Login

स्त्रीत्व भाग ४५

Story Of Women's Facing Tough Situation
स्त्रीत्व भाग ४५

क्रमश : भाग ४४
रागिणी पण एकदम शांत झाली .. डोळे मिटून त्याच्या मिठीत आज असेच राहावे असेच तिला वाटत होते ..
प्रसाद " मी तुला इथे या साठी आणलंय .. कि आपण हे आपले घर रिनोवेट करू .. पुन्हा त्याला नवीन बनवू . आणि आपण येत जाऊ कधी कधी राहायला इकडे .. तुला पण माहेरी आल्या सारखे वाटेल "
रागिणी " चालेल .. मला खूप आवडेल इकडे रहायला .. आपण ना जसे होते तसेच पुन्हा करू .. आई बाबांचा अर्ध्यात राहिलेला डाव पुन्हा मांडू "
प्रसाद " उमहु .. इथे आपण आपला नवीन डाव सुरु करू .. आपला सुद्धा डाव आपण अजून सुरु केला नाहीये . आत लवकरच तो सुरु करू .. "
रागिणी थोडीशी हसली " थँक यु प्रसाद .. तू आज मला इतके मोठं सुख दिल आहेस ना कि कोणत्याही सुखाची बरोबर मी या सुखा बरोबर करू शकत नाही "
बराच वेळ रागिणी प्रसादचा आहेत कोपरा पासून धरून त्याच्या खांद्यावर डोके ठेवून शांत बसली होती .. शून्यात नजर लावून .. आठवण तर येतच होती तिला आईची आणि बाबांची पण प्रसादच्या तिथे असण्याने मानला उभारी आली होती .. तो हि तिला रिलॅक्स करण्यासाठी तिच्या केसांमधूनहलका हलका मसाज करत होता .. आणि तिला ते खूप छान वाटत होते ..
नवरा कितीही मित्रासारखा असला ना तरीही प्रत्येक स्त्री हि त्याच्यामध्ये असा एक आधार शोधत असते.. जोंपर्यंत असा आधार तिला त्याच्यामध्ये दिसत नाही तोपर्यंत कदाचित ती स्वतःला समर्पण करत नाही . म्हणूनच कदाचित पूर्वी नवरा थोडातरी वयाने मोठा असावा असे म्हणत असावेत
प्रसाद " जायचं ? अजून एक सरप्राईज आहे तुझ्यासाठी ? आता तिकडे जावे लागेल "
रागिणी " हो चालेल .. जाऊया ."
आणि मग दोघे पुन्हा घर बंद करून निघाले ..
रागिणी " प्रसाद आईंना फोन करून विचार ना ते पोहचले का व्यवस्थित "
प्रसाद " पोहचले .. ओलाचे नोटींफिकेशन आले मला "
रागिणी " तरी पण फोन कर ना "
प्रसाद " तिकडे गेलो कि करतो "
थोड्याच वेळात एक हॉटेलला ते आले .. तिथे वरच्या मजल्यावर हॉल होता बाजूला रूम होत्या .. तिथल्या रूम मधेच आले दोघे
प्रसाद " रागिणी .. तू फ्रेश हो .. साडी चेंज करायची असेल तर चेंज कर .. मी आलोच खाली काम आहे माझे जरा "
रागिणी " ते गाडीतली बॅग पाहिजे होती मला "
प्रसाद " मी पाठवतो बॅग वर .. पण तू लवकर फ्रेश हो . कारण वेळ कमी आहे "
रागिणी " ठीक आहे
प्रसाद खाली त्याच्या कामाला गेला..
------------------------------------------------
श्रीधर घरी आले ते आनंदातच .. काहीतरी डोक्यात शिजतंय असेच वाटत होत त्यांच्याकडे पाहून .. तेवढ्यात स्पृहा बाहेरून आली
श्रीधर "आलीस बाळा .. कशी आहेस ? कसा गेला तुझा आजचा दिवस ?"
स्पृहा "छान होता "म्हणतच आवरायला गेली
इकडे संगीताला कळे ना कि श्रीधरची स्वारी आज का खुश आहे ?"
संगीता "काय हो .. काही प्रमोशन वगैरे मिळालं कि काय ?"
श्रीधर "आज ना एक गम्मतच झाली .. तो मुलगा एक दिवस सकाळी आला होता बघ आपल्या घरी पत्ता विचारत .. तो मुलगा माझ्याच ऑफिसला इंटर्न म्हणून जॉईन झालाय "
संगीता "मग त्यात काय एवढं खुश होयचं ?"
श्रीधर "का कुणास ठाऊक ? तो मुलगा ना मला खूप जवळचा वाटतो .. आवडलाय मला तो ?"
संगीता "म्हणजे ?"
श्रीधर "म्हणजे .. आपल्या स्पृहाचे त्या मुला बरोबर लग्न झाले पाहिजे .. मस्त मुलगा आहे .. असला हँडसम आहे ना .. सगळे लोक आज त्यालाच वळून वळून बघत होते .. आणि कामात इतका हुशार आहे .. २ दिवसांचे काम २० मिनिटात सबमिट केलं त्याने "
संगीता "अहो .. पण श्रीमंत आहे ना तो ... तुम्हीच तर म्हणालात ना ते कार काहीतरी महागडी होती त्याच्याकडे "
श्रीधर "अग .. त्याच्या वडिलांची आहे .. पण तो स्वाभिमानी आहे .. तो आज बस स्टॉप वर उभा होता .. कॅन्टीनला सँडविच खात होता .. एकदम आपल्या सारखीच परिस्थिती आहे .. आता कार मला चालवता येत नाही म्हणून मी घेतली नाही .. नाहीतर आपण पण तर कार घेऊ शकतोच ना आता "
संगीता "स्पृहाला आवडेल का ?"
श्रीधर "न आवडायला काय ? इतका राजबिंडा हिरो आहे तो .. "
संगीता " मग बोलावा त्याला आपल्या घरी एकदा पुन्हा "
श्रीधर "ह्या दोघांची मैत्री झाली पाहिजे .. तो असा अरेंज मॅरेज रणाऱ्यातला वाटत नाही.. मला काय वाटत .. मी स्पृहाला पण हि परीक्षा झाली कि लगेच इंटर्न म्हणून लावून घेतो .. मग ह्या दोघांची मैत्री होईल .. मग आपण लग्नाची मागणी घालू "
संगीता "काही पण तुमचं आपले .. स्पृहा कधी ती मैत्री करायची .. असले काही नको .. सरळ जमल तर बरं नाहीतर नाद सोडून द्या "
आजी "श्रीधर आणि एक सांगू का ? लग्नच्या गाठी ह्या वरून बांधून येतात अशा जबरदस्तीने बांधता येत नाही .. योग्य आल्याशिवाय काही होत नाही .. पण तो मुलगा खरंच छान आहे .. चुणूक आहे एक वेगळी .. "
झाले स्पृहा पासून सगळ्यांना आदी आवडला होता .. पण आता गम्मत अशी कि त्यांना सत्य कळल्यावर काय होईल सांगू शकत नाही
स्पृहा फ्रेश होऊन खाली आली .. मस्त चहा नाश्ता गप्पा मारत हसत केला सर्वांनी .. मग शुभंकरोती म्हणायला गेली
-------------------------------------------------------
आदी घरी आला .. सुनंदाने आज आधीच सगळे जेवण बनवून ठेवले होते .. आदी फ्रेश होयला गेला तर मिरर समोर उभा होता तर त्याचे लक्ष त्या ब्रेसलेट कडे गेले आणि एक छानशी स्माईल आली त्याच्या चेहर्यावर .. सगळ्या दिवसाचा कामाचा शिणवटाच जणू गायब झाला त्याचा
आदी आरशात बघून ते ब्रेसलेट हातात घेऊन उभा "काय मग मिसेस आदिराज .. माझी आठवण येतंय का ? तुमच्या आठवणीने जीव खालीवर होतोय माझा .. आणि तुम्ही बसा अभ्यास करत "
भरपेट जेवला आणि बेड वर आडवा पडला .. स्पृहाला एक कॉल करू का अशी ईच्छा होत होती त्याला पण .. आता गडबड अशी झाली कि आदीचा नंबर श्रीधरकडे गेला होता .. आता त्यांच्याघरी त्याने कॉल करणे म्हणजे रिस्क होती .. छताकडे बघत विचार करत बसला होता तिच्या आठवणीत .. एक मन तर असे वाटे कि आता गाडी काढावी आणि जावे तिच्या घरी आणि उचलून आपल्या घरी आणावे .. माझी लग्नाची बायको आहे ती .. मी देवळात लग्न केलय .. मला पाहिजे होती ती माझ्या जवळ "पण बिचारा मनावर दगड ठेवून शांत बसला होता ..
इकडे स्पृहाला खूप बेचैनी आली होती . आदिला फोन करायला फोन हातात घेत होती आणि ठेवत होती .. करू का ? नको रोज नको ? सवय लागेल ? कधीतरी ठीक आहे ? आता काल केला ना ? आज नको ? उगाच आईला डाऊट यायचा .. असा विचार करत ती पण हातात वही पुस्तक घेऊन विचार करत होती .. तिने तिच्या मोबाईल मध्ये फोटो पण नव्हता ठेवला ..
एक क्षण असा आलाच कि तिचं मन तिच्या हातात राहिलं नाही आणि तीने आतून दार लावलं आणि आदिला कॉल केला .. आदी तर चातका सारखा वाटच बघत होता तिच्या फोन ची .. पण स्पृहाच्या डोळ्यांत पाणी होते कि आपण इतके मजबूर झालोय .. आपण आपल्या मनाला कंट्रोल मध्ये नाही ठेवूं शकत आहे .. आदींची इतकी सवय चांगली नाही .. असा काहीसा गोंधळ मनात होता तिच्या ..
प्रत्येक मुली च्या मनात अनामिक भीती असते .. दुसऱ्या कोणीतरी आपल्यावर आपल्या मन बुद्धीवर कण्ट्रोल करतेय कि काय ..
कॉल तर तिने केला .. पण आता बोलायला होत नव्हते आणि आदी " हॅलो .. हॅलो करत होता तिचा आवाज ऐकण्यासाठी तरसला होता

आदी " मला माहितेय .. मी ज्या अवस्थेत आहे त्याच अवस्थेत तू आहेस .. पण घाबरू नकोस .. हि बेचैनी.. हि ओढ आपल्या पवित्र प्रेमाचाच ऐक भाग आहे .. बिलिव्ह मी .. आपण काहीच चुकीचे करत नाहीये .
ती काहीही न बोलता आदिल जणू तिचे सर्व कळत होते आणि तो तिला धीर देत होता . निदान आपण काही चुकीचे करतोय असे गिल्ट तिला नको यायला या साठी तो बोलत होता .. हे सगळे ऐकून स्पृहा ने एक हुंदका भरला
स्पृहा " आदी ... मी .. माझ्या घरातल्यांना फसवत नाहीये ना .. हे असे चोरून तुला फोन करणे .. मला खूप भीती वाटते ... आदी मला ना भीती वाटते .. बाबांना कळले तर आपल्या बद्दल तर .. अशी सारखी भीती वाटतेय "
आदी " आपण घरी सांगूया का मग ? .मी लगेच घरी येऊ शकतो .. तुला पाहिजे तर उद्याच्या उद्या "
स्पृहा काहीच बोलली नाही
आदी " तुला .. मी हवा आहे ना .. का अजूनही तुझ्या मनात माझ्या बद्दल शंका आहे ?"स्पृहा काहीच बोलत नव्हती.
आदी " तुला नको वाटत असेल तर नको करुस कॉल .. तुला असा दुःखात .. आणि असे रडताना मी नाही पाहू शकत .. "
स्पृहा " आदी सॉरी .. तू गैर समज नको करुस.. मी असा कधी विचार सुद्धा केला नाही कि मी कधी कुणाच्या प्रेमात पडेन .. पण आता मला तुला पहावेसे वाटतय .. तुझी आठवण येते .. उठता बसता तू अदृश्य स्वरूपात माझ्या अवती भवती असतोस .. आदी मी खूप प्रॉब्लेम मध्ये आहे .. माझे लक्ष नाही लागत आहे कशातच .. एक असाईनमेंट लिहिली नाहीये मी .. तुला न आठवायचा प्रयत्न करतेय पण होतंच नाहीये .. आणि आता तू पण बोलतोयस कि तुला नको असेल तर नको कॉल करुस .. " आणि पुन्हा हुंदका भरला तिने
आदी " ऐक ना .. म्ह्णूनच तर मी म्हणतोय २ वर्ष खूप आहेत .. आज दुसरा दिवस आहे तर आपली हि अवस्था आहे .. इट्स डिफिकल्ट यार .. "
स्पृहा " सॉरी पण मी उद्या माझा मोबाईल कायमचा बंद करतेय .. मी असे रोज रोज नाही तुला कॉल करू शकणार .. मला माझ्या मनावर ताबा मिळवलाच पाहिजे "
0

🎭 Series Post

View all