कथामालिका भाग - 3
कथा - ऑनलाईन
लेखक - प्रा. प्रमोद जगताप
कथा - ऑनलाईन
लेखक - प्रा. प्रमोद जगताप
मुंबईत स्थित असणाऱ्या विदेशी कंपनीत मॅनेजर पदावर काम करणारा अनुराग तिचा जोडीदार होता; पण शिप्टमध्ये कामाचा वाढता ताण व मनेजर पदाची जबाबदारी पार पाडताना संध्याला वेळ द्यायला तो कमी पडायचा. अनुरागला रात्रपाळी सुरू झाली की, तिला घरात एकटं एकटं वाटायचं. सकाळी मुलांना शाळेत सोडून दिवसभर ती खाजगी ऑफिसात काम करत होती. एक मुलगी, एक मुलगा, ती आणि तिचा नवरा एवढंच तिचं विश्व होतं. ओव्हर टाईम काम करून पैशाच्या पाठीमागे धावणारा नवरा तिला दिसत होता. पण तिच्या मनाचीअवस्था समजून घेण्याचा प्रयत्न त्याने कधीच केला नाही. असा आरोप ती परागशी बोलताना ती वारंवार करायची. स्त्री मनाच्या अव्यक्त भावना तिच्या अस्वस्थ वागण्यातून, बोलण्यातून जाणवत राहायच्या. कोकणातलं माहेर पण कधी सारखं जाणं येणं नसायचं. सासू - सासरे ही गावाकडेच राहायचे. त्यामुळं
संध्याचं जीवन बंदिस्त भिंतीत कोंडल जात होतं. पण पराग भेटल्यापासून तिचं मन जरा हलकं होत होतं. हे तिनं दोन तीनदा त्याला बोलून ही दाखवलं होतं. रात्र-रात्र ऑनलाईन राहून मेसेजने तिच्या मनाची तगमग दूर करत असताना; मेसेजचा जोर आणि शाब्दिक शृंगार काही वेळा खूपच टोकाला जात होता. कल्पकतेच्या जोरावर मनतृप्त होईपर्यत चाटींग काही थांबत नव्हतं. परागची दुनिया ही आता तिच्यातच गुंतत चालली होती. संध्या सोबत बोलताना वाटणारे आकर्षक भावना अधिकच तीव्र होत जायच्या. या सा-या घटनांचा पाढा चंदूला कसा सांगायचा हा प्रश्न परागला पुन्हा पुन्हा सतावू लागला होता. संध्याचा फोन कट झालेला परागला लक्षात ही आला नाही. तो तसाच मोबाईल कानाला लावून विचारात गढून गेला. चंदू परागच्या खांद्यावर हात टाकून बोलला.
“पराग चल जेव लवकर जेवणाची वेळ संपत आलीय, कॅन्टीन पण बंद होईल थोड्याच वेळात.”
पराग आता अपराधी भावनेनं खाली बघून घास चावू लागला. परागच्या मनाची हालचाल ब-यापैकी चंदूच्या लक्षात येत होती. आता यावेळी परागला काही बोलायला नको नाहीतर न जेवताच ताठावरून उठायचा. या विचारानं तो ही शांत जेवू लागला. परागला शून्य नजरेतून पाहत राहिला. रागच्या पाणीदार डोळ्यांत परागच्या वागण्याचं कारण...
अखेरीस कामाचा महिना भरला आणि परागच्या हातात पगार पडला. या आठवड्यात संध्याला भेटायला जायचंय या विचारानं पराग जरा आनंदात वागू लागला. जिवाला जीव लागल्यावर भेटीची ओढ ही लागतेच. आणि एकदाची भेट झाल्याशिवाय जीव काय भांड्यात पडत नाही. हीच गत परागची झाली होती. या आठवड्यात चार दिवसाची सुट्टी टाकून मुंबई गाठायची; म्हणून सुट्टीचा अर्ज घाईघाईने लिहून त्याने कंपनीच्या ऑफिसात दिला. सलग चार दिवस सुट्टी काही मिळाली नाही. त्यामुळे दोन दिवसाच्या सुट्टीतच काही ते सगळं म्हणून तो घराकडे निघाला. थोडी खुशी थोडी गम अशा अवस्थेत दुपारी उनाच्या रकातच घरी आला. गाडीवरनं उतरून घरात जायच्या आधीच दारात वाळायला घातलेली कपडे इस्त्रीसाठी घरात घेऊन गेला. कोपऱ्यात ठेवलेली इस्त्री जोडून गरम होईपर्यत शर्टवर पाणी मारत मारत गाण गुनगुनू लागला. तेवढयातच...
