विषयः स्त्रीला समजून घेणं खरच कठीण असतं का हो....
राज्यस्तरीय लघुकथा स्पर्धा..
कथाः
दुपारचा एक वाजुन गेला होता. नेहमीप्रमाणे ऑफिसमधल्या सहकाऱ्यांनी जेवणाची आठवण केली तसा टेबलावरील फाईल्सचा ढिग नीटनेटका करून टिफिनकडे वळलो. जेवण उरकून ५-१० मिनिटं सहका-यांशी गप्पा मारून पुन्हा फाईल्सचा निपटारा करण्यासाठी टेबलाकडे मोर्चा वळविला. इतक्यात माझा सहकारी सुनील म्हणाला,
"साहेब, आज फोन आला नाही. मी ही थोड्या आश्चर्याने मोबाईल पाहीला अन् लक्षात आलं. अरे, खरंच आज वेळ उलटून गेली तरी कसा फोन आला नाही. तशी तिची फोनची नेहमीची वेळ आज जरा चुकलेलीच. अन्यथा ठरलेल्या वेळी तिचा फोन यायचाच अन् एकच प्रश्न, "जेवलात का?" मी तिला फोन केला. ".हँलो.."
तिकडून "हां बोला"
"अगं, काही नाही तुझा आज फोन नाही आला म्हणून"
"अहो आज तुमच्या टिफिनपासून सुरु झालेली काम अद्यापही संपलेली नाहीत"
मला थोडं नवल वाटलं पण तिच्या आवाजातील क्षीणता ऐकून खरंच ती दमलेली वाटली. मी ठिकाय पण तू जेवलीस का? एवढं विचारुन बरयं मी येईन संध्याकाळी लवकर असं म्हणून फोन बंद केला अन् तिच्याच विचारात गढून गेलो. ती माझी सहचारिणी, पत्नी.
महाविद्यालयीन जीवनात अनेक मित्रांना/ मैत्रीणींना कधी कधी अचानक घरी घेऊन जायचो. मग नाष्ट्यापासून ते जेवणापर्यंत सर्व आवडीचे पदार्थ यथासांग आणि न कंटाळता आई करून वाढायची. आमच्या या मस्तीखोर कंपूची सर्व आवड आई पुरवत रहायची आणि आम्ही त्यावर यथेच्छ ताव मारत रहायचो. तरीपण आई म्हणायची, "आणखी घ्या रे पोरांनो अगदी पोटभर खा." इकडे आमची पोटं तुडुंब व्हायची. तिच्या हातच्या चवीने आमच्या तोंडाला पाणी सुटलेलं असायचं. सुनीलच्या आवाजाने भानावर आलो आणि पुन्हा फाईल्समध्ये डोकं खुपसलं. संध्याकाळी ऑफिस सुटायच्या वेळी बायकोचा फोन आला. "लवकर या." अर्थात हे ती रोजच मला सांगत असते.
ऑडीटच्या कामामुळे गेले ४/५ दिवस जरा लवकरच ऑफिसला जात होतो तसा आजही लवकर पोहोचलो आणि ऑडीटच्या कामात गढून गेलो. नेहमीप्रमाणे सुनीलने आवाज दिला "साहेब आज लंचला खुपच उशीर झालांय जेऊया का?" मी व्यस्त कामातून मान वर केली अन् घड्याळ पाहीलं, जवळपास दोन वाजले होते. टिफिन घेऊन सहका-यांसोबत जेवण करत होतो. इतक्यात सुनील म्हणाला,
ऑडीटच्या कामामुळे गेले ४/५ दिवस जरा लवकरच ऑफिसला जात होतो तसा आजही लवकर पोहोचलो आणि ऑडीटच्या कामात गढून गेलो. नेहमीप्रमाणे सुनीलने आवाज दिला "साहेब आज लंचला खुपच उशीर झालांय जेऊया का?" मी व्यस्त कामातून मान वर केली अन् घड्याळ पाहीलं, जवळपास दोन वाजले होते. टिफिन घेऊन सहका-यांसोबत जेवण करत होतो. इतक्यात सुनील म्हणाला,
"साहेब आज टिफिन नेहमीसारखां दिसत नाही."
मी म्हटलं, "अरे हो, आज टिफिन माझ्या मुलींने करून दिलाय." सर्वांनी माझी थट्टामस्करी करत जेवण उरकलं. पण एक मात्र आज माझ्या टिफिन मधल्या भाजीचं कौतुक सर्वांनी केलं. सौ माहेरी गेली होती त्यामुळे आज फोनची शक्यता कमीच होती. मीही कामात गढून गेलो. इतक्यात मोबाईल वाजला.
"बाबा टिफिन खाल्लात का? भाजी कशी झाली होती? पोळी नीट होती ना? दही सांडलं नव्हतं ना?" तिच्या बोलण्यानं मला हसू आलं. हसू आवरत मी म्हटलं, "अगं हो थांब जरा. एकावेळी किती प्रश्न विचारशील." मुलगीला तिच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली.
"हे बघ तू केलेली भाजी ऑफिसमध्ये सर्वांना आवडली. आता बघ मग उद्यापासून मम्मीला किचनमधून सुट्टी देऊया का?"
तेंव्हा ती लटकेचं रागावली अन् "बाबा काय ओ आणि संध्याकाळी लवकर या." असा सज्जड दम देऊन कन्येने फोन बंद केला.
सहजच पण खोल विचारात गढून गेलो. आई, पत्नी, मुलगी तिन्ही अन्नपूर्णा पण तिघींच्या भावनांचा आवेग मात्र वेगळा. आईचं समरसून पदार्थ तयार करून भरभरून वाढणं. बायकोचं न चुकता मनापासून टिफिन तयार करून देणं. योग्यवेळी फोन करून \"जेवलात का? म्हणून विचारणं. मुलींनं स्वतःच्या हातांनी (कोणाच्या मदतीशिवाय) केलेल्या स्वंयपाकाबद्दल मत विचारणं आणि बाबांना टिफिन आवडला म्हणून आनंदानं बेभान होणं. खरंच कधी कधी प्रश्न पडतो, नातं वेगळं, रुप एकच पण भावनांचा पिसारा फुलवण्यांची यांची हातोटी पाहीली कि थक्क व्हायला होतं. माणसाच्या बालपणापासून ते वृद्धत्वापर्यंत कालांतरानं नात्यात कमी-जास्त अंतर पडतं अस म्हणतात, स्त्रींचं आईपासून ते मुलीपर्यंतचं हे नातं आणि त्यात येणारं अंतर जरी दिसलं तरी आमच्या आयुष्याचं अंतर वाढविण्याचं कौशल्य मात्र या तिघीत कितीतरी पटीनं अधिक असतं हे मात्र नक्की खरंय. स्त्रीच्या अशा अनेक कंगो-यांनी भरलेलं जीवन कधी कधी स्वतःलाच यथार्थ वाटतं . वयोमनापरत्वे नात्यांच्या अंतरातही या बायका आपल्या कंगो-यांना, कौशल्यांना विकसित करतच रहातात पण स्पर्धा म्हणून कधीच नाही. वेळप्रसंगी त्या अबोल राहुनही व्यक्त होत असतात भावनांनी मनातल्या स्पंदनानी. फक्त ही स्पंदनं आपल्याला जाणवली पाहिजेत. आणि एकदा ती जाणवली तर स्त्री समजून येईल. मी तर असं म्हणेन की स्त्रीला समजून नव्हे जाणून घेतलं पाहीजे अगदी आपल्या नेणीवेच्या पातळीपर्यंत. स्त्री गम्य नव्हे रम्यता आहे आपल्या जीवनाची, कारण
कुणी तरी म्हंटलयं
आजीः संपुर्ण घरावर मायेची पाखर घालते.
आई/पत्नी : सगळा संसार तोलून धरते.
मुलगीः सारं घर चैतन्यानं भरुन टाकते.
म्हणून तर स्त्रीला नेहमीच सलाम करावासा वाटतो कारण
मी माता मी कांता
शिक्षक मी सेवक मी
कलावती शास्त्रज्ञा
विविध गुणे मी नटते
मी विश्वाची प्रतिभा
मज मध्ये सम्रद्धी वसे
स्त्री माझे नाव असें.......
समाप्त.
कुणी तरी म्हंटलयं
आजीः संपुर्ण घरावर मायेची पाखर घालते.
आई/पत्नी : सगळा संसार तोलून धरते.
मुलगीः सारं घर चैतन्यानं भरुन टाकते.
म्हणून तर स्त्रीला नेहमीच सलाम करावासा वाटतो कारण
मी माता मी कांता
शिक्षक मी सेवक मी
कलावती शास्त्रज्ञा
विविध गुणे मी नटते
मी विश्वाची प्रतिभा
मज मध्ये सम्रद्धी वसे
स्त्री माझे नाव असें.......
समाप्त.
धन्यवाद
विजयानंद लंबे ,ईचलकरंजी
9225806099
विजयानंद लंबे ,ईचलकरंजी
9225806099
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा