कथा - ऑनलाईन भाग - 2
लेखक - प्रा.प्रमोद जगताप
लेखक - प्रा.प्रमोद जगताप
एक दिवस पराग नेहमी प्रमाणे संध्याच्या विचारात पूर्ण गडून गेला. आणि चुकून अवजड जॉब त्याच्या पायावर पडला. हे चंदून पाहिलं तेव्हा त्याला मदत करायला धावत आला. पायाच्या अंगठ्यातून वाहणारं रक्त, नखाचा झालेला चुरा याच्या होणाऱ्या वेदना परागला जाणवत होत्या, पण चेहऱ्यावर कोणताही दुःखाचा भाव दिसत नव्हता. हे पाहून चंदू आश्चर्याने परागकडे पाहू लागला. मनातली प्रत्येक गोष्ट चंदूला सांगणारा पराग हल्ली शांत शांत असायचा.
“पराग तू लका आता लय बदलाईस सारखा शांत असतोस, काय झालं ते तरी सांग?”
न राहून चंदून विचारलं. चंदूचा असा प्रश्न परागच्या मनाला छळू लागला होता. काय उत्तर द्यायचं.? याला काय वाटेल.? संध्या कोण म्हणून विचारलं तर पुढं काय सांगायचं.? या प्रश्नांची वावटळ पुन्हा गोल फिरू लागली. पण शांत राहिल्यावर जास्तच गोंधळ उडेल. हे लक्षात आल्यावर तो जरा तोंड वाकडे करून खाली बसला. आसपासच्या मशीनरीचा आवाज, कामगारांच्या हलचाली या गोष्टी त्याच्या विचारात अडथळा अणू पाहत होत्या.
चंदू तसाच उत्तराच्या प्रतिक्षेत परागकडे एकटक पाहत होता. परागने उत्तर देण्यासाठी केलेला केविलवाणा प्रयत्न, आणि उत्तर द्यायला झालेला उशीर चंदूलाच आता गंभीर वाटू लागला होता. परागच्या बाबतीत खूपच गंभीर घटना घडलीय, आणि तो आपल्यापासून काहीतरी लपतोय. हे हळूहळू चंदून जाणलं होत. या मागचं सत्य जाणून घेऊन त्याला धीर द्यायला पाहिजे हे त्याने मनोमन ठरवलं. एवढा हासरा, तोंडभरून बोलणारा, सतत काहीही विनोद करून हासवणारा पराग हल्ली अस्वस्थ का असतो. नक्की काय झालंय.? हा विचार चंदूची पाठ सोडत नव्हता.
तेवढ्यात जेवणाची सुट्टी झाली आणि कामगारांचा लोंढा कॅन्टीनकडे वळला. तरी पराग आपल्या जागेवर बसून होता. थोड्या वेळाने गार पाण्यानी तोंड धुवत त्याने रूमालाने तोंड पूसत स्वतःला आरशात पाहिलं. हरवून गेलेला उत्साह, चेहऱ्यावर उमटलेल्या अस्वस्थ रेषा, पाण्याने भरलेले डोळे, त्यालाच आता छळत होते. यावर नक्की काय करावं मात्र काहीच कळण्याचा मार्ग नव्हता. प्रेम ही भावनाच अशी स्वतःला खूप चांगली वाटतं असली, तरी ती दुसऱ्याला ती कधीच चांगली वाटतं नाही. मग उगाचच साधूचा आव आणून बोलणारे डिवचत राहतात.
खूपच वेड्यासारखं वागतोय का आपण.? काय चुकत तर नाही ना आपलं.? अशा प्रश्नांनी मनाला विळखा घालायला सुरूवात झाली. मनाची अवस्था त्याला बी.ए.च्या पहिल्या वर्षाच्या मराठीतील कथारंग मधल्या ‘राधी’ कथेत कधी घेऊन गेली. हे त्याला ही काहीच कळलं नाही. राधी कथेतली राधी डोळ्यासमोर फिरू लागली. ‘लेखक जी.ए.