“क्या ? बात है बाबू ! आज बहोत खूश लगते हो !”
हा शेजारच्या सायरा भाभीचा आवाज ऐकू आला. सायरा भाभी परागच्या बाजूलाच राहायच्या. अंगात घट्ट पंजाबी ड्रेस, गो-या गालावर नाजूक खळी, लालबुंद ओठ, काळेभोर केस आणि डोळ्यांत सुरमा घातल्यानं त्या सौदंर्याने अधिकच खुलून दिसायच्या. या सौदंर्यानं परागला अनेकदा आकर्षित केलं होतं.
“कुछ नही भाभी ! बस ऐसे ही।“
अस बोलत परागने उत्तर टाळलं खरं पण त्याच्या चेहऱ्यावरच्या बोलक्या रेषा वाचायला त्यांना वेळ लागला नाही.
“कुछ तो गडबड है दया !”
असा फिल्मी डायलॉग म्हणत त्या हसत माघारी फिरल्या. परागने आपले दोन तीन ड्रेस इस्त्री करून कपाटात ठेवून दिले. उन्हाळ्याचा दिवस मोठा, लवकर काय मावळत न्हाई तेव्हा चंदूला जरा भेटून आलं म्हणजी बरं. या विचारातच गाडीला किक मारून चंदूच्या घराकडंचा रस्ता धरला. चंदू गावापासून जवळच्याच वस्तीवर रानात राहत होता.
जाताना एक एक खड्डा चुकवत रस्ता मागं टाकत पराग मनालाच बोलू लागला.
“आयला रस्ता गुगलच्या मॅपवर आला खरा. पण आपल्या गावातल्या रस्त्याचं खड्डं काय बुजणात. रस्त्याच्या सपनात तरी कधी डांबार येत का ? नाही कुणास ठाऊक ! नुसताच फुफाटा. आलं एकदाच चंद्याचं घर.”
अस म्हणत गाडीच स्टॅड लावत पराग मनालाच पुटपुटला. चंदू बाहेरच गुरांनला वैरण टाकत व्हता. परागला आलेलं बघून चंदून गोट्यातनच आवाज दिला.
“का रं ! काय झालं.? सकाळी कंपनीच्या गेटमध्ये दिसला पण आत नाही आला त्ये?”
खरं कारण काय सांगायचं याच इचारात पराग दारातल्या खाटेवर जाऊन बसला.
“अरं चंद्या दोन दिवसाची सुट्टी घेतलीय मामाकडं जायचंय कामानिमित्तानं.”
त्याच बोलण मध्येच थांबवत...
हा !आलय माझ्या ध्यानात ; सुमडीत कुंबडी चाललीय सगळी,.”
दात इचकत चंदू बोलला.
आरं तसं काय न्हाई रं तुझं आपलं काहीतरीच” अस पराग म्हणताच...
“समरीलाच सून करायची म्हणत होती. आय तुझी परवा दिवशी रानात.”
चंदूच्या आईन वरवरचा खुलासा केला. समरी मोठ्या मामाची पोरगी. आता बारावीत शिकत होती. ती मोठी झाल्यापासून परागलाच द्यायची म्हणून मामानं बी ठरवलं होतं; तेव्हा चर्चा तर होणारच होती. कंपनीतल्या दिवसभराच्या गप्पाटप्पा करून अंधार पडायला लागला म्हणून परागनं आपला मोर्चा घराकडं वळावला. गावात गाडी शिरणार तेवढयात त्याचा मोबाईची रिंग वाजायला लागली. गाडी थांबवून फोन घेतला. तसा नेहमी चालू गाडीवरच फोन घ्यायचा, पण आज गावात आत जावून बोलण्यापेक्षा इथच काय ते बोलून घेऊ म्हणून गाडी थांबवून फोनवर बोलण्याचा नियम पहिल्यांदा पाळला गेला.
.
.
.
क्रमशः
भेटूयात पुढील भागात गुरुवारी

@प्रा.प्रमोद जगताप फलटणकर
संवाद - 8554857252
संवाद - 8554857252
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा