज सांगून टाकतो तुम्हाला ,तुमची सेवा हाच फक्त माझा धर्म माझे कर्तव्य आहे...त्यात बहिणीची हौस मौज तिची आवड, तिचे बाकी खर्च माझी जबाबदारी होती तिला गरज होती तोपर्यंत मी केलेच आहे...आणि मी ते चुकवले नाहीत...पण आता तिचे मुलं मस्त कमावते झाले आहेत ,तिला घरभाडे येते ,नवऱ्याची पेन्शन येते...मी तुम्हाला जे पैसे देतो ते तुम्ही तिला देतात ,किराणा भरला की अर्धा किराणा तुम्ही तिला देतात... सोन्याची अंगठी केली ,ती आजकाल दिसत नाही तुमच्या हातात ती तिला दिली मी काही ही बोललो नाही...मी वेगळे पैसे देत असतो...तुमचा दोघांच्या दवाखान्याच्या खर्चात इतर कोणी वाटेकरी होत नाही..तुम्हाला गाडी दिली मी ,त्यावर पेट्रोल खर्च...मोबाईल खर्च...हे मी बघतो...त्यात कधी कमी पडू दिले नाही...खायला कमी नाही...तरी एकदा ही तुम्ही विचारले नाही बायकोचे काही करतोस की नाही..? त्यात उलट तुम्हीच म्हणतात तुमच्या बायका जग फिरल्यात ,त्यांची हौस मौज होते...पण तुम्ही हे का विचार करत नाही...त्या त्यांची हौस मौज आता आता करत आहेत, त्या त्यांच्या पैशाने करत आहे ना की बापाच्या किंवा भावाच्या पैशाने करत आहेत....मी तिला जे काही करेन किंवा नाही करणार हे माझे कर्तव्य आहे...तुमची लेक एका मर्यादेत माझी जबाबदारी होती ,खरे तर तुम्ही बाप म्हणून तिची हौस मौज करायला हवी होती ,गरिबाला दिली आणि त्याने दारू सुरू केली ,होती नव्हती सगळी जमीन विकली...त्यात आमचा काय दोष...तुमच्या मनात येईल तेव्हा सगळ्यांचे करण्याची ही माझी जबाबदारी आहे म्हणून ओझं माझ्या डोक्यावर टाकून मोकळे झालात...आता इथून पुढे कोणी ही माझी जबाबदारी नसणार..भाऊला सांगा तुझा परिवार आहे तर तू गाडी घे ,पेट्रोल भर आणि जा ."

ती ऐकत होती ,आज जे बोलला ते खूप आधीच बोलायला हवे होते...आता उपयोग काय

तो फोन ठेऊन जरा जास्तच अस्वस्थ झाला होता...त्याची घुसमट होत होती ,त्यात कात्रीत सापडला होता ,त्याला ही वाटले हे खूप आधीच कळायला हवे होते...आता ह्यांच्या आनंदासाठी ते आपल्या आनंदावर डोळे ठेवतील आणि त्यांचे केलं आमचे नाही असे म्हणतील ते ही आपलेच वडील असे वाटले नव्हते... आता कळत होते वडील किती सहज आपल्या कडून ह्याचा त्याच्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडून घेत राहिले... पण वाटा मात्र न कर्त्या भावाला जास्तीचा देऊन मोकळे झाले...