कुलकर्णी’ यांनी रंगवलेली राधी ही नायिका आणि तिच्याकडे राखायला ठेवलेले छोटे कुत्र्याचे पिल्लू ही दोन्ही पात्र त्याला आता त्याचीच वाटू लागली होती.
संध्यावर जडलेला त्याचा जीव त्याला एकटा राहू देत नव्हता.
“जिवंत गोष्टीला जीव लावून गोत्यात पडू नये कधी माणसानं !”
ही ओळ राधी कथेतली त्याला आठवली आणि तो रडू लागलो. तेवढयात चंदू आला म्हणून पुन्हा तोंड धुवून रुमालाने पुसू लागला.
“चल रे जेवायला आज काय उपास हाय का.?”
अस म्हणून चंदू परागला कॅन्टीनच्या दिशेने घेऊन गेला. आता चंदूला त्याच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीच लागणार पण कशी या विचारात खुर्चीवर जाऊन बसला. आता जेवताना तरी काही बोलेल म्हणून चंदून दोन ताटे बनवून आणली. चंदूने आणलेलं जेवणाचं ताट पाहून परागला खूपच अस्वस्थ वाटू लागलं. एक दोन घास घशातून उतरत नाही तोपर्यंतच चंदूने परागला प्रश्न केला.
“पराग काय झालंय ते तरी सांग.?”
परागच्या हातातला घास हातातच राहिला. पराग काही तरी सांगेल अशा नजनेनं पाहत असणारा चंदू एकाएकी शांत झाला. परागच्या डोळ्यांतलं पाणी पाहून. चंदू काहीतरी बोलणार तेवढयात परागचा मोबाईल वाजू लागला.
“तेरे खयाल में ऽऽऽ तेरे ही याद में ऽऽऽ डुबा रहा जानेमन... ¶
तुज को पता नही तुज को खता नही चाहे तुझे कितना मन...¶”
ही मोबाईलची रिंग कॅन्टीन मध्ये घुमू लागली. अर्ध्यातच रिंग कट करून पराग मोबाईलवर डोळे पुसत बोलू लागला.
“हॅलो पराग कसा आहेस रे ? सॉरी यार तुला दोन दिवस कॉल करता आला नाही.”
हे संध्याचे शब्द ऐकून पराग अधिकच रडू लागला. स्वतःला सावरतच अघाशा सारखा बोलू लागला.
“मी बरा आहे ! तू कशी हायस ? खूप त्रास झाला दोन दिवस; माझं कुठंच लक्ष लागतं नव्हतं. का ? अशी वागलीस !”
असं बोलून त्यान सुस्कारा सोडला. आपण चंदूसमोर असताना संध्याशी बोलतोय. हे तो विसरूनच गेला होता. चंदू मात्र शांतपणे बोलण ऐकत होता. संध्याच्याही आवाजात काहीच त्राण उरला नव्हता. पराग तिला समजावत होता तरीही ती रडतच होती. हीच ती संध्या जिच्या विषयी चंदूला काय सांगायचं तो प्रश्न आजपर्यंत परागच्या मनात घुटमळत होता. फेसबुकच्या आभासी जगात भेटलेली संध्या परागपेक्षा सात वर्षाने मोठी होती. पण प्रेमाला वयाचं बंधन नसतं ते कधीही, कुणावरही होऊ शकतं. तसंच काही संध्याच्या बाबतीत घडलं होतं. तिला समजून घेणारा, तिचं दुःख हलकं करणारा, जिवाला जीव लावणारा पराग तिला फेसबुकच्या आभासी जगात सापडला होता. पतीच्या नोकरी निमित्तानं ती मुंबईत राहत होती.
.
.
.
क्रमशः
.भेटूयात पुढील भागात
©®प्रा.प्रमोद जगताप फलटणकर
संवाद - 8554857252

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा