Login

तुझ्या माझ्या प्रेमाची गोष्ट♥️

दोघांच्या प्रेमाची गोष्ट....
कथेच शिर्षक आहे....
तुझ्या माझ्या प्रेमाची गोष्ट♥️


वाचून अचंबित व्हायला झालं का? पण कस आहे ना...काही वेळा एकत्र  सोबत असून नसल्या सारखे आणि काही वेळा एकत्र सोबत नसून खूप जवळ असतो...!! हे फिलिंग काही वेगळच असत ना?
असच होत त्यांचं....


प्रत्येक वेळेला आपण म्हणतच असतो की एका नाण्याला या दोन बाजू असतात ते आपण दोन्ही बघाव्यात तसंच प्रत्येक गोष्टीमध्ये किंवा प्रत्येक परिस्थितीमध्ये दोन बाजू असतातच तसेच काहीस इथे ही होतं


आज ती स्वतःमध्येच रमून जाऊन एका गार्डनमध्ये मोकळ्या बेंच वरती येऊन बसली होती अर्थात त्याच्या आणि तिच्या प्रेमाचा साक्षीदार तो बेंच म्हणजेच बाकड आणि ते गार्डन होतं


त्या पाकळ्या वरती बसून ती त्यांचे आधीचे क्षण आठवत होते त्यामध्ये त्या दोघांचं बोलणं एकमेकांसोबत झालेली नजरा नजर एकमेकांना झालेला अलगद स्पर्श तर त्या गोष्टी तिला अगदी डोळ्यासमोरच दिसत होत्या अर्थात त्या जाणवतही होत्या आधीचा काळ असा होता म्हणजे काळ असं नाही पण आधीचा त्यांचा वेळ असा होता की दोघे एकमेकांच्या दूर असायचे फार भेटायचं नाही पण ज्यावेळेला भेटायचे त्यावेळेला अगदी न बोलता ही खूप काही बोलून जायचे या सगळ्या गोष्टी आपोआप व्हायच्या आणि त्या वेळेला ओढ मात्र भेटीची आणि त्या स्पर्शाची असायची


किती वेडे होतो ना पण त्या वेळेला इतकं भारी आयुष्य चाललं होतं न बोलता सगळं काही समजत होतं एकमेकांच्या मनातले कळत होतं पण तरी देखील टाळायला या सगळ्या गोष्टींसाठी मन म्हणून इतरांपेक्षा आपल्या आयुष्यात भारी होतं आपल्याला असा जोडीदार मिळाला आहे की तो आपलं बोलणं झालं नाही तरी देखील मनात काय चालू आहे किंवा ज्या वेळेला गरज असेल त्यावेळेला हेल्प करायचं आणि आपल मन मात्र असं म्हणत असायचं की आपल्याला वेळ कधी मिळणार आपलं बोलणं कधी होणार असं नव्हतं की एकमेकांना समजून घेत नव्हतं पण तरी देखील काहीतरी वेगळंच होतं आणि आत्ता असं म्हणत ती स्वतःशीच हसली


कारण आत्ताच चित्र काही वेगळंच होतं त्यावेळेला ते दूर असूनही जवळ होते एकमेकांच्या समोर राहण्याची असण्याची त्यांना गरज वाटत नव्हती हा अगदीच असह्य झालं तरी देखील ते तेवढे सहन करू शकत होते पण आता समोरासमोर असूनही एकमेकांसाठी वेळ नव्हता अर्थात तो काढला तरी देता येत नव्हता काही ना तरी काम असायचे ते तिच्या कामात आणि तो त्याच्या कामात त्यामुळे समोरासमोर असून बोलणे व्हायचंच नाही


असं म्हणतात की लग्न झाल्यानंतर एकमेकांना भेटण्यासाठी किंवा बाकी सगळ्या गोष्टींसाठी वेळ काळ या गोष्टी बघाव्या लागत नाहीत आपण सहज काही करू शकतो पण यांना मात्र  समजलं होत की इथे देखील काही मर्यादा असतात जबाबदाऱ्या असतात त्या आपल्याला कोणतेही कारण किंवा एक्सस्क्यूज न देता पूर्ण करायच्या असतात आणि वेळ मिळत नाही म्हणून तक्रार करण्यापेक्षा आपल्याला जो वेळ मिळाला आहे तोच वेळ कसा छान जाईल आणि अविस्मरणीय क्षण होईल हे पहायचं असत... आणि ते खरचं तस करत होते


पण आज तिला पुन्हा जुने दिवस आठवत होते आणि त्यात ती रमून जात होती.... पण वास्तवाची जाणीव हवीच ना? तशी तिलाही झाली आणि अचानक ती भानावर आली....


खरच आपण आता जो काही विचार करतोय तसं त्यालाही वाटत असेल का तसं तीच्याही मनात नकळत आलं आणि अस क्षणभर तिच्या मनात विचार येऊन गेला आणि क्षणभर काय झाल हे तीच तिला कळतच नाही  चमकली ती आपल्याच विचारांच्या वर पण खूप दिवसांनी तिला मनात काहीतरी वाटलं होतं


आणि इतक्यात तिचा फोन वाजला अर्थात हा फोन कधीही वाजायचा आणि आता तिला  या सगळ्या गोष्टीची सवय ही झाली होती


त्या फोनवरचं नाव पाहून तिला फार काही धक्का बसला नाही पण मनामध्ये एक सुखद आनंद नक्कीच मिळाला होता


आणि अचानक तिच्या हृदयात संगीत वाजू लागलं... मनात त्या ओळी आठवू लागल्या आणि तिच्या ओठी या ओळी तरळून आल्या देखील,

का कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे...
उमलती कशा धुंद भावना, अल्लद वाटे कसे...
बंध जुळती हे प्रीतीचे, गोड नाते हे जन्मांतरीचे....


अर्थातच फोनवर असणारी व्यक्ती तिच्यासाठी खूपच पजेसिव्ह होती....पण त्याच प्रेम,काळजी हे अर्थात तिच्यासाठी कायम असणारी एक सुखद पर्वणी होती....नात्यात दुरावा, रुसवा- फुगवा येत असतोच पण तरी पण नात टिकण महत्वाचं असत.....


नदीत किंवा सागरात वादळ उठत....पण तरी सुद्धा नात्याची होडी किंवा नाव किनाऱ्या पर्यंत पोहचण महत्वाचं.... असच काहीस त्यांच्या बाबतीत होत बर का.... दोघे मेड फॉर इचं आदर होते.... अशी होती ह्यांच्या प्रेमाची गोष्ट.... ज्यात दोघे अगदी एकमेकांच्या साथीने एकत्र होते आणि सोबत ही होते.... अगदी सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत....

©®Aavni
0

🎭 Series Post

View all