शीर्षक- लक्ष्य भाग २

Story About Courageous Boy
उडण्याचे बळ

शीर्षक-लक्ष्य भाग २


संध्याकाळची वेळ.... सूर्य अस्ताला चाललेला... अशावेळी अनुराधाताई गच्चावर शांततेने फेऱ्या मारायच्या. त्यांना ही सांजवेळी खूप आवडायची.
नोकरीच्या धावपळीमुळे त्यांना अशा सांजवेळीचा उपभोग घेता येत नसायचा. त्यामुळे त्या सांजवेळी आवर्जून गच्चावर जाऊन बसायच्या. सोबत मिस्टरांसोबत गप्पा.... वेळ कसा निघून जायचा कळायचं सुद्धा नाही.
एके दिवशी गच्चावर, अशाच मिस्टर अँड सोबत गप्पा मारीत असताना, दिवाकर धापा टाकीत, पायऱ्या झरझर वर चढून त्यांच्या पुढ्यात येऊन उभा राहिला. अनुराधाताई म्हणाल्या, काय झालं दिवाकर? तू असा घाबरलेला का दिसतोस? काय झालं? तो सायकल दामटवत आला असावा, हे सहज लक्षात येत होतं. कारण त्याचा शर्ट घामानं चिप झालेला होता. एकीकडे तो आपला चेहरा खसा खसा पुसत होता. आणि दुसरीकडे खूप उत्तेजित होऊन काही सांगू पाहत होता...

मावशी! दोन दिवसापूर्वी माझ्या गावाकडून फोन आला, की तू लवकर गावात ये. मी शाळेत न जाता गावाला पोहोचलो. तर माझ्यासमोर घडलेलं फारच धक्कादायक होतं. आणि तो रडायला लागला. त्याच्या तोंडून शब्द फुटेना.... अनुराधाताईंनी त्याला पाणी प्यायला दिले. थोडा वेळ शांत झाल्यावर तो पुन्हा सांगू लागला. मावशी! माझी लहान बहिण देवा घरी गेली हो..... ताईंना व मिस्टरांना धक्काच बसला. कशी काय? सांगशील की नाही....

अहो! ती व तिची मैत्रीण गावाकडच्या नदीत कपडे धुवायला गेल्या .त्यात आधी तिची मैत्रीण पाय घसरून नदीत पात्रातल्या खोल खड्ड्यात, की जो रेती उपसून तयार झालेला होता, त्यात जाऊन अडकली. तिचा हात हातात घेत, वर काढत असताना ही सुद्धा त्या खड्ड्यात जाऊन अडकली.
दोघीही घरी न आल्यामुळे, गावातल्या लोकांनी नदीवर जाऊन बघितले. तर त्यांचे कपडे धुण्याचे साहित्य तेथेच होते. त्यावरून त्या तिथेच अडकलेल्या आहेत, असं कळलं. व पोलीस आले. गोता खोऱ्याने दोघींनाही बाहेर काढलं. तर पाणी, नाका तोंडात गेल्यामुळे त्यांचा जीव गेला होता. मी तिला शहरात आणून खूप शिकविणार होतो.

तो खूप रडायला लागला.... मी माझ्या शिक्षकांना फोन केला. तुम्हालाही फोन करणार होतो. पण मी एवढ्या गडबडीत होतो, की आताही मला काही सुचेनासे झाले आहे. तुम्हाला प्रत्यक्ष भेटून माझे मन हलके करण्यासाठी आलेलो आहे. मी पुन्हा गावात जातो. आजी एकटीच गावात आहे. तिला तिचा मुलगा, नंतर सून, व आता नात गेलेली... तिच्यावर दुःखाचा डोंगरच कोसळलेला आहे. तिचे सांत्वन करायला गावकऱ्यांचे शब्द सुद्धा अपुरे पडत आहेत.

माझ्या बहिणीला मी माया नाही देऊ शकलो. तिला एवढ्या लहान वयात, की जिचे खेळण्याबागडण्याचे दिवस होते, ती दादा दादा करीत मला बिलगायची. मी शहरात निघालो की, मुकाट्याने आजी जवळ राहायची. मी लवकरच तिच्या शिक्षणासाठी तिला येथे आणणार होतो.

तो खूप अस्वस्थ भावनीक झालेला पाहून, ताईंच्या सुद्धा डोळ्यात पाणी आले. परंतु त्याला सांभाळून घेणे गरजेचे होते. त्याचे तरी वय काय... आता सध्याच तो दहावीतच होता. या वयात त्याच्या वर एवढी संकटं कोसळली होती.
खरंच नियती किती निष्ठूर असते, हे दिवाकरच्या नशिबावरून कळले होते. त्याच्या मनाला किती धक्का बसला याची कल्पनाही करवत नव्हती... पण नियतीपुढे कुणाचंच चालत नाही.
मावशी, मी जातो आता,माझ्या रूमवर .ताई म्हणाल्या, थांब दिवाकर. सध्या जाण्याची घाई करू नको. आज रात्रभर येथेच थांब. उद्या सकाळी तू गावाला जा. आजीचे सांत्वन कर. आता झालेली गोष्ट परत येत नाही. नशिबाचा खेळ सारा.... दिवाकर रात्रभर ताईकडे थांबला. त्यांनी त्याला प्रेमाने जेऊ घातलं. त्याचं कशातच मन लागेना. वडील, आई, बहिण यांना गमावलेलं त्यांने प्रत्यक्ष बघितलेलं होतं .ताईंनी त्याला रात्री खूप समजावून सांगितले.

बरं, दिवाकर.... तुझ्यापुढे आता तुझं पूर्ण आयुष्य आहे. तुला आईची इच्छा पूर्ण करायची आहे. त्यासाठी तुला तुझे मन घट्ट करावे लागेल. आता तुझा भूतकाळ तुला विसरावाच लागेल. त्यासाठी तू शांत रहा. आम्ही आहोत तुझ्या पाठीशी. तुझी स्वप्न पूर्ण झाल्याखेरीज मी सुद्धा डोळे मिटणार नाही बघ! दिवाकर सकाळी त्याच्या रूमवर गेला.

व नंतर गावाला आजीची खबरबात घ्यायला खेड्यावर गेला. मी सांभाळू शकले नाही माझ्या नातीला. आजी स्वतःलाच दोष देत होती. नदीवर दोघी गेल्या तवा सांगितलं बी नाही...... त्या पोरीची आई सुद्धा तिच्या कर्माला दोष देत होती. नदीतून वाळू उपसणारे मात्र नामनिराळेच होते.


दिवाकरच्या आयुष्याला कशी कलाटणी मिळते.... पाहूया पुढच्या भागात


छाया राऊत बर्वे अमरावती

८३९००८६९१७